शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

इम्युनिटी बुस्टर - या  नव्या मार्केटमोहात  तुम्हीही अडकताय  का ?  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 6:52 PM

तरुणांना मोहात पाडणारे आणि चटकन खा, झटकन तब्येत कमवा प्रतिकारशक्ती वाढवा म्हणणारे प्रयोग. ते तपासून स्वीकारले म्हणजे बरं.

ठळक मुद्देइम्युनिटी बूस्टर

- नितांत महाजन

तरुण मुलांना घरात कोंडून घालणारं एक संकट  जगावर आलं.आपल्याकडे तर परीक्षा होणार की होणार नाहीत इथून घोळ आहेत, हाताला काम, मनाला समाधान, शिखात पैसा, उत्तम तब्येत हे सारं तर लांबच.त्यात जीम बंद, जॉगिंगला जायला परवानगी; पण जायचं तर मास्क लावावा की नाही याविषयावर भरपूर ज्ञान वाटप होतं.दिवसभर हातात मोबाइल असतोच. आपल्या सगळ्यांच्याच व्हॉट्सअॅपवर कोरोना लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक कुठले मेसेज आले?- सहज नजर घाला, आपल्याला आलेले किंवा आपण फॉरवर्ड केलेले अनेक मेसेज एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत आहेत की, ‘प्रतिकारशक्ती’ वाढवा.दुसरं आपल्या हातात काहीच उरलेलं नाही. ्रआपणही मोठय़ा भरवशाने अनेकांना सांगतो, काही नाही रे आपली इम्यून सिस्टिम तगडी आहे. आपल्याला काय होतंय, तरुण मुलांना झालाच कोरोना तरी लवकर बरा होतो.पण म्हणून काही इथंच ही गोष्ट संपत नाही.हातातल्या मोबाइलला एकदम बाळसं आल्यासारखं हळद, सुंठ, मिरे-जिरे-ओवा-लवंग-आले-तुळस हे सारे सुपरहीरो ‘कोरोनासे दुनियाको बचाने’ धावल्यासारखे समाजमाध्यमांत धावत असतात.रोज काढा आवश्यक आहे, रोज लिंबू पिळून पाणी अवश्य प्या, रोज सुंठगोळी खा, आर्सेनिक घ्या असं तर अनेकजण आपण स्वत:च डॉक्टर किंवा तज्ज्ञ असल्याचं परस्परांना सांगतात.त्यासाठी त्या त्या पॅथीच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, आपल्या प्रकृतीप्रमाणो आवश्यक तीच औषधं घ्यावीत असंही अनेकांना वाटत नाही.जो तो इम्युनिटी वाढवायच्या मागे लागल्यासारखा सोशल मीडियातलं ज्ञान सॅनिटायझरसारखं सतत हातानं उचलून घेत आहे.अस्वस्थ काळात असं होणं साहजिकही आहे; पण ते केवळ माणसांच्या व्यक्तिगत आयुष्यापुरतं आता उरलेलं नाही. कोरोनापूर्व काळात ‘इम्युनिटी बूस्टर’ नावाचा एक व्यवसाय होताच; पण त्याकाळी डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांपुरताच तो मर्यादित होता.कोरोनाकाळात या व्यवसायाचा भाव जगभर वधारला. जगभरातली माणसं ‘इम्युनिटी बूस्टर’ अर्थात प्रतिकारशक्ती कशाकशानं वाढू शकेल असं ऑनलाइन शोधू लागले, वाचू लागले, समाजमाध्यमात चर्चा सुरू झाल्या. ‘काही अपाय तर नाही ना’ म्हणत अनेकांनी स्वत:वर प्रयोगही सुरूकेले. वेलनेस इंडस्ट्रीच्या पोटातून हा नवा उद्योग आता एकदम जोरदार वेगानं पुढे येतो आहे.पर्सिस्टन्स मार्केट रिसर्च या पोर्टलने दिलेल्या वृत्त-आकडेवारीनुसार प्रतिकारशक्ती वाढवणा:या औषधांची (हेल्थ सप्लिमेण्ट्स)ची बाजारपेठ वाढते आहे. या औषधांना जगात सर्वाधिक मागणी अमेरिकेत आहे. व्हिटॅमिन्स, हर्बल न्युट्रिशन हे सारं सध्या तेजीत आहे. येत्या दशकभरात म्हणजेच 2क्2क् ते 2क्3क् या काळात अनेक उत्पादनं बाजारपेठेत येतील आणि त्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध असेल असा या पोर्टलचा अंदाज आहे.डब्ल्यूआरसी नावाच्या एका वेबसाइटनुसार याकाळात भारतातील लोकांनीही भरपूर ऑनलाइन शोधाशोध करत कशानं प्रतिकारशक्ती वाढते याची माहिती घेतली. आपण काढा घ्यायला बहुसंख्य लोकांनी सुरुवात केली आहे, असं हे वृत्त म्हणतं.इतकंच नाही तर आता बंगळुरूमध्ये हॉटेल्स उघडत असून, तिथं अनेक हॉटेल्सनी हळद दूध, ओवासुंठ चहा, च्यवनप्राश आइस्क्रीम हे पदार्थ आपल्या मेन्यूकार्डमध्ये नव्यानं सामील केली आहेत.लोकांच्या मनात असलेली भीती, आपली प्रतिकारशक्ती कोरोनाला पुरून उरेल ना ही शंका यावर आता हा नवा व्यवसाय पोसला जाणार आहे हे उघड आहे.वेट लॉस, विविध प्रकारची डाएट, यांनी जसं तरुणाईला मोहात पाडलं होतं, तसं हे इम्युनिटी बूस्टरही तरुण ग्राहकांच्या शोधात तर नाहीत ना, हे तपासून, ताडून पाहिलं पाहिजे.

कोरोनाकाळात जगभरातल्या माणसांना हे लक्षात आलं की, बाकी सगळं नंतर आपलं आरोग्य महत्त्वाचं. त्यातून आरोग्य भान वाढलं तर ते उत्तमच आहे, व्यायाम-तंदुरुस्ती याचे आग्रह वाईट नाहीच.मात्र पी हळद- कमव प्रतिकारशक्ती इतकं सोपं हे गणित नसतं, नसेल हे अनेकांच्या लक्षात येत नाही.तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, शरीराची गरज याशिवाय असे प्रयोग कितपत सुरक्षित असतील याचाही विचार करायला हवा. समाजमाध्यमातून आपल्यार्पयत येणारे सल्ले तज्ज्ञांचेच आहेत ना याचीही खात्री या नव्या बाजारपेठेच्या उत्साही काळात करून घेतलेली बरी!नाहीतर लेने के देने पडेंगे.