शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 03:00 IST

तुझ्या डोळ्यात पाऊस दिसतो असं कुणी म्हणो ना म्हणो, पावसात डोळ्यांची काळजी घेतली नाही तर डोळे लाल होणारच.

ठळक मुद्देसेल्फ मेडिकेशन अर्थात डोळे चुरचुरतात म्हणून स्वतर्‍च्या मनानं किंवा गुगल करून, मित्रांच्या सल्ल्यानं डोळ्यात कुठलीही औषधं, ड्रॉप्स टाकू नका.

- पवित्रा कस्तुरे

पावसाळा रोमॅण्टिक वाटतो, तुझ्या डोळ्यात पाऊस दिसतो वगैरे म्हणतात काहीजण. ते खरंखोटं त्यांचं त्यांच्याकडे. पण, ‘जीवन से भरी तेरी आंखे, मजबूर करे जीने के लिए’ असं आपल्याला कुणी म्हणो ना म्हणो, आपल्या जीवनात तरी आपले डोळे फार महत्त्वाचे आहेत. इतरांना ते काही सांगो ना सांगो, इतरांना आपल्या नजरेची भाषा कळो ना कळो, आपल्याला मात्र ती भाषा कळली पाहिजे. आपले डोळेही आपल्याशी बोलत असतात. पावसाळ्यात तर जरा जास्तच बोलतात. त्यासाठी त्यांची भाषा कळली पाहिजे. ती कळण्यासाठी अर्थात स्वतर्‍कडे लक्ष द्यायला पाहिजे. पण तेवढाही वेळ नसेल तर किमान डोळे दाखवत असलेली काही लक्षणं तरी पाहा. तुम्हाला काही तक्रारी वारंवार होत असतील तर डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जा.पावसात भिजलं की हमखास अनेकांचे डोळे लाल होतात, चुरचुरतात. डोळे येतात. त्यातून पाणी वाहतं आणि डोळ्यांची आग काही उमजू देत नाही. त्यामुळे पावसाचा रोमान्स राहतो बाजूलाच आणि डोळे वाचवा मोहीम सुरू होते. त्यात हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे आपल्यामुळे इतरांना प्रसाद मिळणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागते. खरंतर दरवर्षी पावसाळ्यात आपल्याकडे डोळे येण्याची साथ येते. स्वच्छतेची माहिती देत जनजागृतीही होते पण तरीही हा आजार वाढतोच. पाऊस आत्ताच कुठं सुरू झालाय. त्यामुळे यंदा तरी आपले डोळे येऊ नयेत म्हणून काही गोष्टी रोज ठरवून करायला हव्यात. डोळे येणं हा आजार एक प्रकारचं बॅक्टेरिअल इन्फेक्शन असतं. फंगल, केमिकल इन्फेक्शनमुळेही डोळे येतात. त्यामुळे काही गोष्टी टाळल्या तर आपण आपले डोळे येणार नाहीत इतपत खबरदारी घेऊ शकतो.

1) कितीही आवडत असले तरी दुसर्‍या कुणाचे काजळ, लिपस्टिक, डिओ, परफ्यूम किंवा अन्य कॉस्मेटिक्स या काळात वापरू नयेत.2) दुसर्‍याचा अंघोळीचा टॉवेल वापरू नये.3) इतरांचे नॅपकिन वापरू नयेत. घरातले हात पुसायचे नॅपकिन सतत धुवावेत. 4) ऑफिसला नेतो ते रुमाल रोज धुवावेत. काहीजण अनेक दिवस हे रुमाल धूत नाहीत. किंवा न धुताच पुन्हा पुन्हा वापरतात.5) बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुवा. 6) ज्यांचे डोळे आलेत अशा सहकार्‍यांपासून किंवा सहप्रवाशांपासून लांब राहा.7) लेन्स वापरत असाल तर त्यांची योग्य काळजी घ्या.8) आपला रोजचा चष्माही रोज स्वच्छ करा.9) अनेकांना सारखे डोळे चोळायची सवय असते. तसं करू नका.10) सॅनिटायझर वापरा. हात स्वच्छ असल्याची खात्री करूनच गरज पडल्यास डोळ्यांना हात लावा.11) सेल्फ मेडिकेशन अर्थात डोळे चुरचुरतात म्हणून स्वतर्‍च्या मनानं किंवा गुगल करून, मित्रांच्या सल्ल्यानं डोळ्यात कुठलीही औषधं, ड्रॉप्स टाकू नका. 12) सतत कम्प्युटरवर काम केल्यानं किंवा वाचल्यानं, टीव्ही पाहताना, अंघोळ झाल्यावर, पावसात भिजल्यावर या कशाहीपेक्षा किंवा यापैकी कुठलंही कारण नसताना जर डोळे लाल होत असतील तर डोळ्यांना त्रास होतोय हे समजून वेळीच डॉक्टरचा सल्ला घेणं उत्तम.