प्लास्टिकवर फुली मारता येईल तुम्हाला?

By Admin | Updated: July 24, 2014 18:58 IST2014-07-24T18:58:49+5:302014-07-24T18:58:49+5:30

नोबेल पुरस्कार विजेते आर. के. पचौरी हे नाव तर तुम्ही ऐकलं असेलच.ते नुकतेच भारतात येऊन गेले

Can you blossom on plastic? | प्लास्टिकवर फुली मारता येईल तुम्हाला?

प्लास्टिकवर फुली मारता येईल तुम्हाला?

>नोबेल पुरस्कार विजेते आर. के. पचौरी हे नाव तर तुम्ही ऐकलं असेलच.
ते नुकतेच भारतात येऊन गेले. हिमाचल प्रदेश विद्यापीठात त्यांचं भाषण होतं, विषय होता, ‘क्लायमेट चेंज-इम्पॅक्ट अँण्ड अँडाप्टेशन’.
वातावरण बदल होत आहेत, नेहमीचे-सरावाचे वातावरण बदलून ऋतूचक्रानंही आपली येण्याजाण्याची रीत बदलली आहे. ते बदलणारं ऋतूचक्र नीट समजून घेऊन आपण त्याच्याशी कसं जुळवून घेऊ शकतो, कुठले बदल करु शकतो हे सांगणारं डॉ. पचौरींचं भाषण खास विद्यापीठात तरुण मुलामुलींसाठी होतं. त्यांनी तरुण मुलांना एकच सोपी, छोटी गोष्ट सांगितली, 
‘वातावरण बदलतंय, जे चुकलंय, ते चुकलंच आहे. पण आता मात्र आपण एक गोष्ट करुनच शकतो. ज्याचं विघटनच होऊ शकत नाही, अशा वस्तूंचा कमीत कमी वापर करणं तर आपल्या हातात आहे.’
मुद्दा हाच आहे की, तरुण मुलं ते कसं करु शकतात? त्यासाठी त्यांनी एक सोपी गोष्टही सांगितली.
प्लास्टिक बंद
शक्य झालं तर प्लास्टिक आपल्या आयुष्यात बाद करुन टाका. प्लास्टिकचं किंवा जे प्लास्टिम मधूनच येतं, काही म्हणजे काहीच वापरायचं नाही. असं म्हणत त्यांनी मुलांना सांगितलं की, यादीच करा की तुम्ही कशासाठी, कधीकधी प्लास्टिक वापरता. बाकी मोठमोठे प्रयत्न करा अगर करु नका. हे एवढं एक तरी आपल्या आयुष्यात कराच. 
-म्हटलं तर सोपा उपाय आहे, पण जमेल का आपल्याला?
- ऑक्सिजन टीम

Web Title: Can you blossom on plastic?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.