शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

रोबोटला शिकवण्याचा भन्नाट जॉब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 07:00 IST

एकसुरी, एकसाची काम करणार्‍या माणसांचं काम रोबोट पळवतील पण रोबोटला कामाला लावण्याचं काम माणसांना मिळेलच!

ठळक मुद्देप्रत्येक ठिकाणी माणसाची जागा यंत्रमानवीकरणाची संकल्पना घेईल अशी दाट शक्यता आहे.

अतुल  कहाते  

अनेक कार्यालयांमध्ये कर्मचारी करत असलेलं काम एकसुरी प्रकारचं असतं. उदाहरणार्थ कुठल्याही कंपनीच्या ग्राहकसेवा विभागामध्ये काम करत असलेले लोक आपल्या ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. यामधले बरेचसे प्रश्न खरं म्हणजे एकसारखे असतात, ग्राहक तेच ते प्रश्न विचारतात. उदाहरणार्थ एखाद्या बॅँकेमध्ये फोन करून ग्राहक आपल्या खात्यामध्ये किती रक्कम शिल्लक आहे हा प्रश्न विचारतो. हाच प्रश्न असंख्य ग्राहक विचारत असतात. तसंच मोबाइल फोन सुविधा पुरवणार्‍या कंपन्यांना फोन करून ग्राहक वेगवेगळ्या व्हॉईस किंवा डेटा पॅक्सविषयी विचारतात. एकच प्रश्न असंख्य ग्राहकांकडून खूपदा विचारला जातो. अशा प्रश्नांची उत्तरं देण्याच्या कामांसाठी संबंधित कंपन्यांना मनुष्यबळ नेमावं लागतं. खरं म्हणजे या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी फार कौशल्य लागत नाही. शिवाय असं मनुष्यबळ नेमण्यामुळे कंपन्यांचा खर्च खूप वाढतो. यावर उपाय म्हणून अलीकडच्या काळात यंत्रमानवीकरणाची म्हणजेच ‘रोबोटिक प्रॉसेस ऑटोमेशन’ची संकल्पना वापरण्यावर भर दिला जातो. याचं ठळक उदाहरण म्हणजे अनेक बॅँकांच्या वेबसाइटवर आता आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी ‘चॅटबॉट्स’ असतात. याचा सोपा अर्थ ‘आपल्याशी चॅटिंग करू शकणारे रोबोट्स अर्थात यंत्रमानव’ असा होतो. म्हणजेच आपण या वेबसाइटवर या चॅटबॉटला प्रश्न विचारला की तो आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. हा चॅटबॉट म्हणजे संगणकांसाठीच्या भाषेतला एक प्रोग्रॅम असतो. तो काही माणूस नसतो. आपला प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करून तो त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.

हे भविष्यात महत्त्वाचं का ठरेल?

सगळ्याच उद्योगांना आणि कंपन्यांना आपलं उत्पन्न शक्य तितकं वाढवणं आणि आपला खर्च शक्य तितका कमी करणं यावर भर देण्याची गरज भासते. ज्या कंपन्या थेट किंवा अप्रत्यक्षरीत्या ग्राहकसेवा पुरवतात त्यांच्या बाबतीत तर हे खूपच गरजेचं असतं कारण त्यांचा मुख्य खर्च मनुष्यबळावर होतो. आपल्या ग्राहकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना माणसं नेमावी लागतात, कॉल सेंटर्स चालवावी लागतात. त्या खर्चात कपात करण्यासाठी त्यांनी यंत्रमानवीकरणाची मदत घ्यायला सुरुवात केली आहे. भविष्यात यावर जास्तीत जास्त भर देण्याचा या कंपन्यांचा मानस आहे. उदाहरणार्थ काही भारतीय बॅँकांनी लवकरच आपण ‘मनुष्यविरहित बॅँकिंग’ सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं जाहीर केलेलं आहे. म्हणजेच आपण एखाद्या बॅँकेच्या शाखेत जरी गेलो तरी तिथं आपलं काम करण्यासाठी कदाचित एकही माणूस नसेल. यंत्रमानवच आपलं काम पूर्ण करून देण्याएवढे सक्षम असू शकतील. फार तर अगदी क्लिष्ट किंवा यंत्रमानवांच्या क्षमतेच्या पलीकडचं काही काम असेल तर त्यासाठी एक-दोन माणसं बॅँकांनी प्रत्येक शाखेत नेमलेली असतील. उरलेली सगळी कामं मात्र यंत्रमानवीकरणामुळे होऊन जातील. याचाच अर्थ जिथे जिथे ग्राहकसेवेचं किंवा एकूणच त्याच त्या प्रकारचं काम असेल त्या प्रत्येक ठिकाणी माणसाची जागा यंत्रमानवीकरणाची संकल्पना घेईल अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे क्लार्क, डेटा एण्ट्री करणारे, हिशेबनीस अशा प्रकारच्या लोकांची गरज दिवसेंदिवस कमी होत जाईल. या लोकांना नवी कौशल्यं आत्मसात करावी लागतील. अशा प्रकारच्या नोकर्‍याच यापुढे शिल्लक राहाणार नाहीत.

