100 टक्के मार्काची सूज, कोणत्या गुणवत्तेची  परीक्षा  पाहतेय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 03:56 PM2020-08-13T15:56:58+5:302020-08-13T16:02:01+5:30

परीक्षेची भीती कमी करायचा उपाय म्हणजे गुणवत्ता फुगवत नेणं, परीक्षेची निकड आणि हेतूच नाहीसा करणं हा नसून शिक्षण, परीक्षा आणि व्यवहार यांच्यातली दरी कमी करत जाणं हा असायला हवा. पण ते राहिलं बाजूलाच, इथं मार्कच टम्म फुगले आहेत..

how come students getting 100 % marks, is our exams are not competitive enough | 100 टक्के मार्काची सूज, कोणत्या गुणवत्तेची  परीक्षा  पाहतेय ?

100 टक्के मार्काची सूज, कोणत्या गुणवत्तेची  परीक्षा  पाहतेय ?

Next
ठळक मुद्देमार्क आणि गुणवत्ता यांचा संबंध काय? -या प्रश्नातच फसलेल्या व्यवस्थेचे उत्तर आहे,

-सागर पांढरे ‘दहावीला नापास झालेल्या वीरांना तोफांची सलामी.’

‘दहावीला 89 टक्के मिळवलेल्या विद्याथ्र्याचं भवितव्य धोक्यात.’

‘दहावीला 100 टक्के मार्क मिळालेल्या पोरांनी दिला नासामधील शास्रज्ञांना न्यूनगंड’

- या अशा बातम्या अजून वाचायला मिळत नाही, हेच नशीब. बाकी नुकत्याच घोषित झालेल्या दहावीच्या निकालात अपेक्षेप्रमाणोच टक्केवारीचा अतिवर्षाव झाला आणि सोशल मीडियावर त्यावरच्या मिम्सचा. हा अभूतपूर्व गुणोत्पात बघून एकुणातच शिक्षणाच्या अतिसुलभीकरणाचा मुद्दा पुन्हा चव्हाटय़ावर आला आहे. विद्याथ्र्याना आठवीर्पयत अनुत्तीर्ण न करणं, बीजगणित-भूमितीला सामान्य गणिताचा पर्याय देणं, शालेय पातळीवर अंतर्गत मूल्यमापनात सढळ हस्ते गुणप्रदान ही धोरणं वरकरणी विद्याथ्र्यावरील अभ्यासाचा आणि परीक्षेचा ताण हलका करणारी भासतात. पण ही सरसकट सुलभीकरणाची धोरणं मुळातच केजीपासून पीजीर्पयत विद्याथ्र्यामध्ये परीक्षेची दहशत का निर्माण होते या प्रश्नापासून पळ काढण्यासाठी आखली गेली आहेत का अशी शंका उत्पन्न करतात. परीक्षेची भीती तात्पुरती दूर करण्यासाठी अतिसुलभ मूल्यमापन हे निव्वळ परीक्षाभिमुख शिक्षणपद्धतीचं द्योतक आहे. ‘ते पायथागोरसचं प्रमेय, वर्गमुळं, महायुद्ध, सनसनावळ्या, नद्या, पर्वतरांगा, गती, त्वरण, भिंगं, किरणं हे सगळं परीक्षा आणि त्या परीक्षेतल्या गुणांवर मिळणा:या गलेलठ्ठ पगाराच्या नोक:या या पलीकडे प्रत्यक्ष व्यवहारात काय उपयोगाचं असतं?’ शिक्षकांचा, पालकांचा आणि पर्यायाने विद्याथ्र्याचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे नखशिखांत भांडवलशाही शिक्षणपद्धतीला सणसणीत चपराक आहे. आणि त्याचे उमटलेले वळ लपवून मूळ प्रश्नाला बगल देण्यातच आपली शिक्षणव्यवस्था धन्यता मानत आलेली आहे. दहावीला भरगच्च गुण मिळवून विज्ञान शाखेत प्रवेश घ्या. मग बारावीला ‘नीट’ अभ्यास करून डॉक्टर व्हा किंवा रात्रीचा दिवस करून आयआयटीमध्ये प्रवेश मिळवा, मग पुन्हा रात्रीचा दिवस करून आयआयएममध्ये प्रवेश मिळवा. शेवटी नोटा हातात खेळायला लागल्या परीक्षांमधले 100 टक्के गुण मिरवणा:या गुणपत्रिका कपाटात धूळ खात पडू द्या. गुणपत्रिकेतल्या गुणात्मकतेचं निव्वळ संख्यात्मक मूल्य अशा रीतीने अधोरेखित करतानाच पर्यायाने विद्यार्जनाचं एकमेव फलित म्हणजे अर्थार्जन हेदेखील आपली शिक्षणव्यवस्था वेळोवेळी अधोरेखित करत आलेली आहे. बीजगणितातली समीकरणं सोडवता आली नाहीत तरी परीक्षा आणि मूल्यमापनात अंतर्भूत ही आर्थिक-सामाजिक समीकरणं भविष्यात सोडवणं सोपं जावं म्हणून धोका आणि ओका या द्विसूत्रीवर आपल्या परीक्षा आणि मूल्यमापन पद्धती विसंबून आहेत.

