शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

बी मॅन, मधमाश्या आवडतात ना, मग नोकरी सोड आणि त्यांच्यासाठी काम कर !

By अोंकार करंबेळकर | Published: December 14, 2017 3:01 PM

त्याला वाटलं, मनासारखं जगायचं, आवडीचं काम करायचं तर म्हातारपणापर्यंत का वाट पहा. मधमाश्या आवडतात ना, मग नोकरी सोड आणि त्यांच्यासाठी काम कर !

त्याला वाटलं, मनासारखं जगायचं,आवडीचं काम करायचं तरम्हातारपणापर्यंत का वाट पहा.मधमाश्या आवडतात ना,मग नोकरी सोड आणित्यांच्यासाठी काम कर !तसंच त्यानं केलंही,आता चकाचक आॅफिसात काम न करतातो मधमाश्यांची पोळी काढत फिरतो.आत्ता उठावं आणि ही नोकरी सोडून निघून जावं, आपले छंद पूर्ण करावेत, फिरायला जावं, ट्रेकिंगला जावं असं आपल्या मनातही येतंच अनेकदा. जे आवडतं तेच करायला वेळ नाही, हा किडा तर मेंदू कुरतडतोच. अनेकदा वाटतं की, आज नाही जमत पण काही वर्षांनंतर मी अमुक करणार, तमुक तर करणारच! डोक्यात कल्पना येतात पण प्रत्यक्षात आपल्या हातून काहीच होत नाही. सगळं डोक्यातच राहतं. लोक काय म्हणतील वगैरै तर असतंच डोक्यात, त्यात पैसे कमवून नोकरी करणं भाग असतं. पण पुण्याच्या एका तरुणाने मात्र मनासारखं जगण्याची स्वत:ची इच्छा प्रत्यक्षात आणली आणि तो कामालाही लागला. अमित गोडसे त्याचं नाव.अमित तुमच्या आमचासारखाच. कोल इंडियामध्ये त्याचे बाबा नोकरी करत असल्यामुळे त्याचं बालपण त्यांच्या बदलीप्रमाणे फिरतं राहिलं. कोल इंडियाच्या कर्मचाºयांची घरं दाट झाडीत असत. कोळशाच्या प्रदूषणाचा त्रास होऊ नये हा त्या झाडीमागचा उद्देश असला तरी ही झाडं अमितच्या आयुष्यात भरपूर काही घेऊन आली. त्यानं झाडांशीच मैत्री करायचं ठरवलं. मनात आलं की झाडावर चढायचं आणि निवांत बसून राहायचं, मुंग्या, मधमाशा, पक्षी, खारुताई, फुलपाखरांकडे पाहत बसायचं हे त्याचे छंद. हवं तेव्हा फळं तोडून खायची. आई रागावली तरीही रुसून झाडाच्याच शेंड्यावर जाऊन बसायचं, असं सगळं भारी बालपण होतं.दहावी, बारावीला चांगले गुण मिळाले आणि इथे त्याच्या स्वप्नांचा ताबा समाजाने घेतला. एवढे चांगले गुण मिळाले म्हणजे मुलानं इंजिनिअरच झाले पाहिजे या लोकप्रवादामध्ये तोसुद्धा ओढला गेला. त्यालाही इंजिनिअरिंगला जावं लागलं. पुढे मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. सकाळी आॅफिसला जायचं, रात्री घरी यायचं यापलीकडे दिनक्रम उरला नाही. आपला निसर्गाशी संवाद तुटतोय हे त्याला रोज जाणवायचं. ही असली यंत्रासारखं आयुष्य जगायला लावणारी, मनासारखं काहीच न करू देणारी नोकरी सोडायची त्याच्या मनात येऊ लागलं. काही दिवस तो इंडिया अगेन्स्ट करप्शन मोहिमेतही काम करत होता. तिकडे बरेच निवृत्त लोक येत. हे रिटायर्ड लोक सतत आम्ही तारुण्यात मनासारखं जगण्याची संधी उगाच वाया घालवली, तेव्हा छंद, व्यायाम सोडायला नको होते असे म्हणत.अमितला वाटू लागलं की, आपणही काही केलं नाही तर काही वर्षांनी या लोकांसारखंच चरफडत बसू. त्यातच एके दिवशी एक वाईट बातमी आली. अमितचा एक मित्र तिकडे लांब ओडिशात रेल्वेने प्रवास करत होता. दारामध्ये उभा असताना त्याला झोप लागली आणि एका बेसावध क्षणी तो रेल्वेबाहेर फेकला गेला. आपला जवळचा मित्र गेल्याचं दु:ख अमितला झालंच पण आपल्या आयुष्याची काहीच शाश्वती नाही याची जाणीव झाली. उद्या करू, परवा करू, निवृत्तीनंतर करूअसं म्हणत आवडीनिवडी लांबणीवर टाकल्या तर हाती काहीच येणार नाही असं त्याला वाटू लागलं.