शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
3
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
4
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
5
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
6
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
7
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
8
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
9
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
10
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
11
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
12
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
13
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
14
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
15
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
16
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
17
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
18
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
19
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
20
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई

उन्हाळ्यात बिंधास्त करावा असा एक मस्त पेस्टल प्रयोग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 07:05 IST

उन्हाळा आला की पांढर्‍या कपडय़ांसह पेस्टल कलर्सचा ट्रेंड येतो; पण आपण तर तेच ते कपडे वापरतो त्यात हा पेस्टल प्रयोग कसा करणार? त्यासाठी या घ्या काही कॉम्बिनेशन टिप्स.

ठळक मुद्दे मिक्स मॅच करा, कॉम्बिनेशन बदला, साधा दुपट्टा बदलला तरी ड्रेसचा लूक बदलतो.

सारिका पूरकर-गुजराथी

उन्हाळा सुरूच झाला आहे. आता समर कलेक्शन म्हणून पांढर्‍यासह पेस्टल शेड्सचे कपडे पुन्हा ट्रेंडमध्ये येतील. समरवेअर म्हणून त्यांची चर्चा असेल; पण अनेकदा ते पाहून आपण विचार करतो की आपण सर्व ऋतूत सारखेच कपडे घालतो तर हा समर ट्रेंड आपल्या काय कामाचा? तर त्याचं उत्तर आता आहे आणि आपल्या नेहमीच्या कपडय़ांच्या स्मार्ट कॉम्बिनेशनमध्येच ते सापडू शकतं.हेच पाहा ना, अलीकडेच गुवाहाटीत झालेल्या फिल्म फेअर सोहळ्यात  आलिया भटला सर्वोत्कृष्ट अभिनेत्नीचा पुरस्कार मिळाला. आलियाच्या त्यावेळच्या ड्रेसची भारी चर्चा झाली. तिचा तो पेस्टल शेडचा गाउन अतिशय सुंदर दिसत होता. आलियाप्रमाणेच माधुरी दीक्षितही शिमरी बेबी पिंक गाउनमध्ये या समारंभात दिसली.  हा पेस्टल शेडचा ट्रेंड असा सुरू झालेला असताना करिना कपूरनेही नुकताच पावडर ब्ल्यू पेस्टल रंगाचा ए लाइन लेहंगा घालून या रंगपंचमीत भाग घेतला. दीपिका पदुकोणनेही छपाकच्या प्रमोशनसाठी पेस्टल पिंक ड्रेसचीच निवड केली होती. मुद्दा काय, आता बॉलिवूडवालेही पेस्टलच्या प्रेमात आहेत.ब्राइट आणि व्हायब्रंट कलर्सच्या प्रेमात असलेले सगळे एकदम पेस्टल शेड्सकडे कसे वळले? एकेकाळी सोबर, शांत लूकसाठी तसंच ऑफिसवेअरसाठी पेस्टल शेड्सची निवड केली जायची. आता मात्न पेस्टल शेड्स लग्नसमारंभ, पार्टी, ऑफिस मीटिंग, घरगुती समारंभ, पिकनिक अशा सर्वच प्रसंगांसाठीच्या पेहरावासाठी निवडले जातात.  या पेस्टल शेड्सचे वैशिष्टय़ म्हणजे सॉफ्ट, कूल, शांत व्यक्तिमत्त्व दिसण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावतात. पेस्टल शेड्समधील अनेक रंग आता उन्हाळ्यात आणखी बहार आणतील. पेल ब्ल्यू, व्हाइट-पिंक, पेस्टल ब्ल्यू, पेस्टल टरक्वाइज, मिंट ग्रीन या काही प्रमुख शेड्सचा वापर करून तुम्ही हटके, आय कॅची लूक मिळवू शकता.  आता ते कसं करायचं?