100 टक्के गुण मिळू शकणा:या परीक्षा आणि 100 टक्के गुण देणारे परीक्षक हे केवळ माहिती (इन्फॉर्मेशन)चा संचय करणारे रोबोट घडवतात, ज्ञान (नॉलेज) संपादन करू शकणारे चिकित्सक जिज्ञासू नाही. आणि याहूनही मोठं दुर्दैव हे की माहिती आणि ज्ञान यातला फरक कधीही कळणार नाही याची पुरेपूर सोय शालेय शिक्षणव्यस्थेच्या पावलावर पाऊल ठेवून आपली महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय उच्च शिक्षणव्यवस्थादेखील (काही सन्माननीय अपवादवगळता) करत आहेत. परीक्षेच्या दोन दिवस आधी विद्यापीठाच्या मागच्या दोन वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवून काढल्या की फस्र्ट क्लास ठरलेला. कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थी अनुत्तीर्ण होता कामा नये याची तजवीज केवळ शालेय पातळीवरच नव्हे तर महाविद्यालयीन पातळीवरदेखील केली जाते. कारण शाळांचा निकाल कमी लागला किंवा महाविद्यालयीन पातळीवर एखाद्या विशिष्ट विद्याशाखेतल्या विशिष्ट पेपरचा निकाल कमी लागला की सरकारी अनुदानावर आणि पर्यायाने अनेक शिक्षकांच्या नोक:यांवर गदा येणार. या अर्थकारणातल्या अडचणी तात्पुरत्या झाडून टाकून गुणवत्तेचा चकाकता आभास उभा केला जातो आणि त्यात विद्यार्थी निव्वळ परीक्षार्थी आणि पुढे वित्तार्थी होऊन बसतात. अर्थात भविष्यात सोमवार ते शुक्र वार 9 ते 5 सरकारी किंवा कॉर्पोरेट रतीब टाकणा:या अनेकांना त्यांच्या विद्यार्थी ते वित्तार्थी या प्रवासात आपल्या मूलभूत बौद्धिक आकलनक्षमतेत राहून गेलेल्या उणिवा या कधीही जाणवत नाहीत. किंबहुना त्या जाणवू नयेत याची पुरेपूर तजवीज ज्याप्रमाणो भांडवलशाहीपूरक शिक्षणव्यवस्थेने केली आहे. त्याप्रमाणो याच भांडवलशाहीवर पोसणा:या सरकारी आणि कॉर्पोरेट उद्योगव्यवस्थेनेही केली आहे.

 

‘मी आज एक सक्सेसफुल य क्ष ज्ञ कुणीतरी य क्ष ज्ञ मोठय़ा हुद्दय़ावर आहे. त्यामुळे मला 40 टक्के मिळाले असतील की 9क् टक्के?- काय फरक पडतो?’.

‘मी आज एक प्रथितयश अभिनेता/दिग्दर्शक/कलाकार आहे.

मी दहावीला विज्ञान आणि गणितात नापास झाल्याने किंवा पैकीच्या पैकी मिळवल्याने आज काय फरक पडतो? ’

‘मी बारावीला बोर्डात पहिला आलो/ पहिली आले. पण आज एक 65-70 टक्क्यांच्या आसपास पास झालेला/ झालेली माङयाहून जास्त कमावतो/कमावते. काय उपयोग माङया मेरिटचा?’

ही सर्रास ऐकू येणारी विधानं म्हणजे शिक्षणाचं भांडवलीकरण करणा:या परीक्षा पद्धतीचं घोर अपयश आहे. परीक्षेतील गुण हे व्यवहारातल्या यशापयशाचे मापदंड नाहीत हे मान्य. पण जी शिक्षणव्यवस्था परीक्षेतल्या गुणांचं व्यावहारिक मूल्य केवळ आर्थिक-ऐहिक समृद्धीच्या फूटपट्टीने ठरवत असेल त्या शिक्षणव्यवस्थेद्वारा भावी पिढीत रुजवलं जाणारं बौद्धिक, मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि एकुणातच सांगोपांग मानवी मूल्यशिक्षण हे कितपत निरोगी आणि सर्वसमावेशक असेल? पराकोटीच्या आत्मकेंद्री, भौतिक जहाल मूलतत्त्ववादाची मूळं ही काही अंशी अशाच सदोष परीक्षा आणि शिक्षणपद्धतीत आढळत असावीत का? असो. अभ्यास आणि शिक्षणाचं अंतिम संचित म्हणजे परीक्षा नव्हे हे खरं. दहावी-बारावीचं वर्ष हे सरसकट सगळ्या कुटुंबाने सुतकी चेह:याने अभ्यास, टय़ूशन, सराव परीक्षा यात गुंफून घेणं हे हास्यास्पद आहे यात शंका नाही. (श्यामची मम्मी हे नाटक या मुद्दय़ावर अत्यंत मार्मिक टिप्पणी करतं). परीक्षेची भीती नाहीशी होऊन परीक्षेला शांत चित्ताने आणि थंड डोक्याने सामोरं जायची मानसिक तयारी व्हायला हवी. पण परीक्षेची भीती कमी करायचा उपाय म्हणजे गुणवत्ता फुगवत नेणं, परीक्षेची निकड आणि हेतूच नाहीसा करणं हा नसून शिक्षण, परीक्षा आणि व्यवहार यांच्यातली रुंदावत जाणारी दरी कमी करत जाणं हा असायला हवा. या पाश्र्वभूमीवर नुकतंच जाहीर झालेलं शैक्षणिक धोरण काय ठोस भूमिका मांडतं हे बघणं औत्सुक्याचं ठरेल.

Web Title: how come students getting 100 % marks, is our exams are not competitive enough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.