शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
5
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
6
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
7
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
8
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
9
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
10
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
11
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
12
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
13
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
14
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
15
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
16
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
17
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
18
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
19
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
20
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट

...आमचंही एक स्वप्न आहे, भविष्यात इसरोत काम करायचं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 7:00 AM

चांद्रयान अवकाशात झेपावलं तसं सार्‍यांच्या डोळ्यात अभिमानाचं पाणी तरळलं. ते पाणी उमेदीचं, स्वप्नांचं आणि भारतीय असल्याच्या एका आगळ्याच भावनेचं होतं!

ठळक मुद्देश्रीहरिकोटात एका तरुण पत्रकारानं प्रत्यक्ष अनुभवलेल्या थेट प्रक्षेपणाची गोष्ट!

- निनाद देशमुख 

 श्रीहरिकोटा हे नाव, माझ्याही स्वप्नातलं एक गाव होतं. जसं आपल्या देशात अनेकांच्या असतं. भारतानं म्हणजेच इसरोनं अवकाश विज्ञानात घेतलेली भरारी, उपग्रहांचा प्रक्षेपण हे सारं याची देही याची डोळा पाहण्याचं स्वप्न मीही अनेक वर्षे माझ्या नजरेत घेऊन जगलो.अवकाश विज्ञानाचं, इसरोच्या विविध कामगिरींचं आकर्षण होतंच; पण प्रत्यक्ष प्रक्षेपण कधी पाहिलं नव्हतं. यावेळी जेव्हा चांद्रयान 2 च्या प्रक्षेपणाची चर्चा सुरू झाली तेव्हाच मी ठरवलं होतं की या प्रक्षेपणाच्या वेळी आपण तिथं जायचं. पत्रकार म्हणून ते चांद्रभरारी कव्हर करणं हे स्वप्न मला खुणावत होतं. नुकताच मी डीफेन्स स्टडीचा कोर्स करून आलो होतो. त्यामुळे थोडी ओळखपाळख काढली. आणि मला थेट प्रक्षेपण कव्हर करायला जायची संधी मिळाली.मनात अनेक प्रश्न होते, कुतूहल होतं. त्या जगाची आणि आपली प्रत्यक्ष ओळख होणार म्हणून खुश होतो. अभ्यास केला. काही माहिती, अवकाश विज्ञान आणि प्रक्षेपण यांच्या परिभाषा हे सारं समजून घेतलं. काही जुजबी वाचन केलं आणि निघालो. मात्र या सार्‍या माहितीपलीकडचा तो थरार, ती खर्‍या अर्थानं पृथ्वीची कक्षा भेदून जाणारी भरारी मला अनुभवायची होती.मात्र पहिल्यावेळी प्रक्षेपण रहित झालं. अगदी आपण त्या केंद्रात आहोत आणि प्रक्षेपण होणार नाही असं वाटल्यावर थोडं निराश वाटलं; पण तिथला माहौलच असा होता की आपण परत येऊ अशी खातरीच वाटत होती. झालंही तसंच.लवकरच पुन्हा तारीख जाहीर झाली आणि आम्ही पुन्हा प्रक्षेपणस्थळी पोहोचलो.काय नव्हतं तिथं.अवकाश भरारीचं वेड पंखातच असावं लागतं वगैरे व्हॉट्सअ‍ॅप टीपिकल फॉरवर्ड आपण वाचत असतो. पण ते वेड, तो थरार, कामावरची अमिट श्रद्धा, परफेक्शन हे सारं माझ्या डोळ्यासमोर होतं. संपूर्ण देशाची मनं उंचावणारा हा सोहळा पाहण्यातही विशेष गॅलरीची व्यवस्था करण्यात आली होती. शास्त्रज्ञांचं मनोबल वाढविण्यासाठी हातात झेंडे घेऊन शाळा-शाळांचे विद्यार्थी उपस्थित  होते. त्यांच्या नजरेत तेच कुतूहल होतं, जे तिथं जमलेल्या प्रत्येकाच्या नजरेत होतं. भरपूर लोक होते.एवढंच कशाला आमच्यासोबत मीडिया गॅलरीत अनेक माध्यमांचे वाहनचालक होते. गॅलरीत जेवणखाण देणारे वेर्ट्स होते. जो तो त्या एका क्षणाची वाट पाहत होता.अखेर प्रक्षेपणपूर्व अखेरच्या टप्प्यातील उलटी गिनती सुरू   झाली. पाच -चार -तीन -दोन -एक आणि झिरो.

एक मोठा आवाज झाला आणि जीएसएलव्ही मार्क3 प्रक्षेपक चांद्रयानाला घेऊन अवकाशात झेपावले. उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला. ‘भारतमाता की जय, भारतीय शास्त्रज्ञांचा विजय असो’ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमला. तिरंगा हातात घेत चंद्रोत्सव साजरा होऊ लागला. हा सोहळा विशेष प्रेक्षक गॅलरीतून पाहणारे विद्यार्थी जयघोष करत होते. जवळपास संपूर्ण भारतातून विद्यार्थी अन् नागरिकांनी यासाठी ऑनलाइन नावनोंदणी केली होती. गेल्या सोमवारीही मोठय़ा उत्साहात नागरिक तसेच विद्यार्थी या ठिकाणी आले होते. आणि आज पुन्हा आले. ते डोळ्यात असीम विश्वास घेऊनच. सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्राच्या प्रवेशद्वारावर   भारतीय शास्त्रज्ञांनी अहोरात्र मेहनत करून बनविलेल्या प्रक्षेपकाच्या प्रतिकृती सर्वाचे स्वागत करत होत्या. या प्रक्षेपकांपुढे विद्यार्थी अन् पालक सेल्फी काढून घेत होते. प्रक्षेपण होताच सर्वानी टाळ्या वाजत जल्लोष केला. खरं तर गेल्यावेळी नंतर अनेकांनी पुन्हा ऑनलाइन नावनोंदणी केली. पुन्हा प्रक्षेपण केंद्र गाठलं. चेन्नई येथील वुमन ािश्चन कॉलेजमधून आलेल्या एल्वीन डिसूजा आणि निंदिनी मुरुगन तिथं भेटल्या. एल्वीन म्हणाली, ‘फार अभिमान वाटतो आहे, आज या ठिकाणी खर्‍या अर्थानं आपण भारतीय म्हणून एकत्र आलो आहोत. आम्ही फिजिक्सच्या विद्यार्थिनी. आता आमचंही एक स्वप्न आहे की, भविष्यात इसरोत काम करायचं. असं काम करायचं, ज्याला देशाला अभिमान वाटेल.’अभिमान!हाच एक शब्द. त्या वातावरणात आम्ही सारे भारतीयच होतो. चांद्रयान ढगाआड गेलं तेव्हा तिथं जमलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं.ते पाणी खूण होती आपल्या भारतीय असण्याची.आणि या चांद्रयानानं पुन्हा डोळ्यात पेरलेल्या स्वप्नांसह नव्या उमेदीची! 

 

(निनाद लोकमतच्या पुणे आवृत्तीत वरिष्ठ उपसंपादक आहे.)