शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

गरबा-दांडिया खेळताय, नवीन काही हवं, हे घ्या नवीन स्टायलिश पर्याय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 18:02 IST

नवरात्रात दांडियाचे प्लॅन्स आहेत. रोज काय घालणार हा प्रश्न पडलाय? मग हे घ्या 10 दिवस पुरून उरतील इतके स्टायलिंगचे आणि ट्रेण्डी लूकचे पर्याय!

ठळक मुद्देगरब्यासाठी ऑल टाइम हिट ड्रेसकोड म्हणजे अर्थातच घेरदार घागरे, चनिया चोली हेच. पण यंदा  घागर्‍याबरोबरच अन्य बरेच, ट्रेण्डी तरीही ट्रॅडिशनल नक्कीच ट्राय करता येईल.

- सारिका पूरकर-गुजराथी 

ढोलीदा. ढोलीदा. ढोल हय्या मा वागे वागे ढोलीदाहा ठेका आणि हे सूर आता चांगलेच घुमू लागतील. हातात दांडिया घेऊन, छान नटून थटून पावलं आपसूकच थिरकू लागतील. तसं तर दरवर्षीच  यंगिस्तानमध्ये कमालीची उत्सुकता असते. गरबा रास खेळण्याची एक वेगळीच हौस असते. ज्यांना डान्स येत नाही तेदेखील क्लास लावून गरबा शिकून घेतात. आणि नखशिखांत सजून-धजून, मनसोक्त दांडिया, गरबा खेळण्यात रमतात. यंदाच्या नवरात्नीसाठीची तयारीही जय्यत करायची असेल, पारंपरिक पण तरीही हटके लूक हवा असेल तर त्यासाठी या काही टिप्स.तसंही गरब्यासाठी ऑल टाइम हिट ड्रेसकोड म्हणजे अर्थातच घेरदार घागरे, चनिया चोली हेच. पण यंदा  घागर्‍याबरोबरच अन्य बरेच, ट्रेण्डी तरीही ट्रॅडिशनल नक्कीच ट्राय करता येईल. त्यासाठी भरपूर ऑप्शन उपलब्ध आहेत, तेच या नवरात्नीचे नवे ट्रेण्ड्स.

       कॉटन कुर्तीज एरव्हीही आपण शर्ट कुर्ती, ए लाइन कुर्ती घालतोच, नवरात्नीसाठी याच कुर्तीला ट्रॅडिशनल टच दिला जातोय. भरपूर घेर असलेली कॉटनची ब्लॉक प्लिटेड वन पीस कुर्ती. त्यावर पारंपरिक भरतकामाने दिलेला डिझायनर लूक इन आहे. कुर्तीजचे रंग मात्न लाल, केशरी, पिवळा, निळा, जांभळा असे उत्सवी हवेत. कॉटन, कॉटन सिल्क, बांधणी, कोटा दोरिया, इकत या कापडांच्या कुर्ती फेस्टिव्ह लूकही देतात आणि थेट ऑफिस, कॉलेजातून गरब्याला जाण्याची मुभाही!

