ग्रोइंग टुगेदर, सोबत जगण्याचा आनंद कसा कमवता येईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 06:50 AM2019-12-26T06:50:00+5:302019-12-26T06:50:02+5:30

झाडं, मासे, मांजर. अशा जिवंत जगासोबत वाढण्या-वाढवण्याचा जिव्हाळा

Bucket list 2020 : Growing Together, Earn Happiness Together | ग्रोइंग टुगेदर, सोबत जगण्याचा आनंद कसा कमवता येईल?

ग्रोइंग टुगेदर, सोबत जगण्याचा आनंद कसा कमवता येईल?

Next
ठळक मुद्देआपल्यासोबत एका जिवंत गोष्टीशी आपण जोडले जाऊ शकतो. 

प्राची  पाठक 


कुठेतरी पाहिलेल्या अनेक गोष्टींमध्ये आपलं मन रमलेलं असतं. त्या गोष्टी आपल्याला हव्याहव्याशा वाटलेल्या असतात. आपल्या जाण्या-येण्याच्या रस्त्यावर एखादं मस्त गार्डन आपल्याला दिसत असतं. कॉलेजमध्ये वेगवेगळ्या डेज्चं सेलिब्रेशन होतं, तेव्हा कुणीतरी आपल्या घरच्या बागेतल्या फुलांचे बुके आणून सजवलेले असतात. ते पाहून आपल्याला खूप प्रसन्न वाटलेलं असतं. आपल्याकडेही अशी एखादी छोटीशी बाग असावी, अशी आपली मनापासून इच्छा असते. कधी आपल्याकडे त्यासाठी जागा नसते, कधी आपल्याला वेळ नसतो म्हणून आपण झाडांची हौस प्रत्यक्षात आणत नाही. कधी आपल्याला झाडांसाठी नेमकं काय करावं, ती कशी लावावी, कशी जपावी, हे माहीत नसतं. कधी नर्सरीतल्या झाडांच्या किंमती आपल्याला बजेटच्या बाहेर वाटत असतात. अशी एक ना अनेक कारणं ! जे झाडांचं तेच कुणाच्या घरी बघितलेल्या फिश टँकचं. त्या माशांकडे बघत अनेकदा आपण आपल्या मनातली कचकच विसरून गेलेलो असतो. फिश टँक आपल्याही घरी असावा, असं आपल्याला आतून वाटत असतं. कदाचित घरचे काय म्हणतील, आपल्याला हे जमेल की नाही असेही काही प्रश्न मनात येत असतील. कधी एखादं बोन्साय केलेलं झाड आपल्याला खुणावत असतं. आपल्याला ही कला शिकायची असते. मग मनात येतं की कोणाची वाढ अशी कशाला खुंटवून ठेवायची? आपण तो नाद सोडून देतो. कधी कुणाकडे पाहिलेले पक्षी आपल्याला फार आवडतात. (यासंदर्भातला कायदा मात्र समजून घ्यायला हवा.) आपल्याकडेही असे पक्षी असते तर. अशी कल्पना आपण करत राहतो. थोडा धीर एकवटून कधी एखादा पक्षी, एखादं कुत्र्याचं पिल्लू, एखादं मांजर आणायला निघालो की या जिवांना त्यांच्या त्यांच्या जागी मोकळं असू दे अशी ही भावना आपल्या मनात येऊन जाते. मध्येच कुणीतरी फिश थेरपीबद्दल काही सांगतो. पुन्हा आपल्याला वाटतं, अरे आपल्याकडे असा कमळाचा हौद असता तर? आपणही त्यात असे मासे सोडून आणि त्यात पाय टाकून बसलो असतो. कित्येकदा आपल्याला आपल्यासाठी असा आपल्यापुरता भाजीपाला लावून बघायची इच्छा असते. ती इच्छाही आपण अशीच पुढे ढकलत राहतो. 

काय करता येईल?
खरं तर आपल्या लहान-सहान इच्छा पुढे ढकलत राहायची काही गरज नाही, हे स्वतर्‍ला पक्कं बजावायचं. एखाद्या झाडाची वाढ बोन्साय म्हणून रोखून धरायची नसेल, तर आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये आपण एखाद्या टबमध्ये कमळाचा कंद आणून टाकू शकतो. कंदासोबतच त्यात थोडे गप्पी मासे सोडून बघू शकतो. मासे घरात हवे असतील तर सुरुवातीलाच महागडी फिश टँक घ्यायची काहीच गरज नाही. गप्पी माशांपासूनच सुरुवात करता येईल. आपण वरचेवर गावाला जाणार असू, तर एखाद्या पाळीव प्राण्याची जबाबदारी घेण्यापेक्षा हे गप्पी मासे नक्कीच त्या कमळाच्या कंदासोबत त्यांचे त्यांचे खेळत वाढत राहतील. आपली हौस आणि आपला वेळ बघून एखादं कुत्र्याचं पिल्लू आपण पाळून बघू शकतो. एखादी मांजर आपल्या अंगणात न पाळताच फेर्‍या मारते आहे का, ते शोधू शकतो. त्या मांजरीशी बाहेरच्या बाहेर मैत्नी करू शकतो. आपल्याला आवडतो तो भाजीपाला आपण एखाद-दोन कुंडय़ांमध्ये लावून बघू शकतो. सुरु वातीला एखाद-दोन रोपांचीच जबाबदारी घ्यायची. त्यांच्याबद्दल माहिती मिळवायची आणि बी रु जवून द्यायचं. 

त्याने काय होईल? 
1- आपल्यासोबत एका जिवंत गोष्टीशी आपण जोडले जाऊ शकतो. 
2- त्या जिवंतपणाची मजा, तो स्पर्श, अनुभव आपण लाइव्ह घेऊ शकतो. 
3- दिवसातला ठरावीक वेळ या जिवंत गोष्टीला दिल्याने वेगळी रिलॅक्सेशन टेक्निक्स आपल्याला लागणार नाहीत.
4- एखाद्या नवीन विषयाची आपल्याला घरबसल्या माहिती होईल आणि आपलं अनुभवविश्व समृद्ध होईल.

Web Title: Bucket list 2020 : Growing Together, Earn Happiness Together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.