ओल्या पावसातला एक नकार
By Admin | Updated: July 18, 2016 17:00 IST2016-07-18T16:16:10+5:302016-07-18T17:00:49+5:30
अरे बाप रे... आत्ताही विचार करताना मला थोडा टेन्शन आलं. मला त्यावेळी नक्की काय वाटलं, काय झालेलं मला अजूनही कळलं नाही. पण मी तिला थेट आय लव्ह यू असा म्हंटल होतं...

ओल्या पावसातला एक नकार
- पूजा दामले
अरे बाप रे...
आत्ताही विचार करताना मला थोडा टेन्शन आलं. मला त्यावेळी नक्की काय वाटलं, काय झालेलं मला अजूनही कळलं नाही. पण मी तिला थेट आय लव्ह यू असा म्हंटल होतं...
आणि मग मात्र माझी फुल वाट लागली होती.
यानंतर थेट ? दिवसानी कॉलेजला गेलेलो. हाहाहाहा... काय केलेलं मी... आराम खुर्चीत बसल्याबसल्या मला सगळं आठवायला लागलं...
पुढचे काही दिवस नीरजा आणि माझं काही बोलणंच झालं नाही. तिचा होकार असेल असंच मला वाटत होतं म्हणजे तसा मला विश्वासच होता. कारण तितकी आमची ओळख, मैत्री होती. चहा प्यायला जाऊया का? असं तिनेच मला विचारलं होतं. मग उत्तर द्यायला ती का तयार नाही? हे दिवस मी माझ्याच विश्वावात होतो. कट्ट्यावर गेलो तरी तिथून लवकर सटकायचो. त्या टपरी जवळ जायचो, तीन चार वेळा तर लायब्ररीत पण जाऊन आलो. दोनदा नीरजा तिथे होतीसुद्धा. पण काहीच विषय झाला नाही.
आठ दिवस झाले, काय करावं कळत नव्हतं. मग काय कट्टयावर गेलो. त्या दिवशी माझं जंगी स्वागत झालं. नीरजा और मेरी जोडी, या विषयवार सर्वानी त्यांचा अभ्यास सादर केला. लेक्चरला ती माझ्याकडे कशी पाहते. कॅण्टीनमध्ये त्या दिवशी एकत्र बसून चायनीज खाल्ल ते थेट अगदी फ्रँडशीप डे ला तिने वर्गाबाहेर थांबून हाताला बांधलेला फ्रँडशिप बँड. सगळेजण बोलत होते. मग मलाही तिच्या बरोबरचे क्षण आठवायला लागले. चहाच्या आधी एकदा पावसात चौपाटीला गेलो होतो.
खुप पाऊस पडत असल्यामुळे ट्रेन लेट होत्या. मी दादर स्टेशनला उभा होतो. समोरून अचानक नीरजा आली.
कुठे चाल्लास?? - नीरजा
अग कॉलेजला, आज सुट्टी थोडीच आहे - मी
हाहा, पण मिळू शकते, आपण मरीन ड्राईव्हला गेलो तर... - नीरजा
मला दोन मिनिटं काही कळलंच नव्हतं. पण पटकन हो म्हटलं. आम्ही दोघेच मरीन ड्राईव्हला कट्ट्यावर बसलो होतो. छत्रीचा तिथे उपयोग नव्हताच. पण बंद केली तर भिजणार.
आत्ता काय, मी भिजायला तयार होतो, पण ती? काय माहित??
देवाला कळलं की काय आम्ही दोघं आलोय ते!
पावसाचा जोर कमी झाला. रिमझिम पावसात समुद्रात उसळणार्या लाटा आम्ही पाहत बसलो. थंड हवा, तिचे उडणारे केस, त्यांना सावरत असताना ती अजूनच छान दिसत होती. भुट्टा खाना है, असा नीरजाचा हट्ट. मला सगळंच नवीन होत. त्या दिवशी मला वेगळी म्हणजे खरी नीरजाची झलक दिसली होती. शांत पण तितकीच मस्तीखोर. संध्याकाळ झाल्यावर शेवटी आठवणींना आवर घालत, कट्टा सोडला आणि घराकडे निघालो.
घरी जाताना दादर स्टेशनला नीरजा भेटली. काय बोलणार हे मला माहित होते. होकार मिळाल्यावर काय बोलायचं हे ठरवत असताना एकच शब्द कानावर पडला.
नाही...
कसाबसा घरी आलो. रात्री छताकडे एकटक बघत पडून राहिलो. खूप वेळाने मला परत मरीन ड्राईव्हवरचा तो दिवस आठवला...
तेव्हा निघताना मला ती म्हणाली होती, मैत्रीच्या पल्याड जायचंय...
वाक्य अर्धवट सोडत. समुद्राच्या त्या न दिसणाऱ्या टोकाकडे बोट दाखवत, त्या किनाऱ्याला जायचा विचार करू शकत नाही. खूप लांब आहे तो... आणि मला इथून समुद्र पाहायला आवडतो...
मला तेव्हा काहीच कळलं नव्हतं... पण आता मला कळतंय. डोळयातून गालावर ओघळणारे अश्रू आता मी थांबवू शकत नव्हतो...
वीज कडाडल्याने मी भानावर आलो...
आराम खुर्चीवरून उठून मी टेबल जवळ गेलो, टेबलवर नीरजा वेड्स रोहन ही पत्रिका होती. हो, नेक्स्ट संडे नीरजाच्या लग्नाला जायचंय.
नील, अरे शॉपिंगला जायचंय ना... परत पुढच्या रविवारी लग्नाला जाताना काय घालू हा प्रश्न पडेल तुला? आटप रे लवकर...
आवाज ऐकून माझे घडयाळाकडे लक्ष गेलं..
संध्याकाळचे सहा वाजले होते...
अरे देवा...
हो बायको, तयार आहे मी...
पावसात आत्ताही आठवण येते तिची. पण आता त्या आठवणीत प्रेम राहिल नाही....