फन फोटो एडिट

By Admin | Updated: December 5, 2014 11:41 IST2014-12-05T11:41:39+5:302014-12-05T11:41:39+5:30

स्मार्ट फोन वापरून काढलेल्या फोटोला द्यायचाय एखादा प्रोफेशनल लूक?

Fun photo edit | फन फोटो एडिट

फन फोटो एडिट

 

स्मार्टफोनमध्ये पॉवरफुल कॅमेरे मिळाले आणि जो तो फोटोग्राफर बनला. आपली फोटोग्राफीची हौस भागवू लागला. पण फक्त ‘क्लीक’ केलं, निघाला फोटो म्हणजे झालं काम असं थोडंच आहे. कारण फोटो तर आपण हौशीनं काढतो; पण पुढं त्या फोटोंचं काय होतं कळत नाही, ते सापडतही नाहीत आणि आठवतही नाहीत. त्यासाठी खरं तर फोटोचा व्यवस्थित डिजिटल अल्बम तयार करणं, व्यवस्थित बॅकग्राऊंड टाकणं, वेगवेगळ्या फ्रेम बॉक्समध्ये फाटो बसवणं, फोटोंचे कोलाज तयार करणं, काढलेल्या फोटोला वेगवेगळे इफेक्ट देणं याही गोष्टी आता जमायला हव्यात. मात्र हे सारं करायचं तर आपल्याला फोटोशॉप किंवा तशाच काही खास सॉफ्टवेअरचं ज्ञान हवं. एकतर ते अनेकांना जमत नाही आणि त्यात ती सारी सॉफ्टवेअर्स तुमच्या कॉम्प्युटरमध्ये असतात, म्हणजे काम वाढलं. मोबाइलमधले फोटो कॉम्प्युटरवर घ्यावे लागतात. एवढं कोणी करत नाही.
पण समजा, एखादं सोपं अँप मिळालं आणि फोनवरूनच आपल्या फोटोत काही टेक्निकल काम करता आलं तर? तुमचा फोन खर्‍या अर्थानं स्मार्ट होऊन काम करेल. तसंच काम करू शकणार्‍या एक जादुई अँण्ड्रॉईड अँपचे नाव आहे ‘फो डॉट टो लॅब- फन फोटो एडिटर. ढँ.३ छुं - ऋ४ल्ल ढँ३ ए्िर३१ !
हे अँप कसं काम करतं? 
हे अँप स्मार्टफोनवर डाऊनलोड करून इन्स्टॉल केलं की स्मार्टफोनवर त्याचा आयकॉन तयार होतो. यामध्ये  जवळपास पाचशे सत्तर विविध स्टायलीश तसेच फनी फोटो इफेक्ट उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, हे इंटरनेट बेस अँप असल्यामुळे कितीही हाय क्वालिटी आर्ट वर्क तयार केलं तरी स्मार्टफोनच्या मेमरीवर लोड येत नाही. त्याचबरोबर  फोटोवर डिजिटल प्रक्रिया करून तो फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची सुविधासुद्धा हे अँप देतं. फोटो ब्ल्यू टूथद्वारे शेअर करता येतो, इमेल पाठवता येते, पीडीएफसुद्धा करता येतो. 
ढँ.३ छुं - ऋ४ल्ल ढँ३ ए्िर३१! हे अँप तुम्हाला गुगल प्लेवर मोफत उपलब्ध आहे. 
फीचर्स कुठली आहेत?
१) फोटो फ्रेम्स
यामध्ये विविध फोटोफ्रेम रेडी उपलब्ध आहेत. हवी ती फ्रेम निवडायची आणि हवा तो फोटो त्यामध्ये बसवायचा, झालं काम. एक-दोन मिनिटांत फोटो डिजिटल फ्रेमसह तयार होतो. 
2) न्यू रिअँलिटी
यामध्ये बर्थ डे कप केक कार्ड, पेन्सिल ड्रॉईंग, ओल्ड फोटो बुक, फोन इन हँड, मिरर रूम, वॉटर फॉल, समर लव्ह, बबल्स ऑन दी बीच, फुटबॉल चॅम्पियनशिप, वेडिंग मार्च, मॉर्निंग कॉफी यांसह अनेक वेगवेगळ्या प्रकारामध्ये फोटो तयार करता येऊ शकतात. यामध्ये एकशे छत्तीस वेगवेगळे इफेक्ट उपलब्ध आहेत.
3) कलर फिल्टर
कलर फिल्टरचे चौदा वेगवेगळे इफेक्ट इथं मिळतात. रेड बुस्ट, ड्रिमी रेट्रो, ब्ल्यू ओन्ली, पोस्टर लूक, सनी रेट्रो, फॅन्टसी ब्ल्यू, ग्रीन ओन्ली, हॉट सनसेट यांसारखे पर्याय कलर फिल्टरसह उपलब्ध. आहेत. 
5) मॅगझिन कव्हर
आंतरराष्ट्रीय मॅगझिनच्या कव्हरवर आपला फोटो यावा असं कुणाला नाही वाटतं? ती हौसही आपली आपल्याला भागवता येऊ शकते. बारा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय मॅगझिन कव्हर या अँपमध्ये आहेत. प्लेबॉय, फोर्ब्स, कॉस्मोपॉलिटन, पीपल यांसारख्या बड्या मॅगझिनच्या कव्हरवर झळकायची हौस घरच्याघरी भागवता येऊच शकते. याशिवाय वेगवेगळ्या देशांचे झेंडेही तुम्ही टॅटूसारखे फोटोवर चिकटवू शकता. 
- अनिल भापकर
anil.bhapkar@lokmat.com

Web Title: Fun photo edit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.