शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
2
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
3
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
4
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
7
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
8
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
9
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
10
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
11
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
12
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
14
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
15
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
16
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
17
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
18
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
19
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
20
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा

सेव्ह नवीद- इराणी तरुणाला वाचवण्यासाठी ट्रम्प यांनी का केलं ट्विट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 5:15 PM

तो सेलिब्रिटी, इराणी कुस्तीपटू. लोकप्रिय. इराण सरकारने मात्र राष्ट्रद्रोहासह हत्येचा ठपका ठेवत त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

ठळक मुद्देइराणी तारुण्याचा स्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठीचा एल्गार

कलीम अजीम 

इराणच्या प्रसिद्ध कुस्तीपटूची फाशीची शिक्षा रद्द करावी, या मागणीसाठी जगभरात ‘सेव्ह नवीद’ ही मोहीम सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ट्विट करत फाशी देऊ नये असे म्हटलं आहे. ऑनलाइन पीटिशनवर लोक सह्या करत आहेत. तर कोण हा नवीद?नवीद अफकारी नावाचा हा 27 वर्षीय कुस्तीपटू. हत्येच्या आरोपाखाली सध्या तो इराणच्या तुरुंगात आहे. देशातील लोकप्रिय मल्ल अशी त्याची ओळख आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यानं अनेक पदकं मिळवली आहेत. इराणमध्ये कुस्ती हा लोकप्रिय खेळ आहे. या खेळात अनेक तरुण व तरुणी प्रावीण्य मिळवण्यासाठी सतत प्रयत्नरत असतात. नवीद अफकारी कोच म्हणूनही इतरांना प्रशिक्षण द्यायचा.नवीद हा इराणचा सेलिब्रिटी अ‍ॅथलिट आहे, असं म्हणता येईल. सप्टेंबर 2018मध्ये झालेल्या एका सरकारविरोधी निदर्शनात तो सहभागी झाला होता. बेरोजगारी, आर्थिक संकट आणि महागाईच्या विरोधात हे आंदोलन सुरू होतं. या आंदोलनात मोठय़ा संख्येने तरुणांचा सहभाग होता. दक्षिण इराणमधील शिराज शहरात झालेल्या एका निषेध आंदोलनात नवीद आपल्या मित्नांसह सहभागी झाला होता. आंदोलनस्थळी पोलीस व निदर्शकांत चकमक झाली. यात एका खासगी सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. पोलिसांचं म्हणणं आहे की, नवीदने चाकूने भोसकून ही हत्या केली. ज्याचा मृत्यू झाला तो एका खासगी कंपनीत सिक्युरिटी गार्ड असून, त्याचं नाव हसन तुर्कमान आहे. फॉक्स न्यूजच्या मते, सरकारविरोधी षड्यंत्नातून ही हत्या झाली, असं स्थानिक पोलीस म्हणत आहेत. पोलिसांनी नवीदचा भाऊ वाहिद अफकारीलादेखील शासनविरोधी षड्यंत्नाचा भाग म्हणून अटक केली. शिवाय त्याचा तिसरा भाऊ हबीब यालादेखील ताब्यात घेतलं.

संबंधित खटला सुरू असताना सरकारी पक्ष व पोलिसांनी कोर्टात अनेक सरकारी पुरावे सादर केले. त्यात नवीदच्या दोन्ही भावांचा कबुलीजबाबही होता. रॉयटर वृत्तसंस्थेच्या मते, नवीदनं हत्येची कबुली दिली, असा अहवाल पोलिसांनी कोर्टात दाखल केला. प्रत्यक्ष पुरावे व परिस्थिती पाहता शिराजच्या स्पेशल कोर्टाने गेल्या महिन्यात नवीदला दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाने त्याच्या दोन्ही भावांना आजीवन कारावास व फटके मारण्याची शिक्षा दिली. नवीदविरोधातच हत्या, राष्ट्रद्रोह, ईश्वराविरुद्ध युद्ध छेडणे व अवमान करणे इत्यादी गंभीर गुन्हे नोंदवण्यात आलेली आहेत. मात्र जगभरातून नवीदच्या या शिक्षेवर टीका केली जात आहे. इराणचे सर्व राष्ट्रीय स्पोर्ट्स चॅम्पिअन्स फाशीचा विरोध करत आहेत. मोसलिम इस्कंदर फिलाबी, इराणचे राष्ट्रीय खेळाडू आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये 17 सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक विजेते आहेत. त्यांच्या पुढाकाराने इराणचे अ‍ॅथलेटिक्स समितीने नवीद बचाव मोहीम सुरू केली आहे. तब्बल 48 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलिट कमिटीला याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.  सर्वानी नवीदचा मृत्युदंड रद्द करण्याची मागणी केली आहे. नवीदला राजकीय प्यादा बनवू नका असा आक्र ोश केला जात आहे. सेव नवीद अशी चळवळ उभी राहात आहे.नवीदच्या आईने एका व्हिडिओद्वारे आवाहन केलं आहे की, माझ्या तीन तरुण मुलांना वाचवा. मुलांचा छळ करून त्यांना एकमेकांविरुद्ध साक्ष द्यायला भाग पाडले आहे, असा आरोप तिनं केला आहे. इंटरनॅशनल फेडरेशन फॉर ह्युमन राईट्स आणि लंडनस्थित जस्टिस फॉर इराण यांनी जूनमध्ये एका अहवालात म्हटलं होतं की, गेल्या दशकात इराणमध्ये सरकारी यंत्नणांनी 355हून अधिक सक्तीची कबुलीजबाब नोंदवली आहेत. इराणी अधिकारी मात्न हे आरोप नाकारतात. फॉक्स न्यूजच्या मते, स्थानिक मीडियाने वेळोवेळी संशयितांच्या कबुलीजबाबांवर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. सरकारविरोधाचं प्रत्येक शस्र मोडून काढायचं ही इराणची रीत राहिलेली आहे. विरोध दडपण्यासाठी कठोर शासन ही एकमेव पद्धत इराणी राज्यकर्ते हाताळतात. नवीदच्या निमित्ताने अनेक मानवी हक्क संघटना, राजकीय विश्लेषक, अभ्यासकांनी ही सक्ती थांबण्याची मागणी केली आहे. शिवाय देहदंडाच्या शिक्षेची तरतूद कायमची रद्द करण्याची मागणी केली जात आहे. नवीदच्या निमित्ताने सोशल मीडियावर सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीची समीक्षा केली जात आहे. आज नवीद आहे उद्या तुम्हीदेखील असू शकता, असं ट्विट केलं जात आहे. अमेरिकी-इराणी विचारवंत मरियम मेमारसादेगी म्हणतात, ‘नवीद अफकारीचा एकमेव गुन्हा म्हणजे देशप्रेम. आपल्या दोन भावांसोबत तो स्वातंत्र्यासाठी देशव्यापी निषेधांमध्ये सामील झाला. कृपया न्यायासाठी आमच्या बाजूने उभे राहा!’देशातील राष्ट्रीय स्पोर्ट्स चॅम्पिअन्सने आरोप केला हे की, सत्ताधारी राजवटीकडून खेळाडूंना सतत त्नास देण्याचा प्रयत्न/मोहीम सुरू असते. गेल्या आठवडय़ात हे प्रकरण जगभर व्हायरल झालं, कारण अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजची एक लिंक शेअर करत नवीदच्या माफीची मागणी केली. त्यानंतर जगभरात या खटल्याची समीक्षा सुरू झाली आहे. इराणच्या हेकेखोर धोरणाचा समाचार घेतला जात आहे. ( कलीम मुक्त पत्रकार आहे.)