शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

हिस्ट्री-पॉलिटिक्सचा उपयोग काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 7:02 AM

शिक्षणातून मिळणारे ज्ञान हे आपल्या दैनंदिन जीवनात, नोकरी-व्यवसायात वापरण्याजोगे असावे हे खरे; पण त्यापलीकडील ज्ञान, ज्याचा प्रत्यक्ष वापर आपल्याला दिसून येत नाही, त्याचे काहीच महत्त्व नाही का? ते महत्त्व नाकारल्याने समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास याकडे दुर्लक्ष होते आणि वर्तमानात काय चाललेय हेच अनेकांना कळत नाही.

ठळक मुद्देसंवादाअभावी लोकशाही मरते. ही प्रक्रि या समजून घेण्यासाठी सामाजिकशास्त्नांची समज असावी लागते

- सई पवार

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक जोक वाचला.– ‘प्रिय शाळा, आज अजून एक दिवस गेला आणि मी पायथागोरसचा सिद्धांत वापरला नाही.’ असे अनेक जोक्स अधूनमधून व्हायरल झालेले दिसतात. शाळेत जीवनोपयोगी कौशल्ये शिकवण्याऐवजी नुसते पुस्तकी ज्ञान शिकवले जाते अशा आशयाचे हे जोक्स. त्यामध्ये तथ्य आहेच; परंतु ज्ञानाची उपयुक्तता या विषयाबद्दलचे काही चिंताजनक अर्थही त्यात सामावलेले आहेत. शिक्षणातून मिळणारे ज्ञान हे आपल्या दैनंदिन जीवनात, नोकरी-व्यवसायात वापरण्याजोगे असावे हे खरे; पण त्यापलीकडील ज्ञान, ज्याचा प्रत्यक्ष वापर आपल्याला दिसून येत नाही, त्याचे काहीच महत्त्व नाही का? आपल्याकडे सायन्स आणि इंजिनिअरिंगकडे जाण्याचा मुलांचा जो ओघ आहे, कलाशाखेकडे काहीतरी परके म्हणून बघण्याची जी दृष्टी आहे ती या ज्ञानाच्या उपयुक्ततेच्या धारणेतून तयार होते. शिक्षण हे नोकरी मिळण्यासाठी असावे हा भांडवलशाही व्यवस्थेतला समज आहे, जिथे व्यक्तीची किंमत तिच्या आर्थिक स्थितीवरून केली जाते. शिक्षणातून समाजभान मिळवणे, आपली वैयक्तिक जीवनदृष्टी निर्माण करणे आणि माणूस म्हणून आपला, केवळ आर्थिक नाही, तर सर्वागीण विकास साधणे ही समजूत हरवत चालली आहे. म्हणूनच देशात सामाजिक व राजकीय पातळीवर तप्त वातावरण असताना, लोकशाही धोक्यात आली असतानाही अनेकजण याकडे डोळेझाक करू शकतात. आपला देश सध्या ऐतिहासिक कालखंडातून जात आहे. सीएए आणि एनआरसी या कायद्यांवरून दिल्ली, आसाम अशा भागातील प्राथमिक आंदोलनांनंतर लगेचच जामिया मिलिया इस्लामिया आणि अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी इथे पोलिसांकडून झालेल्या हिंसाचारामुळे देशभरातील तरु ण पिढी खाडकन जागी झाली आणि स्वतर्‍हून आंदोलनांच्या केंद्रस्थानी आली. यानंतर सुरू असणारी रस्ते भरून टाकणारी आंदोलने, विविध विद्यापीठांमधून जामिया आणि जेएनयूला दिला गेलेला पाठिंबा, सोशल मीडियावरील प्रखर विरोध, फैझच्या कवितांचा मारा हे सगळं आपल्या समोर आहेच. पण इथे ‘तरु ण पिढी’ हा शब्द एकांगीपणे वापरणे चुकीचे ठरेल. अशीही अनेक तरु ण मंडळी आहेत ज्यांना देशात होणार्‍या या घडामोडींचा अर्थ लावता येत नाहीये. गेल्या काही दिवसात सायन्सवाल्या उच्चशिक्षित मित्न-मैत्रिणींकडून ‘हे सीएए/एनआरसीबद्दल नक्की काय चाललय?’ असे प्रश्न येताहेत. एकीकडे बहुतांशी मुख्य प्रवाही मीडियामध्ये सरकारचे अंधभक्तांसारखे समर्थन होत असताना, त्याचवेळी सोशल मीडिया आणि रस्त्यावरील आंदोलनात सरकारवर दुर्लक्ष न करता येण्यासारखी तीव्र टीका होत असताना, सामाजिक बाबतीत एरव्ही तटस्थ राहणार्‍यांमध्ये आता अगदी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोणती बाजू घ्यायची हे त्यांना कळत नाहीये. -याचे कारण म्हणजे समाजभानाचा अभाव. हा अभाव येतो इतिहास, समाजशास्त्न, राज्यशास्त्न यांसारख्या विषयांकडे दुर्लक्ष केल्यामुळे, तसेच या विषयांच्या परस्परसंबंधांची, त्यांच्या एकत्रित अस्तित्वाची जाणीव नसल्यामुळे. या अभावामुळे धर्माच्या निकषावर नागरिकता ठरवणे म्हणजे लोकशाही या मूलभूत संकल्पनेच्या विरोधात जाणे आहे हेच अनेकांना कळत नाही. दुसरीकडे सीएए/एनआरसी या कायद्यांना पाठिंबा देणारे सरकारचे समर्थकही अनेक आहेत. सरकारने आणलेला कायदा हा आपल्या भल्यासाठीच असणार, कायद्यांसारख्या कठीण गोष्टी समजण्याची सामान्य नागरिकांची कुवत नाही व त्यामुळे हे काम सरकारवर सोपवावे, अशी एकूण त्यांची धारणा. यामध्ये हिंदुत्ववादी भारताची सुप्त इच्छाही दडलेली.