       चनिया चोलीहा ट्रेण्ड कधीच आउटडेटेड होणार नाही असा आहे. परंतु यंदा त्यातही काही डिफरंट करणं शक्य आहे. सुती धाग्यांपासून बनलेले गोंडे चोलीला व दुपट्टय़ाच्या बॉर्डरवर लावा. बघा, लूक बदलतो की नाही. कलमकारी, इकत चनिया चोली, घागरा चोली हा प्रकार इन आहे, तोदेखील ट्राय करा. कॉन्ट्रास्ट लेअर्ड चनिया चोलीदेखील वेगळा पर्याय ठरू शकतो. मल्टिकलर ब्लाउज/चोलीबरोबर कलरफूल शरारा घालून पाहा. नेट दुपट्टा यावर घाला. बीड, स्टोन वर्क करून केलेले राबरी, बाणी भरतकाम केलेले घागरे हे नेहमीच इन राहतील.        सलवार-कमीज नवरात्नीत कुणी सलवार-कमीज घालून दांडियाला जातं का, किती ऑड दिसतं ते असं मानण्याचा एक काळ होता; पण आता तो काळ मागे पडला. नवरात्रीच्या ड्रेसकोडमध्ये आता सलवार-कमीजदेखील इन आहे. प्लेन घेरदार अनारकली कुर्ती, चुडीदार व त्याला साजेसे बनारसी, बांधणी, लहरिया, क्विर्ली प्रिंटेड दुप्पटे हादेखील गरब्यासाठी मस्तच इन पर्याय आहे.       जॅकेट्सअनारकली, फ्रॉक कुर्तीवर आरसेकाम, कच्छीकाम केलेले कॉटनचे वेस्टकोट्स, जॅकेट्स हा सोपा-सुटसुटीत पण तरीही हटके पर्याय आहे ट्रॅडिशनल लूकसाठी. सध्या हा ट्रेण्ड खूप हिट आहे. डेनिम जॅकेटवर कच्छी आरसेकाम हा प्रकारही खूप छान वाटतो. फ्लोरल प्रिण्टचे, भौमितीय प्रिण्टचे, मोतीने सजवलेले जॅक्वॉर्ड हादेखील परफेक्ट ट्रेण्ड आहे. नुकत्याच रिलिज झालेल्या लवयात्नी या चित्नपटामुळे हा ट्रेण्ड झपाझप हिट होतोय. विशेष म्हणजे तरुणांच्या नवरात्नी आउटफिटसाठीही हे ट्रेण्डी जॅकेट्स भन्नाट ठरू शकतात.       पलाझो आणि स्कर्ट्सकॉटनचे घेरदार स्कर्ट, पलाझो पॅण्ट्सवर स्ट्रेट स्लिट कुर्ती हा सुटसुटीत पर्यायदेखील इन आहे. त्यातही वेगळे हवे असेल क्रि ंकल्ड स्कर्टवर स्ट्रेट स्लिट व मुगल प्रिण्टचा कुर्ता नक्की घालून पाहा. बॅक लॉँग कुर्तीदेखील पलाझोवर घालता येईल. 

       मिक्स अ‍ॅण्ड मॅच इंडो-वेस्टर्न फ्युजनदेखील यास म्हणता येईल. हॉटेस्ट ट्रेण्ड म्हणून हा पर्याय इन आहे. विविध पॅटर्नस, फेब्रिक्स, भरतकाम, कन्सेपट्स वापरून ही स्टाइल कॅरी करता येईल.सिल्क, कलमकारी, कॉटन घागर्‍यावर क्र ॉप टॉप, पलाझो किंवा ब्रोकेड पॅण्ट्सवर हाय-लो टय़ुनिक हादेखील हटके लूक देतो. अ‍ॅसेममेट्रिकल कुर्ती, केपस जॅकेट, फ्रण्ट स्लिट कुर्ती असे विविध पर्याय यात तुम्ही मिक्स अ‍ॅण्ड मॅच पद्धतीने वापरू शकता.       साडीतही आहे स्टाइल 

 साडीचा जलवा आणि तिची एव्हरग्रीन फॅशन व्हॅल्यू यंदाच्या नवरात्नात आणखी वाढवता येईल. फ्युजन लूकसाठी ऑफ शोल्डर टॉप घालून साडी नेसण्याचा एक ट्रेण्ड आहे. बांधणी या ट्रॅडिशनल साडीवर प्लेन, कॉन्ट्रास्ट रंगाचा क्र ॉप टॉप तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे नक्कीच ठरवेल. हातमागाच्या साडय़ा, नैसर्गिक धाग्यांपासून विणलेल्या साडय़ादेखील तुम्ही ट्राय करू शकता. गडद गुलाबी, रॉयल ब्लू, मस्टर्ड यलो हे रंग त्यात खुलून दिसतील. कण्टेपररी पण तरीही स्टनिंग लूक सहज मिळेल. साडी वेगवेगळ्या पद्धतीने नेसूनही वेगळा लूक मिळवता येईल. 

