वाळवी
By Admin | Updated: November 13, 2014 21:14 IST2014-11-13T21:14:39+5:302014-11-13T21:14:39+5:30
‘धूप में निकला ना करो रूप की रानी’ असं कुणी कितीही प्रेमानं सांगितलं तरी त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करून स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्यावी

वाळवी
ऑक्सिजन टीम -
‘धूप में निकला ना करो रूप की रानी’ असं कुणी कितीही प्रेमानं सांगितलं तरी त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करून स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि तडक उन्हात जाऊन उभं रहावं अशी स्थिती आजच्या तरुण मुलींवर ओढावलेली आहे.
रंग जरा काळवंडू नये, उन्हाचा आणि प्रदूषणाचा त्रसच होऊ नये म्हणून सतत तोंडाला बांधलेली फडकी, अंगावर सनकोट, चेह:याला फासलेले मेकअप आणि कसकसले सनस्क्रिन लोशन यांच्यामुळे चेहरा अगदीच पांढराफट्ट पडून तब्येतीचे तीन तेरा वाजलेले आहेत, असं वैद्यकीय पाहणीचे अभ्यास पोटतिडकीने सांगत आहेत. आपली हाडं मजबूत ठेवण्याचं महत्त्वाचं काम जे व्हिटॅमिन डी करतं, त्याचीच बहुतांश माणसांच्या शरीरात आजच्या घडीला प्रचंड कमतरता आहे. त्यातही 16 ते 30 या वयोगटातल्या मुलींमध्ये तर ही व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी प्रचंड प्रमाणात आहे.
चेन्नईतल्या एसआरएल डायग्नोस्टिक्स लिमिटेड या संस्थेने देशभरात केलेल्या अभ्यासाचे हे निष्कर्ष आहेत. देशात सुमारे 69 टक्के लोक आजच्या घडीला व्हिटॅमिन डीची कमतरता घेऊन जगत आहेत. आणि त्यातही तरुण मुलींमध्ये या व्हिटॅमिनची कमतरता जास्त आहे.
खरं तर व्हिटॅमिन डी मानवी शरीर आपोआप तयार करत असतं, त्यासाठी विशिष्ट पोषण आहाराचा आणि आर्थिक परिस्थितीचा काहीही संबंध नाही. शरीराचा सूर्यप्रकाशाशी संपर्क आला, तर त्यातून शरीर आपोआप व्हिटॅमिन डी तयार करतं. मात्र आपलं उन्हातच जाणं बंद झालं किंवा सदैव चार भिंतीआडच काम करत राहिलं, व्यायामाचा अभाव, सतत बैठं काम, चेह:यावर-शरीरावर सनस्क्रिन लोशनचे थर, सनकोटसह घट्ट बांधलेले स्कार्फ यामुळे शरीरावर सूर्यकिरण पडतच नाही. आणि त्यातून अनेक आजार निर्माण होत आहेत.
आपलं असं काही होतंय का?