किती बोलता?
By Admin | Updated: November 13, 2014 20:35 IST2014-11-13T20:35:10+5:302014-11-13T20:35:10+5:30
ही विद्यार्थी खूप उत्साही असतात. त्यांना खूप काही सांगायचे असतं. उत्साहाच्या भरात ते एवढं बोलतात की, त्यांना मध्ये थांबवावं लागतं.

किती बोलता?
>विनोद बिडवाईक -
ही विद्यार्थी खूप उत्साही असतात. त्यांना खूप काही सांगायचे असतं. उत्साहाच्या भरात ते एवढं बोलतात की, त्यांना मध्ये थांबवावं लागतं.
ंमुलाखतीत एका उमेदवाराला मी एक प्रश्न विचारला, स्वत:बद्दल काय सांगशील? त्यानं त्याची सुपरफास्ट डेक्कन एक्स्प्रेसच सुरूकेली. स्वत:बद्दल, कुटुंबाबद्दल अगदी घरात कोण कोण आहेत, पुण्यात कोणते नातेवाईक कुठे राहतात, इथपासून खायला काय आवडतं इथर्पयत. ‘लाल ङोंडे’ दाखवून त्या बोलण्याची गाडी मलाच थांबवावी लागली.
काही उमेदवार स्वत:च्या ज्ञानाचा खूप गवगवा करतात. स्वत:बद्दल आणि स्वत:च्या ज्ञानाबद्दल बोलत राहतात. मुलाखत खरंतर मुलाखतकर्ता आणि उमेदवार यांच्यामधील संवाद असतो. प्रश्नातून उत्तर आणि उत्तरातून प्रश्न जन्म घेत असतात; परंतु मुलाखत देताना किती बोलायचं काय बोलायचं याचं भान असणं आवश्यक आहे.
उगाच बडबड करणा:या व्यक्ती तुम्हाला किती आवडतात? हा प्रश्न उमेदवार म्हणून तुम्ही स्वत:लाही विचारणं आवश्यक आहे. ब:याचदा उमेदवार एखाद्या प्रश्नाचं उत्तर देताना खूप पाल्हाळ लावतात आणि योग्य उत्तर या सर्व पाल्हाळात वाहून जातं. एखाद्या प्रश्नाचं डायरेक्ट उत्तर न देता वेगवेगळ्या मार्गाने तो प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करणं अथवा वेगळचं उत्तर देणं असेही या कारण बडबडीतून दिसतं.
संवाद साधताना ब:याच प्रकारच्या विचारांची देवाणघेवाण आपण करत असतो. अशावेळेस उगाचच काहीही बोलून आवश्यक विषय टाळणा:या व्यक्ती कोणालाच आवडत नाहीत. मुलाखत घेताना मुलाखतकत्र्याला काही प्रश्नांची उत्तर थेट हवी असतात. अशावेळेस एखाद्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला माहीत नसेल तर निव्वळ स्वत:चं ज्ञान दाखवण्यासाठी उत्तर देण्याचा अट्टाहास करण्यात काहीच हाशील नाही. मला या प्रश्नाचं उत्तर माहित नाही, सर तुम्हीच मला याबद्दल थोडंसं सांगाल का, असं पोलाईटली विचारायलाही काही हरकत नाही.
पण तसं होत नाही. अनेक मुलं बडबडत राहतात. प्रश्नाला थेट हात न लावता उगाचच वायफळ बडबड करणा:या उमेदवाराला सांगा, कसं कोण सिलेक्ट करेल? तुमच्या उत्तरात काहीतरी काँक्रिट प्लॉन हवा, उगाचच कन्सेप्च्युअल विचार सांगण्यात काही अर्थ नाही.
बरेच उमेदवार मुलाखतकत्र्याच्या प्रश्नांकडे गांभीर्याने बघतच नाहीत. मात्र जगातील सर्व विषयाचं ज्ञान आपल्याला आहे असा आव आणून तुम्ही उत्तर दिली तर ती मुलाखत घेणा:याच्या नजरेतून सुटत नाहीत. आणि म्हणूनच खुपदा तरुण मुलांना वाटतं की, आपला इंटरव्हू तर खूप छान झाला. विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण दिली, मस्त गप्पाच मारल्या. पण मग तरीही सिलेक्शन का झालं नाही?
- त्याचं उत्तर हेच. तुम्ही दिलेल्या उत्तरांची क्वालिटी बघा, काय बोललात ते आठवा. आणि विचार करा की, तुमचं सिलेक्शन नक्की का झालं नसेल?