       धोती पॅण्ट्स  हा कम्फर्टेबल ट्रेण्ड आहे. प्लेअर्ड शॉर्ट टॉप व धोती पॅण्ट घालून तुम्हाला कितीही गरबा खेळलात, तरी अनइझी वाटणार नाही. त्यावर चांदीचे दागिने घालायला मात्न विसरू नका. पुरुषांसाठी हाच ट्रेण्ड केडिया ड्रेस म्हणून नेहमीप्रमाणेच इन आहे.      दागिने काय घालाल?

ऑक्सडाइड, सिल्व्हर मेटलचे दागिने हे तर आपण नेहमीच नवरात्नी ड्रेसवर घालतोच. यंदा मात्न फेंटो ज्वेलरी, गुजरातची टर्बन ज्वेलरी घालून पाहा. कन्टेम्पररी दागिनेही ट्राय करायला हरकत नाही. 

केसांचं काय?       हेअरस्टाइल र्‍ केसांचा लो बन किंवा हाय बन, ब्रेडेड बन हा बेस्ट ऑप्शन आहे नवरात्नीच्या हेअरस्टाइलसाठी. या बनला तुम्ही कृत्रिम फुले, ब्रोचेस, मोती यांनी सजवू शकता. तरुणांसाठी काय स्पेशल?       विदाउट शर्ट? सलमान खानचा हा ट्रेण्ड तुम्ही नवरात्नात ट्राय करू शकता. मात्न अगदीच विदाउट शर्ट लूक नसतो म्हणा तर स्लीव्हलेस ट्रेण्डी (भरतकाम केलेले) जॅकेट्स व ब्लॅक धोती असा लूक कॅरी करता येईल.    कुर्ता-पायजमा  पुरुषांच्या कुर्ता-पायजमामध्ये देखील असंख्य व्हरायटीज उपलब्ध आहेत. त्यातल्या त्यात सिल्क किंवा कॉटनचा, रॉयल ब्लू कलरचा कुर्ता हा ट्रेण्ड इन आहे.       जॅकेट्स पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे प्रचलित झालेला हा ट्रेण्डही कायम इन राहणार आहे. चायनीज कॉलर जॅकेटसारखे पर्याय कुर्ता-पायजम्यावर ट्राय करायला हरकत नाही.       रजवाडी पॅटर्न एथनिक, ट्रॅडिशनल लूकसाठी हा उत्तम पर्याय आहे. प्रिण्टेड धोती पॅण्टवर पलेन रजवाडी कुर्ता तुम्हाला रॉयल बनवणार हे नक्की, कुर्ता मात्न मोरपिशी, मॅजेण्टा, गोल्डन यलो असेल तर आणखी खुलून दिसेल.       जॉगर विथ कुर्ता कम्फर्टेबल लूकसाठी हा इन आहे. जॉगर पॅण्टवर सिल्कचा शॉर्ट, अ‍ॅपल कट कुर्ता, फ्रण्ट स्लिट कुर्ता ट्राय करा.       अफगाणी पॅटर्न  व्यक्तिमत्त्वाला रूबाब देणारा हा ट्रेण्ड इन आहे. नेवी ब्लू स्लिट कुर्ता, केशरी दुपट्टा फ्युजन लूक देईल.       पांढर्‍या रंगाची शान शुभ्र पांढर्‍या रंगाचा चुडीदार, अ‍ॅपल कट शॉर्ट कुर्ता व त्यावर सोनेरी धाग्याने भरतकाम केलेले जॅकेट तुमचा नूर खुलवण्यासाठीच इन ट्रेण्ड आहे.       शेरवानी  बेबी पिंक रंगाची शेरवानी, सोनेरी रंगाची चुडीदार घालून तुमची ऐट क्या कहने अशीच असणार आहे.     दाढी हटकेवाली बिअर्ड दाढी, ऑक्सडाइड रिंग, इअररिंग, कोल्हापुरी चप्पल हे तुमच्या ड्रेसकोडला आणखी खुलवतील हे सर्व फॉलो केल्यावर टॅटू गोंदवून घ्यायला आणि वॉटरप्रूूफ मेकअप करायला विसरू नका, कारण त्याशिवाय नवरात्नीचा हा शृंगार अपूर्ण  आहे.