गुरुकृपा व्हावी, अजून काय मोठं?

By Admin | Updated: July 18, 2016 17:19 IST2016-07-18T16:20:07+5:302016-07-18T17:19:38+5:30

प्रत्येकाच्या आयुष्यात पहिले गुरु असतात ते आई-वडील. कारण तेच आपल्याला चालायला, बोलायला शिकवतात. त्यांच्याच मदतीने आपण पहिले पाऊल टाकतो आणि नंतर धडपडत धावायलाही लागतो.

Gurukrupa, what is the bigger yet? | गुरुकृपा व्हावी, अजून काय मोठं?

गुरुकृपा व्हावी, अजून काय मोठं?

- रोहित नाईक

प्रत्येकाच्या आयुष्यात पहिले गुरु असतात ते आई-वडील. कारण तेच आपल्याला चालायला, बोलायला शिकवतात. त्यांच्याच मदतीने आपण पहिले पाऊल टाकतो आणि नंतर धडपडत धावायलाही लागतो. बोबडे बोल निघेपर्यंत आपल्याला आजूबाजूच्या परिसराच्या तोंडओळखही झालेली असते आणि नंतर आई - बाबांचेच बोट पकडून आपण शाळेतही प्रवेश करतो. येथे आपली ओळख होते ती जगाशी ओळख करुन देणाऱ्या गुरुंशी. आई - वडिलांमुळे आपले पहिले पाऊल या सुंदर विश्वात पडते, तर आपले हेच पाऊल भक्कम करण्याचे काम आपले शिक्षक करीत असतात....

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर:!
गुरु: साक्षात प्रब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:!!

शाळेत प्रत्येक दिवसाची सुरुवात याच प्रार्थनेने व्हायची. आजही शाळेतली प्रार्थना ऐकल्यावर किंवा म्हटल्यावर शाळा आणि शाळेतले शिक्षक डोळ्यांसमोर नक्की येतात. पण कॉलेजमध्ये आल्यानंतर या प्रार्थनेचा आपल्याला विसर पडलेला असतो. कॉलेज कॅम्पसमध्ये एन्ट्री केल्यावर आपली सुरुवात ‘हाय ड्यूड व्हॉट्स अप?’ अशी सुरुवात होते. शाळेतल्य शिक्षकांसाठी आपल्या मनात भीतीयुक्त आदर असायचा. कॉलेजमध्येही आपण आपल्या ‘प्रोफेसरांचा’ आदर करतोच; मात्र ती भीती अजिबात दिसत नाही. उलट या प्रोफेसरांसोबत प्रत्येकाचे मैत्रीचे रिलेशन झालेले असते. 
शाळेत गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिक्षकांना पुष्पगुच्छ देतानासुध्दा मनात धाकधूक व्हायची आणि कॉलेजमध्ये आम्ही बिनधास्त टिचर्ससह फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करताना त्यांच्या हातावर ‘बॅण्ड’ बांधून मोकळे होतो. इतकंच नाही, तर टिचर्सना आपल्या ग्रुपमध्ये सामील करुन त्यांच्या खांद्यावर हात ठेवून एक हटके फोटोही काढतो. 
स्टुडंट्स आणि प्रोफेसर्स यांच्यात हसते - खेळते वातावरण असावे आणि ते असलेच पाहिजे, पण त्यालाही काही मर्यादा आहेत. प्रत्येक कॉलेजियनने आपली जागा ओळखली पाहिजे. आज जर एखाद्या प्रोफेसरने संपुर्ण वर्गासमोर एखाद्याला खडसावले, तरी तो विद्यार्थी आपला ‘अपमान’ झाल्याचे समजून वर्षभर त्या शिक्षकाच्या वाकड्यात शिरतो. आपल्याला हे कळलं पाहिजे की, शिक्षक आपल्याला हौस म्हणून आपल्यावर रागवत नसतात. त्यांनी दाखवलेल्या चुका आपण सुधरल्या, तरंच आपण यशस्वी होतो. त्यांच्यामागे खूप मोठा अनुभव असल्याने त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकण्याची संधी असते. 
आई - वडिल हे आपले घरातले पालक असतात, तर शिक्षक हे आपल्या बाहेरच्या जगातले पालक असतात. त्यामुळेच तर टीचर्सच्या मार्गदर्शनाचे पालन केले तर आपल्याला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही...
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..... 

Web Title: Gurukrupa, what is the bigger yet?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.