1. पेस्टल शेड्स नेहमी न्यूट्रल रंगांसोबत छान वाटतात. वेस्टर्न, एथनिक, कॅज्युअल असे सारे लूक्स तुम्ही या शेड्स वापरून मिळवू शकता. 2. मिंट ग्रीनबरोबर पॉपी रेड हे कॉम्बिनेशन तुम्ही कुर्ती, स्कर्ट-कुर्तीसाठी ट्राय करू शकता. रेड कार्डिगन पेस्टल ग्रीन प्लिटेड स्कर्टवरही शोभून दिसते.  3.पेस्टल शेड्स प्रिंटेड पॅटर्नसोबतही खूप खुलून दिसतात. नुसते प्लेन पेस्टल शेड्समधील आउटफिट्स तसे पाहायला बोअरिंग वाटतं; पण तेच जर प्रिंट्ससोबत ट्राय केले तर लूक बदलून जातो.  उदाहरणार्थ पावडर पिंक कलरचा फ्लोरल किंवा प्लेन लेहंगा व पेस्टल टरक्वाइज, पेस्टल यलो रंगाचं ब्लाउज  घातलं तर क्या कहने!4. व्हिंटेज प्रिंट्ससोबतही पेस्टल शेड्स छान वाटतात. हेच कॉम्बिनेशन तुम्ही वेस्टर्न स्कर्ट-ब्लाउजसाठीदेखील ट्राय करू शकता. 5. डेनिम शॉर्ट्स वापरणार असाल तर मिंट, बेबी पिंक, पेस्टल ग्रीन रंग कुर्ती, टय़ुनिक, शर्ट्ससाठी वापरता येतील.  आता तर पेस्टल रंगात जीन्सही इन ट्रेंड आहे.  6. हाय वेस्ट ब्लश रंगाच्या मिडी स्कर्टवर पेस्टल यलो रंगाचा स्वेटर किंवा टय़ुनिक ट्राय करून गर्ली लूकही मिळवता येतो. 7. ब्लश रंगाचे ब्लेझर, वेस्ट कोट तुम्ही प्लोरल शॉर्ट स्कर्ट व लाइन ग्रीन शर्टवर वापरू शकता, स्कर्ट वापरायचा नसेल तर तुम्ही पलाझो ट्राय करू  शकता. ब्लश रंगाचाच रॅपकोट ड्रेस किंवा मिडी कुर्ती वापरू शकता. 

8. भारतीय, एथनिक लूकसाठीदेखील पेस्टल शेड्स ट्राय करता येतात. या शेड्समुळे रॉयल लूक सहज मिळवता येतो. लिलाक, मिंट क्र ीम, लॅव्हेंडर, सेज ग्रीन, सालमन, डस्टी पिंक, रोझ पिंक, आईसी ब्ल्यू, लेमन यलो, सी शेल, हनिडय़ू, लस्टी रोझ, लॅव्हेंडर ब्लश, वेल्वेट पिंक, आयव्हरी हे रंग एथनिक वेअर्समध्येही तुम्हाला शालीन तसेच फ्रेश लूक मिळवून देतात.  

9. एथनिक वेअर्समध्ये शिफॉन  साडी, लखनवी चिकन एम्ब्रायडरी, कण्टेम्पररी घागरा, फ्लोअरलेंथ अनारकली, जॅकेटेड सलवार-कुर्ती, घरारा ड्रेस या सर्वच प्रकारात पेस्टल शेड्स वापरू शकता. फक्त ते कॅरी करताना सिक्वेन्स वर्क, जरदोसी वर्क, मिरर वर्क, गोटा वर्क, दुपट्टय़ांचे ब्राइट रंग, ज्वेलरीचे टड्रिशन प्रकार असतील तर बात बन जाये !

10. आता पाहा, यातले अनेक रंग तुमच्या कपडय़ांमध्येच तुम्हाला सापडतील, मिक्स मॅच करा, कॉम्बिनेशन बदला, साधा दुपट्टा बदलला तरी ड्रेसचा लूक बदलतो. त्यामुळे या उन्हाळ्यात हे पेस्टल प्रयोग करून पाहा.

( सारिका मुक्त पत्रकार आहे.)