 या सगळ्यामध्ये जास्त चिंतेची बाब म्हणजे आता मतभिन्नता असलेल्या दोन व्यक्तींशी संवाद साधणे अशक्य होऊन बसले आहे. एकदा संवाद थांबला की कट्टरता फोफावते; पण हा संवाद का आणि कसा थांबला? ही काही एका दिवसात घडलेली गोष्ट नाही. हे पद्धतशीररीत्या घडवून आणलेले आहे. ते कसे हे समजण्यासाठी सामाजिकशास्त्रांची मदत घ्यावी लागते. कोणताही अर्थपूर्ण संवाद घडण्यासाठी दोन्ही बाजूंमध्ये एक प्रकारचे कॉमन ग्राउण्ंड असावे लागते. म्हणजेच त्यांचा एकूण समाजाकडे, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यातील काही मूलभूत संकल्पना आणि तत्त्वे अगदी हुबेहूब नाहीत तरी काही प्रमाणात सारखी असावी लागतात. जिथे मतभेद असतात तिथे समोरच्याची बाजू एकूण घेण्याची तयारी असावी लागते. समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा शिक्षणातून तयार होतो. समाजशास्त्न, मानवशास्त्न, राज्यशास्त्न, भाषा हे विषय कशासाठी आहेत? तर आपला जो दृष्टिकोन आहे तो मानवी हक्कांना धरून असावा, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या लोकशाहीतील तत्त्वांशी मेळ खाणारा असावा, विविधता जपून शाश्वत विकासाकडे वाटचाल करणारा असावा म्हणून. तसेच एकूण समाजाचं चलनवलन कसं होतं, वेगवेगळ्या ऐतिहासिक कालखंडांमध्ये समाजातील वेगवेगळ्या संस्था कशा आकाराला येतात, त्यामध्ये धर्म-वंश-वर्ण-लिंग कसे बदल घडवून आणतात याचे आकलन होण्यासाठी. गेल्या काही वर्षामध्ये शाळेतील इतिहासाचा अभ्यासक्र म हा अशा पद्धतीने बदलला जातोय, की ज्यातून हिंदुत्ववादी दृष्टिकोन ठसवला जातो. सामाजिक विचारविश्वात देशभक्तीच्या नावाखाली असहिष्णुता पसरवली गेली आहे. अगदी सिनेमा, मालिकांमधूनसुद्धा देशप्रेम उतू जात आहे.मुख्य विचारप्रवाहात घडवून आणल्या जात असलेल्या या बदलांमधून समानता व धर्मनिरपेक्षता ही मूलभूत तत्त्वेच पुसली जात आहेत हे लक्षात घ्या. यामुळे संवादासाठी कोणतेही कॉमन ग्राउण्ड उरत नाही. संवादाअभावी लोकशाही मरते. ही प्रक्रि या समजून घेण्यासाठी सामाजिकशास्त्नांची समज असावी लागते, जी आपल्या ज्ञानाच्या उपयुक्ततेच्या संकल्पनेमुळे अपुरी राहाते. यावर सामाजिकशस्त्नांमधील विषयांचे वाचन व या शाखेतील लोकांशी संवाद साधणे ही प्राथमिक उत्तरे आहेत. त्यानंतरचे सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी मात्न व्यवस्थेत बदल आणावा लागेल. ( सईने पुणे विद्यापीठातून समाजशास्त्राची पदवी घेताना नुकतंच सुवर्णपदक मिळवलं आहे.)