आयटीची सफाई
By Admin | Updated: July 14, 2016 22:49 IST2016-07-14T22:49:08+5:302016-07-14T22:49:08+5:30
18 ते 30 वयोगटातले तरुण सफाई कर्मचारी, आयटीतले. त्यांच्या वाटय़ाला आयटीतली चमकधमक नाही, तर फक्त अंधारी गरिबी येतेय.

आयटीची सफाई
>- राजानंद मोरे
18 ते 30 वयोगटातले
तरुण सफाई कर्मचारी,
आयटीतले.
त्यांच्या वाटय़ाला
आयटीतली चमकधमक नाही,
तर फक्त अंधारी गरिबी येतेय.
पोरगा आयटीत काम करतो?.
मग पगारपाण्याचं काय विचारायलाच नको..
रग्गड पगार. एखादी कार, फ्लॅट तर असणारच.
आयटीत म्हटल्यावर चांगला शिकला असेल? कोणत्या पोस्टवर आहे?
- अं.. पोस्ट..?
हाउस कीपर आहे.
- म्हणजे?
- साफसफाई..
- काय? साफसफाई. पण ‘आयटीत’ म्हटल्यावर पगार तरी चांगला असेल.
- साडेसात हजार मिळतो हातात..
- काय?
.. हा संवाद जरी प्रातिनिधिक असला तरी हे वास्तवच आहे. हाउस कीपर ते तंत्रज्ञ अशी दोन टोकं. पगार, मान-सन्मान यात जमीन-आसमानाचा फरक. आयटीला चकचकीत ठेवणा:या सफाई कामगारांच्या आयुष्यावर मात्र काजळी चढलेली आहे, हे एका अभ्यासातून नुकतंच समोर आलं आहे. आणि त्यात तरुण मनुष्यबळ भरडलं जातं आहे.
आयटी म्हणजे इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रनं घेतलेली भरारी डोळे दिपवून टाकणारी आहे. लाखो तरुणांना रोजगार मिळाला अन् प्रतिष्ठा व पैसाही! आयटीत नोकरीला आहे म्हटलं की लोकांचा समोरच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. पण यात सफाई कामगार पूर्णपणो दुर्लक्षित राहिले. सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठातील समाजशास्त्र विभागातील डॉ. श्रुती तांबे, कॅनडातील टोरांटो विद्यापीठातील किरण मिरचंदानी आणि शिकागो येथील संजुक्ता मुखर्जी यांनी संयुक्तपणो पुण्यातील आयटी कंपन्यांमधील साफसफाई, सुरक्षारक्षक आणि चालक कर्मचा:यांचा अभ्यास केला. या अभ्यासातून आयटीतल्या सफाई कामगारांचं जगणं उलगडत गेलं.
एकतर त्यांची नेमणूक होते ती ठेकेदाराकडून. आयटी कंपन्या या कर्मचा:यांची जबाबदारी घेत नाहीत. त्यांच्याकडून ठेकेदार नेमला जातो. हा ठेकेदार दुस:या एका ठेकेदारावर हे काम सोपवतो. त्यामुळे प्रत्यक्षात कंपनीने संबंधित कर्मचा:याला दिलेला पगार थेट त्यांच्यार्पयत पोहचतच नाही. ठेकेदारांकडून त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते. यातही आर्थिक शोषण होणा:यांत महिला कर्मचा:यांचे प्रमाण अधिक असल्याचे हा अभ्यास सांगतो.
साधारणपणो 18 ते 3क् या वयोगटातील हे तरुण कर्मचारी आहेत. बहुतेकांची घरची आर्थिक परिस्थिती बेताची. शिक्षण साधारण दहावी ते बारावीर्पयत. आयटी कंपनीत नोकरी म्हटल्यावर सुरुवातीला सगळेजण भलतेच खूश होतात. पण प्रत्यक्षात काम सुरू केल्यावर मिळणारी वागणूक झाडूवाला म्हणूनच. ही तरुण मुलं कंपनी चकचकीत ठेवत असले तरी त्यांच्या आयुष्याशी या चकचकीत वातावरणाचा काही प्रभाव नसतो. वाटय़ाला येतं ते आर्थिक अंधारेपणच!
आयटी कंपन्यांमधे तांत्रिक काम करणारे बहुसंख्य तरुणच आणि सफाई करत या संस्थात सेवा देणारेही तरुणच! दोन्हीही घटक साधारणपणो एकाच वयाचे. पण त्यांना मिळणारी वागणूक खूपच वेगळी असते. आयटीने सफाई कर्मचा:यांना रोजगार दिला, पण सन्मान मात्र अजूनही मिळालेला नाही. आयटीनं विकास केला पण समाजात आर्थिक दरी किती मोठी निर्माण झाली याचं हे एक चित्र आहे. समाजविकासात प्रत्येक घटकाला समान न्याय मिळायला हवा. कोणतेही काम असो, तरुणांना ते आपलेसे वाटायला हवे, अशी अपेक्षा डॉ. तांबे यांनी व्यक्त केली.
आयटीतलं एक वेगळं चित्रच यानिमित्तानं आपल्यासमोर आलं, इतकंच!