म्हणा ना ठणकावून, आय अॅम द बेस्ट

By admin | Published: July 9, 2015 07:04 PM2015-07-09T19:04:10+5:302015-07-09T19:04:10+5:30

फालतू आहे मी, असं तुम्हीच स्वत:विषयी येताजाता म्हणत असाल,

Do not say yes, I am the best | म्हणा ना ठणकावून, आय अॅम द बेस्ट

म्हणा ना ठणकावून, आय अॅम द बेस्ट

Next

 - समिंदरा हर्डिकर-सावंत

 
फालतू आहे मी, असं तुम्हीच स्वत:विषयी येताजाता म्हणत असाल,
तर लोकांनी काय म्हणून तुम्हाला आदर द्यावा?
 
म्हणा ना ठणकावून, आय अॅम द बेस्ट
 
तुमचे स्वत:बद्दलचे मत काय आहे?
म्हणजे तुम्हाला स्वत:बद्दल काय वाटतं?
- असा प्रश्न मुलाखतीत एकदम बाऊन्सरसारखा येऊन आदळला की अनेकांची विकेट उडते. काही जणांना एक शब्द स्वत:विषयी सांगता येत नाहीत आणि काही तर हा प्रश्न हे आपलं इंटरॉगेशन असल्यासारखे इतके निगेटिव्ह होतात, इतके धास्तावतात आणि स्वत:च्या चुकाच सांगू लागतात. 
सेल्फ एस्टीम अर्थात स्वत:विषयी आदर वाटणं ही एक फार मोठी गोष्ट आहे. नव्या जगात तर यशस्वी होण्यासाठीचं ते एक मोठं अस्त्र आहे हे आपण लक्षात ठेवायला हवं. 
स्वत:विषयी असलेला आदर, आत्मविश्वास यावर यशापयश अतिशय मोठय़ा प्रमाणात अवलंबून असतं.ज्या व्यक्ती स्वत:विषयी आदर आणि आत्मविश्वास बाळगून असतात त्या कामात अधिक उत्साही असतात, तणावाला अधिक सकारात्मकतेने सामो:या जाऊ शकतात, अधिक सामंजस्याने काम करू शकतात आणि इतरांशी चांगल्या प्रकारे जमवूनही घेतात.
पण स्वत:विषयीच आदर नसेल, खात्री नसेल तर इतरांविषयी इनसिक्युअर्ड वाटणारच!
मात्र स्वत:कडे आदरानं आणि सन्मानानं पाहायची सवय असेल तर मात्र अनेक अवघड गोष्टी सोप्या होतात.
 
* स्वत:विषयी आत्मविश्वास असेल तर  काम करताना अधिक उत्साह वाटतो. कामाचा हुरूपही जास्त असतो.
* नवीन किंवा आव्हानात्मक काम करायला संकोच वाटत नाही. उलट ते आव्हान स्वीकारावंसं वाटतं.
* आपल्या सहका:यांशी किंवा वरिष्ठांशी संवाद साधताना संकोच वाटत नाही, बिचकतही नाहीत तुम्ही. उलट अत्यंत आत्मविश्वसानं स्वत:ची मतं मांडता येतात.
* कुठल्याही कामात गटाचं नेतृत्व करता येतं. इतर माणसांचाही आत्मविश्वास वाढवता येतो.
* स्वत:च्या पात्रतेवर विश्वास असल्यानं  इतर कुणामुळे असुरक्षित वाटत नाही. स्वत:ची स्पर्धा स्वत:शी ठरवून अकारण स्पर्धा आणि इष्र्या टाळता येते. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

Web Title: Do not say yes, I am the best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.