coronavirus : drought affected youth in Marathawada, now in lock down. | coronavirus : औरंगाबादच्या विद्यार्थ्यांना आधी दुष्काळ आता  कोरोनाचा ताप

coronavirus : औरंगाबादच्या विद्यार्थ्यांना आधी दुष्काळ आता  कोरोनाचा ताप

ठळक मुद्देजेवण्याखाण्यापलीकडे हे मनाचे, परिस्थितीचे आणि भविष्याचे काचही सध्या काचू लागले आहेतच.

- राम शिनगारे

औरंगाबाद.  मराठवाडा आणि विदर्भातीलही काही जिल्ह्यांतून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी औरंगाबादलाच येतात. 
इथं येणारी ही मुलं अतिशय सामान्य कुटुंबातील असतात. त्यात दुष्काळानं पोळलेला भाग. आधीच दुष्काळ आणि आता कोरोना अशी अवघड वाट या मुलांच्या वाटय़ाला आली आहे.
एरव्हीही आपला शहरात राहण्याचा महिन्याचा खर्च निघावा, गावाकडून, आईवडिलांकडून पैसे मागण्याची गरज लागू नये, यासाठी अनेक विद्यार्थी हॉटेल, एटीएममध्ये कामं करतात.
 कमवा आणि  शिका योजनामध्ये अनेक जण कामं करतात. यातून हजारो विद्यार्थी आपला उदरनिर्वाह चालवतात. 
पुणो, मुंबईसह इतर शहरांच्या तुलनेत रूम,अभ्यासिका आणि मेस खर्च अत्यल्प आहे. औरंगाबादला कमी आहे. त्यामुळे सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थी औरंगाबादची निवड करतो. असे अनेक मुलं या शहरात राहातात, आपल्या स्वप्नांचा पाठलाग सुरूच ठेवतात. 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने 16 मार्चपासून शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. 
या निर्णयानंतर बहुतांश विद्यार्थी मिळेल ती गाडी पकडून स्वत: च्या गावी परतले. 
तरीही विद्यापीठात पीएच.डी. करणारे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा परीक्षा देणारे अनेकजण मागे उरले. एम.पी.एस.सी.ची परीक्षा 5 एप्रिल रोजी होणार असल्यामुळे या परीक्षेची तयारी करणारे युवक थांबले होते. सुरुवातीला शैक्षणिक बंद जाहीर केल्यानंतर राज्य शासनाने प्रत्येक दिवशी नवीन नवीन निर्णय घेतल्यामुळे सगळेच बंद होत गेले. त्यात विद्याथ्र्याच्या मेसही बंद झाल्या.
दरम्यान, देशभर 21 दिवसांचा लॉकडाउन घोषित झाला. तत्पूर्वी तो राज्यातही लागू झालेला होताच.
स्पर्धा परीक्षा आणि शिक्षण घेणा:या विद्याथ्र्याच्या उपासमारीच्या घटना समोर येऊ लागल्या.
 समाजात याची माहिती होताच विद्याथ्र्याना जेवणाची पॅकेट वाटण्यासाठी अनेकांचे हात पुढे आले.
सर्वात आधी टय़ूलिप फाउण्डेशन आणि आम्ही परभणीकर मित्रमंडळतर्फे जेवणाचे पॅकेट्स वाटपास सुरु वात झाली. 
यासाठी सोशल मीडियात विद्याथ्र्याना कोणतीही मदत हवी असल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले. 
यातून विद्यारथ्र्याचे फोन्स येत गेले. 
पहिल्या चार दिवसातच मदत वाटप केल्याचा आकडा 75क् च्या वर पोहोचला. तो वाढतच आहे. 
या सामाजिक संस्था पुढे आलेल्या असतानाच माजी आमदार कुशनचंद तनवाणी हे मागील अनेक वर्षापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि
रु ग्णालय अर्थात घाटीत खिचडीचे वाटप करतात.
 त्यांनीही विद्याथ्र्याच्या जेवणाची व्यवस्था करण्यास सुरु वात केली. त्यांच्याकडेही 1क्क् पेक्षा अधिक विद्याथ्र्याची नोंदणी झाली. 
यानंतर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी ही विद्याथ्र्याना मदत करण्याचा निर्णय घेतला.
 त्यांनीही आवाहन केल्यानंतर 25क् पेक्षा अधिक विद्याथ्र्यानी नोंदणी केली. 
भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिरीश बोराळकर यांनीही स्वत:च्या स्वयंसेवी संस्थेमार्फत विद्याथ्र्याना मदतीचा हात दिला. 
विविध संस्थांच्या मदतीमुळे विद्याथ्र्याना नियमितपणो जेवणाचे पॅकेट मिळण्यास सुरु वात झली. 
यातून जेवणाचा प्रश्न सुटला आहे. मात्र 5 एप्रिल रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 
त्यामुळे औरंगाबादेत असलेल्या विद्याथ्र्याना ही स्वत:चे घर जवळ करायचे आहे.
मिळेल त्या वाहनाने गावी जायचे आहे.
 कारण शहरात कोरोनाची भीती अधिक असल्यामुळे गावाकडून आईवडील, नातेवाईक गावाकडे येण्यास सांगताहेत. 
मात्र गावाकडे जाण्यासाठी गाडी नाही, जिल्हाबदली करता येत नाही. 
त्यामुळे जेवण मिळत असतानाही हे विद्यार्थी अस्वस्थ आहेत. 
त्यांचे लक्ष अभ्यासातही लागत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
स्पर्धा परीक्षांची अनेक वर्षापासून तयारी करणा:या काही युवकांमध्ये नोकरी नसल्यामुळे गावाकडे जावे वाटत नाही. 
हे विद्यार्थी गावी गेले तर अनेकांच्या नोकरीसंदर्भातील प्रश्नांना उत्तारे द्यावी लागतात. 
ही उत्तरे देण्याचं सामथ्र्य या युवकांमध्ये नसतं.
 अगोदरच नोकरी लागत नसल्याचं शल्य मनाला डाचतं. त्यात नातेवाईक, गावक:यांच्या कुत्सित प्रश्नांना तोंड कसं द्यायचं, हा प्रश्न असतो. 
त्यामुळे अलिप्त राहिलेलंच बरं म्हणून हे विद्यार्थी शहरातच राहातात.
जेवण्याखाण्यापलीकडे हे मनाचे, परिस्थितीचे आणि भविष्याचे काचही सध्या काचू लागले आहेतच.


( राम लोकमतच्या मराठवाडा आवृत्तीत शिक्षण वार्ताहर आहे.)
 

Web Title: coronavirus : drought affected youth in Marathawada, now in lock down.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.