मुलींच्या नावे बोगस अकाउण्टपासून सावधान
By Admin | Updated: July 12, 2016 15:46 IST2016-07-12T15:28:18+5:302016-07-12T15:46:48+5:30
आपल्याला फेसबुकवर एखाद्या अनोळखी मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली तर तुम्ही काय करता?

मुलींच्या नावे बोगस अकाउण्टपासून सावधान
>-नम्रता फडणीस
आपल्याला फेसबुकवर एखाद्या अनोळखी मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली तर तुम्ही काय करता?
तिच्या प्रोफाईल मध्ये कुणीतरी म्युच्युअल फ्रेंड दिसताहेत म्हणून लगेच ती रिक्वेस्ट ओके करायला जाल तर फसण्याचीच शक्यता जास्त. तरुण मुलांनाच नाही तर तरूणींनाही सहजपणे जाळ्यात ओढण्यासाठी एका तरूणीच्याच नावाने दुसऱ्या तरूणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. मुलगीच आहे म्हणून मुली ती क्षणात स्वीकारतातही. आणि मग ती थेट चँटींगला सुरूवात करत. आणि मग नंतर अश्लिल मेसेज पाठवले जातात. काही वेळानंतर ती व्यक्ती ‘ती’ नव्हे तर ‘तो’ असल्याचं कळतं.
अशाप्रकारे महिलांच्या नावाने बनावट अकाऊण्ट सुरू करून तरूणींची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. याविरूद्ध तक्रार करण्यास तरूणी पुढे येत नसल्याने असे प्रकार सर्रास करणाऱ्या नेटिझन्सच्या हातात आयते कोलीतच मिळाले आहे. आजचे युग हे टेक्नोसॅव्ही असल्याने प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहेत. या मोबाईलची तरूणाई इतकी अँडिक्ट झाली आहे की चोवीस तास त्यांचं विश्व या उपकरणाशी बांधलं गेलं आहे. सायबर कॅफे मध्ये न जाताही आता हातातल्या मोबाईलवर फेसबुक, ट्विटर हाईक यांसारखी अँप्लिकेशन्स डाऊनलोड करून चँटिंगचे प्रमाण दिवसागणिक वाढत चाललं आहे. त्यातून मग अशा उपद्रवी व्यक्तींच्या जाळ्यातही तरूणी नकळतपणे ओढल्या जाऊ शकतात आणि त्यांची फसवणूक होऊ शकते, अशाच प्रकारच्या दोन तक्रारी ’ लोकमत’कडेच आल्या आहेत, त्यामुळे अशा फ्रेंड रिक्वेस्ट आल्यानंतर तरूणींनी त्याचा स्वीकार करण्याआधी अकाऊंटची खात्री करून घ्यावी आणि असा कुठला अनुभव आला तर तात्काळ सायबर सेलशी संपर्क साधावा.
होतं काय?
तरूणींच्या नावाने बोगस फेसबुक अकाऊण्ट ओपन करण्याचं प्रमाण वाढतं आहे. तरूणीच्याच नावानं अकाऊण्ट तयार करून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते, त्या अकाऊंटची शहानिशा केल्यास त्या अकाऊंटवर सर्व फोटो तरूणीचेच दिसत असल्यानं तात्काळ विश्वास ठेवून संबंधित तरूणीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली जाते. आणि मग फेसबुक मेसेंजरवर त्या व्यक्तीला चँटिंगचे रान खुलं होतं. सुरूवातीला आपण मुलगा आहोत असं सांगितलं जात नाही. पण काही मेसेज वाचल्यानंतर एक मुलगी असे अश्लिल मेसेजे कसे करू शकते, याची शंका येते आणि समोरच्याककडून माहिती काढून घेणारा एखादा जरी मेसेज टाकला तर ती व्यक्ती तुम्हाला ‘ब्लॉक’ करून टाकते.
त्यात अनेकदा एखाद्या गाजलेल्या कलाकाराची फ्रेंड रिक्वेस्ट आल्यानंतर हुरळून जाऊन तरूणींकडून फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली जाते. पण सावधान, बहुतांशी ते फेक अकाऊंटच असण्याची दाट शक्यता असते.
काय कराल?
* शक्यतो अनोळखी व्यक्तीच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका.
* जर स्वीकार केलाच तर तिची चँटिंग पद्धत आणि उद्देश समजून घ्या.
* एखादा अश्लिल मेसेज आला तर लगेच माहिती काढण्याचा प्रयत्न करू नका.
* चँटिंगमधून थोडेसे खोलात जायचा प्रयत्न करा आणि काय चालले आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा.
* जास्त प्रश्न विचारलेत तर पुढची व्यक्ती तुम्हाला ब्लॉक करू शकते.
* तिच्याशी संपर्कात रहाताना सायबर सेलला देखील तक्र ार नोंदवा. ज्यायोगे त्या व्यक्तीचा ठाविठकाणा काढणं सोपं जाईल.
* पोलिसात तक्रार करायला घाबरू नका.