बराच विचार करून त्यानं पाच वर्षं सुरु असलेली नोकरी सोडली. आणि निसर्गाशी संबंधित काहीतरी काम करावं असं ठरवलं. त्याच्या पुण्याच्या राहत्या सोसायटीमध्ये एके दिवशी भरपूर मधमाश्या मेलेल्या त्याला दिसल्या. मधमाश्या चावू नयेत म्हणून विषारी फवारा मारून पोळं पाडण्यात आलं होतं. तेव्हाच त्याला वाटलं की, या मधमाश्यांचा जीव वाचवण्यासाठी काहीतरी करावं म्हणून काम करायचं ठरवलं. मग मधमाश्यांचं पोळं उतरवण्याचं टेक्निक शिकायला तो सरळ आदिवासी लोकांबरोबर राहिला, सुरुवातीला काही माश्या चावल्याही पण माश्यांना न मारता पोळं हलवता येऊ शकतं हे त्याच्या लक्षात आलं. व्यवस्थित ट्रेनिंग घेतल्यावर तो स्वत:च पोळी उतरवायला लागला.मधमाश्यांचे पाच मुख्य प्रकार असले तरी आपल्याकडे रानटी (जंगली) आणि पाळीव अशा दोन माश्या सहसा आढळतात. त्यात पाळीव म्हणजे मधुमक्षिका पालनासाठी वापरल्या जाणाºया माश्या या फक्त अंधारातच पोळं बनवतात तर दुसºया सूर्यप्रकाशात पोळं तयार करतात. अमित पुण्यामध्ये ठिकठिकाणी लागलेली पोळी काढायला लागला. ग्रीलवर, सोसायटीच्या खिडक्या, तावदानं, छत यांना लागलेली पोळी न जाळता काढता काढता येतात हे त्यानं लोकांना पटवून दिलं. कधीकधी पाळीव माश्या एसीच्या आत, प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या नक्षीमागे किंवा टॉयलेटच्या वरती अंधाºया जागेत पोळं करतात. ती पोळीही सुरक्षित बाजूला करायला अमितने सुरुवात केली. त्याच्या या कामाची माहिती लोकांनी एकमेकांना सांगितल्यामुळे अमित अख्ख्या पुण्यात प्रसिद्ध झाला. रोज मधमाश्यांना हाताळल्यामुळे त्याचे स्वत:चे गैरसमज दूर झाले. तो त्यांच्याबद्दल अधिकाधिक वाचू लागला, यू-ट्यूबवर व्हिडीओ पाहू लागला. पुण्यात साधारणत: आठशे पोळी त्याने हलविली आहेत, अजूनही रोज पोळी हलवण्यासाठी दोन ते तीन कॉल येतात.मधमाशी असं नुसतं म्हटलं तरी किंचाळणाºया पोरी जेव्हा मधमाश्यांनी भरलेली जाळी हातात घेतात तेव्हा त्यांच्या चेहºयावरील आनंद आणि आत्मविश्वास पाहून अमितला हसूही येतं आणि आनंदही होतो. गैरसमज दूर झाले की प्राणी-पक्ष्यांशी मैत्री करता येते असं तो म्हणतो.आज त्याचं काम जोरात सुरू असताना त्याला मनापासून आनंद तर मिळतोच त्याहून म्हातारपणात अरेरे, हे काम करायचं राहून गेलं, तेव्हा हे करायला हवं होतं असं खंत करत, चरफडत बसावं लागणार नाही याचा त्याला जास्त आनंद होतो. त्याच्या या कामामुळे पुण्यात त्याच्यासारखेच भन्नाट विचार करणारे तरुण त्याला भेटू लागले, त्यांच्यामध्ये विविध कल्पनांची देवाणघेवाण होऊ लागली, नव्या कल्पना समजू लागल्या आहेत, मनासारखं जगा हाच त्याचा आनंदाचा फॉर्म्युला आहे.हे काम करताना त्याच्या आणखी एक लक्षात आलं ते म्हणजे लोकांची प्राण्यांकडे पाहण्याची वृत्ती. दिसली माशी की मार ही वृत्ती त्याला जाम खटकते. त्याहून आम्हाला मध हवाय पण माश्या नकोत हा लोकांचा भाव त्याला अजिबात आवडत नाही. जर मधमाश्या नसल्या किंवा नाहीशा झाल्या तर पिकांचं परागीभवनच होणार नाही. लोकांचे माश्यांबाबत गैरसमज दूर करण्यासाठी, त्यांची भीती जाण्यासाठी तो शाळा, कॉलेजांमध्ये, सोसायटींमध्ये जायला लागला. लोकांना माश्या हाताळायची संधी देऊन त्यांना धीर देऊ लागला. माश्या चावू नयेत म्हणून काय करावं? चावली तर काय करावं? याबाबत लोकांना माहिती नसते त्यामुळे ते घाबरून सरळ माश्या मारून टाकतात. पण अमितच्या धावपळीमुळे ते कमी झालं. तो म्हणतो, हे पोळं सुरक्षित ठेवण्याच्या संकल्पनेमुळे फक्त माश्यांचा जीव वाचतो असं नाही तर आपण मध गोळा करू शकतो, परागीभवन कायम ठेवू शकतो. आजकाल शहरांमध्ये टेरेसवर भाज्या, फळं पिकवायची पद्धती आली आहे. अमितने पुण्यात असं टेरेस गार्डनिंग करणाºया काही लोकांना मधुमक्षिका पालनाचा सल्ला दिला. त्यामुळे त्यांच्या पिकांनाही फायदा झाला. अमित हेच म्हणतो प्रत्येक समस्येतून किंवा आपण ज्याला समस्या समजत असतो त्यावर उत्तर शोधता येते.