शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

फॅशन फ्यूजन- दिवाळी शॉपिंगचा नवा ट्रेण्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 07:10 IST

दिवाळीत कपडय़ांचं शॉपिंग करणार असाल, तर या नव्या ट्रेण्डवर लक्ष ठेवा!

ठळक मुद्देमुलींच्या फॅशनच्या जगात सध्या फ्यूजनचं राज्य आहे

- निकीता बॅनर्जी

दिवाळी आता पंधरा दिवसांवर येऊन ठेपली. दिवाळी शॉपिंग हा आता सगळ्यात महत्त्वाचा आणि अवघड विषय आता अजेंडय़ावर असेल.तर या दिवाळीत ट्रेण्डी, फेस्टिव्ह आणि तरीही पारंपरिक देखणं दिसेल असं घ्यायचं काय, असा प्रश्न मुख्यतर्‍ मुलींसमोर असतो. मुलांना पर्यायही तसे कमीच असतात.पण मुलींच्या फॅशनच्या जगात सध्या फ्यूजनचं राज्य आहे. त्यामुळे पारंपरिक आणि आधुनिक यांचा मेळ घालणारं काही या सणावाराच्या दिवसांत तुम्ही घेऊच शकता.

1. शरारा कुर्तायाची सध्या जोरदार फॅशन आहे. शरारा आणि त्यावर लॉग कुर्ता. त्यावर विविध प्रकारची एम्ब्रॉयडरी. लांब दुपट्टा हे सध्या हीट कॉम्बिनेशन आहे.

2. रफल लहेंगारफल म्हणजे झालरी झालरीचा लेहंगा. या प्रकारच्या लहेंग्याचीही सध्या जोरदार चलती आहे. अंगकाठी कशीही असो, तो दिसतोही उत्तम. आणि त्याला पारंपरिक लूकही असल्यानेही या दिवाळीत हा रफल लहेंगा हिट आहे.

3. जॅकेट ब्लाउजसाडी तुम्ही पारंपरिक नेसा नाही तर आधुनिक डिझायनर. साडी हा कायम फॅशनच्या जगात इन मामला असतो. मात्र टिपिकल जुन्या पद्धतीचे ब्लाउज मात्र आता घालू नका. सध्या लॉँग जॅकेट व न साइडेड जॅकेट अशा ब्लाउजची फॅशन आहे. त्यापैकी काही रात्रीच्या कार्यक्रमासाठी नक्की वापरता येईल.

4. धोती पॅन्ट-लॉँग कुर्ताहा ट्रेण्ड म्हटलं तर जुना आहे; पण यंदा पुन्हा चर्चेत आहे. वर्कवाला लॉँग कुर्ता आणि प्लेन धोती पॅन्ट हा एक उत्तम फ्युजन मामला आहे.

5. स्मोकी आइजकपडय़ांबरोबरच एक सगळ्यात सोपा उपाय म्हणजे आय मेकअप. या दिवाळीत फार मेकअप न करता केवळ स्मोकी आइज मेकअप केला तरी तुमचा लूक बदलू शकतो.