वेगळं. आणि विचित्रच!
By Admin | Updated: November 13, 2014 20:52 IST2014-11-13T20:52:46+5:302014-11-13T20:52:46+5:30
नेट लावून काहीतरी लिहायचं म्हणजे पेशन्स लागतो. तो कुठून-कसा आणला ? नेटाने लिहावं लागतं हे खरंच.

वेगळं. आणि विचित्रच!
>नाव : प्रणव जोशी
पुस्तकाचं नाव - टेक इट इझी !
कधी प्रसिद्ध झालं? - एप्रिल 2क्14
पुस्तकात काय आहे ? - बारावीत शिकणा:या तीन मित्रंची आणि त्यांच्या आयुष्यात घडणा:या घडामोडींची ही गोष्ट.
पुस्तक आवडलं असं सांगणारी कॉमेण्ट - खरं तर ज्यांना हे पुस्तक आवडलं त्यांनी एकाच वाक्यात अजून तरी कौतुक केलेलं नाही. खूपच छान, मस्तच, एकच नंबर. हेच शब्द अनेक पद्धतीने विविध हावभावांत अनेक लोकांकडून ऐकलेत.
पुस्तक भिकार आहे, यातले संदर्भ अजिबात आवडले नाहीत असं सांगणारी कॉमेण्ट- माझं मन दुखू नये म्हणून असेल कदाचित पण, ‘चांगला प्रयत्न होता’ हेच ऐकवण्यात आलं, जमेल तितक्या कटुतेने !
आपणच एक पुस्तक लिहावं असा किडा कधी, कसा आणि का डोक्यात आला?
हा किडा मी इंदूरमध्ये बी.कॉम करत असताना डोक्यात आला होता. तेव्हा मी काही काळ सातत्यानं डायरी लिहित होतो, पण टायफॉईड आणि कावीळ असे दोन्ही आजार एकत्र झाल्यानं सक्तीची विश्रंती घेत होतो. वेळच वेळ होता. मग डोक्यात किडा मारो आंदोलन सुरू झालं. लिहायला लागलो. आपण लिहितोय, हे तसं अजून ङोपलं नाहीये, पण लिहिलं हे खरं !
हल्लीची मुलं कुठे वाचतात?
आपलं पुस्तक कोण वाचणार असा संशय-प्रश्न-शंका मनात आली नाही का?
- हो ! आला होताना हा प्रश्न! नक्कीच! पण लिहिताना नाही, लिहिताना आनंद मिळत होता म्हणून मी लिहीत होतो आणि जसं सुचलं तसं लिहीत गेलो. त्यामुळे कोण वाचणार ह्या प्रश्नाने मला फार फरक पडला नाही. आणि अजूनही लोक वाचतात हीच श्रद्धा मी मनात अजूनही बाळगून आहे. तसा रिस्पॉन्सपण मला येतो आहे.
नेट लावून काहीतरी लिहायचं म्हणजे पेशन्स लागतो. तो कुठून-कसा आणला ?
नेटाने लिहावं लागतं हे खरंच. मी तर आधी डायरीच्या मागच्या पानावर कथा लिहायला सुरुवात केली होती. कथा रचताना, लिहिताना मीच त्यात बुडून जायचो, आनंद मिळायचा. त्यामुळे कंटाळा आला नाही आणि त्यामुळेच माङो पेशन्स काही पारखले गेले नाहीत. लिहिणं स्वेच्छेने होतं आणि सुचायला काही काळ -वेळ नव्हता. लिहिण्याची फक्तजिद्द होती.
या प्रोसेसने तुला काय शिकवलं?
ह्या प्रोसेसने शिकवला पेशन्स ! लिहिताना लागत नसले तरी माङयासारख्या मुलाला नंतर त्याची गरज पडते, तो माझं स्वभाव दोष आहे. बराच धीर धरता आला. आणि मुख्य म्हणजे दिला थोडा नम्रपणा.
आपल्या पिढीचं खरं म्हणणं, जगणं काय आहे ते कोणीच लिहीत नाही असं वाटतं का?
- माफ करा, पण माझं मत थोडं वेगळं आहे ! आमची पिढीच थोडी विचित्र परिस्थितीत वाढली असल्याने त्यांनाच स्वत:ला काय हवंय हे माहिती नाही. त्यामुळे बाकीचे तरी आमच्याबद्दल काय आणि कसं लिहितील? आम्ही स्वत:शीच संवाद नाही करू शकत नाही अजून, उगाच लोकांसमोर आपली जी इमेज आहे ती पोसल्यासारखं आमचं वागणं असतं.