बबल नेल

By admin | Published: August 20, 2015 02:32 PM2015-08-20T14:32:29+5:302015-08-20T14:32:29+5:30

नेल आर्ट नावाच्या नव्या कलेची भुरळ पडलेल्या मुलींचा एक नवाच धाडसी प्रयोग

Bubble nail | बबल नेल

बबल नेल

Next
>बबल नेल्स हा शब्द गेलाय का तुमच्या कानावरून एव्हाना?
या दोन शब्दांनी नेल आर्टच्या जगात सध्या एकदम धूम उडवून दिली आहे.
नेलपेण्ट लावणं ही साधी गोष्ट उरलेलीच नाही, ती एक कला झाली आहे. पण आता त्या कलेत एक नवा ट्रेण्ड दाखल झाला आहे, त्याचंच नाव बबल ट्रेण्ड.
कॉलेजात जाणा:या मुली तर या बबल नेलच्या क्रेझपायी हरखून गेल्या आहेत असंही कळतं. नखांवर सुंदर फुगे येऊन बसावेत, त्यावर सुंदर नक्षी असावी तशी दिसतात हे नेलपेण्ट लावलं की नखं. फुगीर-टपोरी आणि देखणीही.
या बबल नेल्सनाच हम्प नेल्स असंही म्हणतात.
सोशल मीडियात जा, या नेलआर्टविषयी उलट सुलट बरंच काही वाचायला मिळेल.
काही तिचे दिवाने आहेत. आपापल्या नेल बबल्सचे फोटो टाकतात. काही ते कसे केले याचे व्हिडीओ टाकतात, तर काहीजणी त्याची यथेच्छ टिंगलही करतात.
आपल्याकडे अजून या सा:याची क्रेझ कमी असली तरी अमेरिकेत हा ट्रेण्ड जोरात आहे. त्यावरून नखाएवढय़ा अस्मितांचे प्रश्न निर्माण व्हावेत इतकी या ट्रेण्डची धूम आहे.
एक नक्की आपल्या नैसर्गिक नखांचा आकार बदलून वेगळ्या पद्धतीची नखं तयार करणं, हा प्रकार म्हटलं तर अघोरीच.
पण फॅशन म्हटल्यावर कोण कुणाला रोखणार?
एक नक्की हे प्रकार कुणी घरच्या घरी करू नयेत; नेल आर्टवाल्या एक्सपर्टकडूनच ते करून घ्यावेत. पण ते कसं करतात याची एक पद्धत मात्र इथं सांगता येईल.
1) अॅक्रिलिक या नेल आर्टमधे सगळ्यात महत्त्वाचा घटक. नेल क्लिपरने हे अॅक्रिलिक अत्यंत सावधपणो कापतात.
2) त्यात नेलपेण्ट भरतात. म्हणजेच नखाचा वरचा पातळ थर कापून त्या खडय़ात नेलपेण्ट भरतात.
3) मग गरम पाण्यात एसटोन घालून त्यात ही नखं काही काळ बुडवून ठेवली जातात. पण फार गरम नाही, कोमट पाणी. कुठल्याही गरम पदार्थाला हात न लावायचा नियम पाळायचाच.
4)  मग हळूच बाजूचं अॅक्रिलिक काढून टाकायचं.
5) त्यावर पेट्रोलियम जेली लावायची, आणि मग हे बबल नेल तयार.
6) आधी म्हटलं तसं ते करणं सोपं नाही, पण केल्यावर मात्र हात अगदी वेगळे दिसू शकतात. सुंदरही.
7) फॅशनच्या नावाखाली ज्यांना प्रयोग करत रिस्क घ्यायची, त्यांनीच ही क्रेझ अनुभवलेली बरी!
-श्रवणी बॅनर्जी

Web Title: Bubble nail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.