शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Delete 4 everyone, ७ मिनिटांच्या भयंकर खेळाची ५ कारणं..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 11:01 IST

व्हॉट्सअ‍ॅप ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ असा डिलीटचा, आपण जे लिहू ते ७ मिनिटांत पुसून टाकण्याचा पर्याय आहे म्हणून ७ मिनिटं स्टेकला लावू नका.

- अनन्या भारद्वाज

व्हॉट्सअ‍ॅप ‘डिलीट फॉर एव्हरीवन’असा डिलीटचा, आपण जे लिहू ते ७ मिनिटांतपुसून टाकण्याचा पर्याय आहे म्हणून७ मिनिटं स्टेकला लावू नका.कारण जे पुसलं गेलंअसं आपल्याला वाटतंते कधीच कायमचं पुसलं जात नाही!व्हॉट्सअ‍ॅपने ‘डिलीट फॉर एव्हरीवन’चा पर्याय दिल्यानं जगभरात म्हणे आनंदोत्सव साजरा झाला. आपण एखाद्या व्यक्तीला अगर गटाला पाठवलेला मेसेज, फोटो, व्हिडीओ आता सात मिनिटांच्या आत डिलीट करता येणार आहे. अर्थात मेसेज डिलीट करण्याचा पर्याय आहे पण म्हणून आपण मेसेज टाकला आणि डिलीट केल्याचं कुणाला कळत नाही असं नाही. ते कळतंच. आणि लोकांना हा प्रश्न पडतोच की यानं असं काय टाकलं होतं की ते याला डिलीट करावंसंच वाटलं. आणि हे कळणं किंवा ही शंका, डाउटच म्हणूया आजकालच्या अति भावना दुखवू जगात गैरसमजाला पुरेसं निमित्त देऊ शकतं. त्या गैरसमजातून भविष्यात नात्यांत अधिक तणाव निर्माण होऊच शकतात.पण तरीही आज अनेकांना हा डिलीटचा पर्याय महत्त्वाचा वाटतो आहे. त्याची पाच कारणं आहेत.म्हणजे बहुसंख्य लोकांना निदान या पाच कारणांच्या वेळी तरी आपण टाकलेला मेसेज डिलीट करण्याचा कण्ट्रोल आपल्या हाती हवाच होता. तो आता मिळाला. पण मेसेज डिलीट करावा असं वाटावं अशी कारणं आपल्यालाही लागू पडतात का? -तपासून पाहा.आणि पडत असतील तर आपलं आॅनलाइन वर्तन वेळीच सुधारा. कारण जे डिलीट केलं असं आपल्याला वाटतं ते डिलीट कायमचं होतंच असं नाही. आणि डिलीट केलं तरी संशयाची भुतं मागे राहणार आहेतच.तपासून पाहा, तुम्ही यासाठी मेसेज डिलीट करता का?१) तुम्ही आॅफिसच्या ग्रुपवर काहीबाही लिहिलं. रागाच्या भरात बॉसला सुनावलं. पण काही मिनिटातच लक्षात येतं की असं नको होतं लिहायला. ते पटकन डिलीट केलं तर बरं. मग अनेकजण तातडीनं लिहिलेलं डिलीट करतात. अर्थात म्हणून डॅमेज कण्ट्रोल होत नाही; पण कुणी स्क्रीनशॉट घेतला नाही तर ते पुसलं तरी जातं.२) नात्यात, भांडणात असं अनेकदा होतं. आपण बोलून जातो. ताडताड बोलतो. समोरचा आॅफलाइन असेल तरी लिहित सुटतो. व्हॉट्सअ‍ॅपवर भांडतो. त्यावेळी हा मेसेज पुसण्याचा पर्याय बरा पडतो.३) जे लिहिलं, त्याचा कुणी स्क्रीनशॉट घेऊन ठेवेल अशी लिहिल्यावर भीती वाटली तर पुढच्याच मिण्टाला ते पुसताही येतं आता.४) अलीकडचा एक भयंकर प्रकार म्हणजे प्रेमात असलेले अनेकजण परस्परांना काही न्यूड फोटो वगैरे टाकतात; पण अनेकदा ते टाकल्यावर पश्चाताप होतो. ७ मिनिटांत आता तो पश्चाताप दुरूस्त करण्याची संधी आहे.५) आपण चुकून, अगदीच नजरचुकीने एखाद्या ग्रुपवर, व्यक्तीला भलताच मेसेज पाठवला असं लक्षात आलं तर ओशाळं होण्यापेक्षा तो मेसेज वेळेच्या आत पुसलेला बरा.अर्थात या पुसापुशीसाठी हातात फक्त ७ मिनिटं आहेत, आणि त्यात चूक दुरूस्त नाही झाली तर गैरसमज अटळ आहेतच.कायमचं काहीच पुसलं जातं नाही!मेसेज टाकला, चुकलं असं वाटलं. सात मिनिटांच्या आत डिलीट केला, काम झालं असं वाटत असेल तर थोडं थांबा.आपण आॅनलाइन जे काही लिहितो ते कधीच डिलीट होत नाही. अगदी तुमचं बोलणं एण्ड टू एण्ड एनक्रिप्टेड आहे. पूर्ण प्रायव्हेट आहे, दुसरं कुणी वाचू शकत नाही असं व्हॉट्सअ‍ॅप सांगत असलं तरीही.आयओएस रीसर्चर जोनाथन डिझिस्की यानं अलीकडेच हे सिद्ध करून दाखवलं की व्हॉट्सअ‍ॅपवर कितीही सेफ प्रायव्हसी पॉलिसी असली तरीही त्यातला डाटा कधीच डिलीट होत नाही. तो उपलब्धच असतो. सापडू शकतो, काढता येऊ शकतो. तो व्हॉट्सअ‍ॅपकडे सेव्हच असतो. मुख्य म्हणजे तो फोनमध्ये सेव्ह असतो आणि फोनच्या क्लाउड बॅकअपमध्येही तो उपलब्ध असतो. त्यामुळे आता ७ मिनिटंत मेसेज डिलीट करता येत असले तरीही ते डिलीट झाल्याचा आनंद फार मानावा असं काही नाही.आणि दुसरं म्हणजे आपण सगळं डिलीट केलं तरी ते कायमस्वरूपी डिलीटही होत नाही. त्यामुळेच आॅनलाइन विशेषत: व्हॉट्सअ‍ॅपमध्येच, दोन व्यक्तीत, अगदी खासगीतही काहीही लिहिताना हे कधीच कायमचं पुसलं जाणार नाही, कुठंतरी कुणीतरी हा बॅकअप पाहूच शकतो हे आपल्या मनाशी असलेलं बरं!मग काय करावं, व्हॉट्सअ‍ॅपवर बोलूच नये का?तर फार महत्त्वाचं, अत्यंत गंभीर, सिक्रेट असं काही आॅनलाइन शेअर न करणं हेच उत्तम.बाकी जी काय चर्चा करायची ती करावीच.पण ते करतानाही व्यक्तिगत आणि समाजभान सुटू नये म्हणजे झालं!