शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
4
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
5
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
6
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
7
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
8
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
9
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
10
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
11
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
12
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
13
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
14
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न
15
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
16
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
17
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
18
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
19
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
20
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी

आपण जगू ना, आपल्यासाठी थोडं तरी!

By admin | Updated: April 10, 2017 17:57 IST

वाटतं त्यापलिकडे उरलंय का काही या दिवसांचं नाविन्य? मारे संकल्प केले तरी ते पूर्णत्वाकडे नेण्यासाठी फारसे कष्टही आपण घेत नाही.

- वैशाली भगवानराव खंडागळेता. जि. परभणीगुढीपाडवा झाला. अजून आपण त्यावेळी आलेले शुभेच्छांचे फोटो डिलीट करतो आहोत.निमित्त काहीही असो गुढीपाडवा किंवा १ जानेवारी सोशल मिडियांवर फॉरवर्ड होणारे मेसेज आणि फोनवर शुभेच्छांचा वर्षाव होतो.वाटतं त्यापलिकडे उरलंय का काही या दिवसांचं नाविन्य? मारे संकल्प केले तरी ते पूर्णत्वाकडे नेण्यासाठी फारसे कष्टही आपण घेत नाही.अर्थात भरमसाठ संकल्प करून अर्धवट सोडण्यापेक्षा आणि त्याचं ओझं वागवण्यापेक्षा सहज सोपं आपल्याला जमल आणि झेपेल असं काही तरी करूयात ना! सोशल मिडिया आपला कितीतरी वेळ फुकट जातो; आणि त्यापलिकडे आपल्याला काही दिसत नाही आणि आपण ते पहायचा प्रयत्न ही करत नाही.मग एक छोटसं काम नक्कीच करू शकतो आपण की सोशल मिडियावर वाया जाणारा वेळ हळूहळू कमी करू शकतो. ओझं न घेता केलं की जमतं सगळं. त्यामुळे आपल्याला आपले छंद जोपसण्यास वेळ मिळेल.तणावयुक्त जीवनामध्ये आपल्याला स्वत:साठी वेळ नाही. सतत धावपळ, दगदग, ताणतणाव आणि उदासिनता मग यामध्ये स्वत: करता वेळच कुठे आपल्याला? स्वत:च्या शरीरासोबत मनही निरोगी ठेवणं फार गरजेचं आहे. व्यायाम आणि आवडणाऱ्या गोष्टीकरता रोज वेळ कसा काढायचा हे ठरवायला हवं. ते केलं तर आपल्याला आपलंच आयुष्य भारी वाटू शकेल. आयुष्यात ज्यांना मनापासून सॉरी म्हणायच त्यांना भेटून सॉरी म्हणणं एवढं कुठं अवघड आहे? आपल्याकरता सतत काहीतरी करणाऱ्या लोकांना तुम्ही माझ्याकरता किती महत्त्वाचे आहात हेही सांगूच ना एकदा तरी. खूप दिवसापासून राहून गेलेलं कामाचा आजपासूनच शुभारंभ करू. आणि काहीच नाही तर ‘एक उनाड दिवस’ मनसोक्त जगत आयुष्यावर भरभरून प्रेम करू.