शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

शिकायचं म्हणून नोकरीतून ‘गॅप’, पैसे कमवायचे म्हणून शिकण्यातून ‘गॅप’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 2:45 PM

हवं ते शिकायचं म्हणून नोकरीतून गॅप घेणं, शिक्षणासाठी पैसे साचवायचे म्हणून गॅप घेऊन नोकरी करणं, सेवाक्षेत्रात पडेल ते काम करणं असं करणारे तरुण नक्की काय करत असतात?

ठळक मुद्देटेढ़ा हैं, पर मेरा हैं!

प्राची  पाठक 

आजकाल सभोवार कुठेही नजर टाका. काय करत आहेत तरुण मुलंमुली? सगळीच मुलं काही मेरिट होल्डर्स नसतात. डॉक्टर, इंजिनिअर या ठरावीक क्षेत्रांचं आकर्षण कोणाला असतं, कोणाला नसतंही. तसं अनेकजण स्पष्ट सांगतात.नेहमीच्या दोन-चार स्ट्रीम्सपलीकडे खूप काही वेगवेगळं मुलं-मुली करताना दिसतात. एकदम कडेकोट भिंत घातल्यासारखं आर्ट्स, सायन्स, कॉमर्स असं फारसं विद्यापीठांमध्येही आता सुदैवानं राहिलेलं नाही. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या शाखांच्या वेगवेगळ्या विषयांमध्ये तुम्ही ग्रॅज्युएट होऊ शकतात.विचार करा का केली असेल शिक्षणसंस्थांनी ही नवीन सोय?कारण या शिक्षण क्षेत्रातल्या वॉटर टाइट भिंती चुकीच्या आहेत, हे त्यांच्याही लक्षात येत चाललं आहे. बुद्धिमत्ता वेगवेगळ्या प्रकारची असते, हे त्यांनी समजून घेतलं. किमान काही विद्यापीठं तरी विविध शाखांचे विषय शिकायची सोय शिक्षणाच्या सुरुवातीपासूनच देऊ लागली आहेत. डिस्टन्स लर्निगमध्येसुद्धा खूप मुलं मुली असतात. काही ऑनलाइन कोर्सेस घरबसल्या करतात. त्यांच्यामुळे आधीच्या शिक्षणाला व्यवसायाभिमुख जोड देता येते. कोणी विविध कला प्रकारांमध्ये करिअर करायचं ठरवतात.‘आधी नोकरीचं काय ते बघा आणि मग असली थेरं करा’, हे डायलॉग्ज कमी झाले नसले तरी जरात यांचा टोन कमी झाला आहे. विविध प्रकारचे करिअर करून चांगली कमाई करणारी काही यशस्वी उदाहरणं तरी आजूबाजूला दिसू लागली आहेत.हेच पहा ना, नृत्य प्रकार म्हणजे मुलींचं क्षेत्र आणि खेळांमध्ये मुलगेच जास्त, असंही आता फारसं राहिलेलं नाही. पुरुषांच्या डान्स अकॅडमी असतात. ते पूर्ण वेळ या कामात असतात. त्यातही देशी-विदेशी अनेक नृत्य प्रकार असतात. अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये मुलं भाग घेतात, तरुण मुलं काय नाचतात म्हणून लोक दाद देतात. त्याला आता जिम इंडस्ट्रीची जोडसुद्धा मिळते. डाएट कौन्सिलर्स, जिम इन्स्ट्रक्टर म्हणून कितीतरी तरु ण मुलं मुली पूर्णवेळ या प्रोफेशनल सेवांमध्ये कार्यरत असल्याचं दिसतं. मनापासून ते हे काम एन्जॉय करणारे भेटतात. मिळणार्‍या मोबदल्याबद्दल समाधानी असतात. पुढच्या संधींविषयीही बोलतात. त्यासाठी नवनवीन काही गोष्टी शिकतात. अपडेट तर राहावंच लागतं म्हणतात.नोकरीच्या ज्या संधी पूर्वी अस्तित्वातच नव्हत्या, अशा अनेक संधी सध्या तरुण मुलामुलींना  उपलब्ध आहेत. कॉल सेंटर्स तसे जुने झाले; पण सव्र्हिस इंडस्ट्री झपाटय़ानं वाढली. मोबाइल गॅलरी, त्यांचे कस्टमर केअर विभाग, ऑनलाइन मार्केटिंग,  वेगळ्या ब्रँडचे आउटलेट्स, मॉल्स, ऑनलाइन फुड कंपन्या, अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लेव्हल्सच्या पोस्ट्सवर तरुण मंडळी काम करत असतात. त्यातले सगळेच काही एकदम वॉटर टाइट अशा आर्ट्स, सायन्स, कॉमर्स अशा शिक्षणातून आलेले नसतात.युनिसेक्स सलूनमध्ये स्टायलिस्ट म्हणून काम करणारे, ड्रेस डिझायनर्स, बँकिंग अ‍ॅण्ड फायनान्समध्ये दिसणारे तरुण, वेगवेगळ्या स्टार्टअ‍ॅप इनिशिएटिव्हमध्ये असणारे तरुण यांच्याशी बोललं तर वेगळंच जग कळतं. कोणी फिशरी सायन्समध्ये करिअर करत असतं. कोणी डिझाईन, गेमिंग आणि  इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये असतं. कोणी एथिकल हॅकिंगमध्ये असतं, तर कोणी ब्रॅण्डिंग, मार्केटिंग आणि कण्टेण्ट रायटिंगमध्ये असतं. कोणी समजून उमजून शेती करायला घेतं. हेल्थ केअर सेक्टरमध्ये केवळ नर्सेसच दिसतात असंही नाही. केअर टेकर म्हणून तरु ण मुलांना त्यात खूप जास्त संधी उपलब्ध आहेत. नर्सिग शिकून सिस्टर सारखंच ब्रदर होणं हा पर्याय तर आता जुना होत आला इतके तरुण नर्सिग इंडस्ट्रीत दिसू लागले आहेत.आजच्या मुलांना सर्व काही इन्स्टंट हवंय, शरीर कष्टाची कामं नकोत, असा सहजच शिक्का मारण्यासारखं आता काहीही उरलेलं नाही, हाही एक नवीन बदल आहे. आजूबाजूच्या वातावरणात इतकी वेगवेगळी अट्रॅक्शन्स असताना कमवा आणि शिका ट्राय करणारे, कॉलेजेसच्या सुटीत पार्टटाइम जॉब करणारे असे वेगवेगळे ट्रेण्ड्स तरु ण मुलांच्या करिअरमध्ये दिसायला लागले आहेत. टेढ़ा हैं, पर मेरा हैं असाच अप्रोच या जनरेशनचा आहे. सरळ रस्ते सोडून जरा वळणावळणानं जातात; पण हवं ते करून पाहतात, हे किती आशादायी आहे!