आनंदानं जगणं हक्क आहे माझा, सांग जगाला ओरडून !

By admin | Published: June 18, 2015 05:36 PM2015-06-18T17:36:25+5:302015-06-18T17:36:25+5:30

नाही ना सहन होत मग विचारा स्वत:ला, मी का सहन करतोय हे? होतोय ना त्रास, मग विचारा स्वत:ला की, या त्रासाला जबाबदार कोण?

It is my right to live happily, tell the world to cry! | आनंदानं जगणं हक्क आहे माझा, सांग जगाला ओरडून !

आनंदानं जगणं हक्क आहे माझा, सांग जगाला ओरडून !

Next
>नाही ना सहन होत मग विचारा स्वत:ला,
मी का सहन करतोय हे?
होतोय ना त्रास,
मग विचारा स्वत:ला की,
या त्रसाला जबाबदार कोण?
खूप चिडचिड होतेय,
खूप राग येतोय?
कुणाचा? कशामुळे?
आणि हा सारा त्रास मी मुळात का करून घेतोय,
विचारा स्वत:ला !
खूप उदास वाटतं, खूप रडू येतं,
खूप असहाय वाटतं,
कुणामुळे? कशामुळे?
कशासाठी?
हे सारे प्रश्न विचारा स्वत:ला.
की कुणी केलीये माझी ही अवस्था?
कोण छळतंय मला?
आणि मी असं का दुस:याच्या हातातलं बाहुलं झालोय?
हे सारं आपण विचारावं स्वत:लाच.
खूप खूप विचारलं की,
उत्तर मिळतं.
आणि ते सांगतं,
त्रस तुला होतोय ना,
उदास तुला वाटतंय, छळ तुझा होतोय,
जीव तुझा तुटतोय, 
दु:ख तुला झालंय,
मग उपाय तू कर.
बंद कर, दुस:यासाठी हा त्रस करुन घेणं.
ैआनंदी राहणं हा तुझा अधिकार आहे,
स्वत:साठी जगणं हा तुझा हक्क आहे.
तो हक्क मिळवं आणि झुगारून सारी ओझी,
म्हण मला जगायचंय !
मी जगणार आहे, आनंदानं, स्वत:साठी !!
न कुढता. न चिडता.
जमेल तुला. नक्की !
 
- एका कोरिअन मुक्तछंदाचा संपादित अनुवाद
 

Web Title: It is my right to live happily, tell the world to cry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.