हे शिकण्यासाठी कोणती कौशल्यं लागतात?

अगदी सुरुवातीला एक मुद्दा स्पष्ट केला पाहिजे. बर्‍याच लोकांची यंत्रमानवीकरण अर्थात ‘रोबोटिक प्रॉसेस ऑटोमेशन’ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ यामध्ये गल्लत होते. या दोघांमधला नेमका फरक काय हे अनेक जणांना कळत नाही. काहींना तर या दोन गोष्टी एकच आहेत असं वाटतं. मानवी कृतींची नक्कल करू शकणार्‍या सॉफ्टवेअरला आपण यंत्रमानवीकरण असं म्हणतो, तर माणसाच्या हुशारीसारखी आणि भावनांसारखी कृती करू शकण्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो. म्हणजेच यंत्रमानवीकरण हे तुलनेनं सोपं असतं. त्यात आपण सहजपणे करू शकणार्‍या कृती संगणकाला करायला शिकवतो. कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये मात्र आपण संगणकाला विचार करायला शिकवण्याचा प्रयत्न करतो. थोडक्यात ‘करणं’ आणि ‘विचार करणं’ असा या दोन तंत्रज्ञानांमधला फरक आहे. यंत्रमानवीकरणासाठी आता अनेक कंपन्या सॉफ्टवेअर पुरवतात. त्यापैकी ‘ब्ल्यू प्रिझम’ कंपनीचं सॉफ्टवेअर अग्रगण्य मानलं जातं. ‘यूआय पाथ’ हेही याच प्रकारचं सॉफ्टवेअर आहे आणि ते तर फुकट उपलब्ध आहे. याखेरीज ‘ऑटोमेशन एनिव्हेअर’, ‘सॉफ्टोमोटिव्ह’, ‘पेगा’ अशा अनेक जणांच्या सॉफ्टवेअरचा वापर यासाठी करता येतो. ज्या लोकांना यंत्रमानवीकरणाच्या उद्योगात सहभागी व्हायचं असेल त्यांनी असं सॉफ्टवेअर शिकणं हा एक पर्याय असतो. दुसरा पर्याय असं सॉफ्टवेअर न शिकताही यंत्रमानवीकरणाची संकल्पना एखाद्या ठरावीक उद्योगामध्ये नेमकी कशी राबवायची यामधले बारकावे नीटपणे समजून घेण्याचा असतो. म्हणजे समजा मला सॉफ्टवेअर, प्रोग्रॅमिंग यामध्ये फार गती नसली तरी एखाद्या बॅँकेचं यंत्रमानवीकरण करणं म्हणजे नक्की काय केलं पाहिजे हे मी सखोलपणे अभ्यासू शकतो आणि त्या कामामध्ये सहभागी होऊ शकतो.

रोजगाराच्या संधी कोणत्या?

1. कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्रमानव हे सगळं माणसाला पूरक असलं तरी माणसाच्या हातची रोजीरोटी काढून घेऊ शकणारंही आहे. खासकरून जिथे फार कौशल्यं लागत नाहीत किंवा कामामध्ये तोच तोपणा असतो अशा प्रकारच्या कामांवर तर या तंत्रज्ञानामुळे अक्षरशर्‍ नांगर फिरण्याची दाट शक्यता आहे. हे लक्षात घेऊन जो माणूस कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्रमानवीकरण यांच्या झपाटय़ामध्ये वाहून न जाण्याची दक्षता घेईल तोच उद्याच्या जगात टिकेल हे नक्की. 2. कोणत्या प्रकारची कामं यंत्रमानव करू शकेल आणि कोणत्या प्रकारची कामं तो करू शकणार नाही यावर प्रत्येकानं आपापल्या क्षमतेनुसार चिंतन केलं पाहिजे.3. याचं सोपं उदाहरण म्हणजे एखाद्या बॅँकेमध्ये कॅशिअरचं काम करणार्‍या माणसाची जागा यंत्रमानव सहजपणे घेऊ शकेल पण मुळात कॅशियरचं काम यंत्रमानवाला शिकवण्यासाठीचं कौशल्य जो आत्मसात करेल त्या माणसाला प्रचंड संधी उपलब्ध असतील. 4. म्हणजेच कुठलंही काम यंत्रमानवाकडून कसं करून घ्यायचं हे शिकण्यावर भर देणारा माणूस ‘यंत्रमानवापुढे मी कसा टिकणार?’ असा निराशावादी विचार करणार्‍या माणसाच्या पुढे निघून जाईल. 5. यंत्रमानवीकरण चांगलं की वाईट, त्यामधले नैतिक प्रश्न, भारतासारख्या देशामध्ये अकुशल माणसांची प्रचंड मोठी संख्या, बेरोजगारीची आधीच असलेली समस्या हे सारं तर आहेच. पण रोबोट माणसांची जागा घेणार हेही तितकंच खरं आहे.