आर्ट्सवाले

By admin | Published: July 2, 2015 03:53 PM2015-07-02T15:53:26+5:302015-07-02T15:53:26+5:30

सायन्सवाले हुशार, कॉमर्सवाले मध्यम आणि आर्ट्सवाले डफ्फर..कोण म्हणतं असं?

Artswale | आर्ट्सवाले

आर्ट्सवाले

Next

सायन्सवाले हुशार, कॉमर्सवाले मध्यम आणि आर्ट्सवाले डफ्फर..कोण म्हणतं असं?

मुंबईत रुईया किंवा झेव्हिअर्सबाहेर स्कॉलर्सच्या रांगा आहेत आणि पुण्यात एसपी-एफसीमध्ये जागा नाहीत! नाइण्टी फाईव्ह पर्सेण्टवालेही हल्ली आर्ट्सला जातात..का?
----------
आर्ट्सला कोण जातं?
तर सगळा उरसूर-गाळसाळ रेम्या डोक्याचा ढ गठ्ठा!
- असं ‘वाटणा:यांचा’ एक जमाना होता.
आजही त्या जमान्यातले काही ‘शहाणो’ घरबसल्या असं समजतात की,
ज्यांना करिअर करायचं त्यांनी आर्ट्सला जाऊ नये!
पण ज्यांना असं वाटतं ना, त्यांना शिक्षण क्षेत्रतली बदलती हवा कुठं वाहतेय याची काही टोटलच लागलेली नाही असं समजा.
आणि ‘डेमो’च हवा असेल तर बडय़ा नामांकित आर्ट्स कॉलेजात जा,
आणि आर्ट्सला अॅडमिशन घेतलेल्यांची ‘कट ऑफ’ लिस्ट पहा.
स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
.ऐंशी टक्केवाले तर सहज आर्ट्सला अॅडमिशन घेतातच, पण नव्वदीचा यशस्वी उंबरठा ओलांडून स्कॉलर ठरलेलेही आता अभिमानानं आणि ठामपणो सांगताहेत की, 
आम्ही आर्ट्स घेतलंय!
मुंबई-पुण्यातल्या बडय़ा कला महाविद्यालयात तर आर्ट्सची कट ऑफ लिस्ट पाहून डोकं गरगरतंच.
मुंबईत रुईया किंवा ङोव्हिअर्सला आर्ट्सला अॅडमिशन मिळवायची तर पंचाण्णव टक्के तरी लागतातच! पुण्यातल्या एसपी-एफसीचंही तेच!
हा सारा बदल कशामुळे झाला? कुणामुळे झाला?
या ‘स्कॉलर्स’ना आर्ट्सला जावं असं का वाटायला लागलं?
याच प्रश्नांची उत्तरं शोधत राज्यभरातल्या अनेक कॉलेजातल्या अकरावी-बारावीतल्या मुलांशी बोललो. 
विचारलं त्यांना की, ‘अबोव्ह नाइण्टीवाले’ असूनही तुम्ही आर्ट्सला का अॅडमिशन घेतली? 
खरंच आर्ट्सच्या क्षितिजावर तुम्हाला करिअरच्या नव्या संधी दिसताहेत का?
त्या प्रश्नाचं उत्तर तर मुलांनीच दिलं,
पण त्या उत्तरापेक्षाही महत्त्वाचा दिसला एक बदल.
जो सांगतो आहे की, या 16-17 वर्षाच्या मुलांनी जुनी झापडं लावलेली विचारपद्धतच झुगारून दिली आहे!  शिक्षणव्यवस्थेतील वर्णव्यवस्थाही त्यांनी मोडून काढायला घेतली आहे. सायन्सवाले हुशार, कॉमर्सवाले मध्यम आणि आर्ट्सवाले डफ्फर, ही जुनाट बाळबोध समजूत तर आता रद्दच झालीय.
उलट आपण आर्ट्सवाले आहोत, हे ही मुलं अभिमानानं सांगतात.
बदलतं व्यावसायिक जग, आंतरराष्ट्रीय संबंध-व्यापारउदीम यातून उभ्या राहणा:या नव्या संधी या मुलांना आता खुणावत आहेत यातून आलेला हा एक महत्त्वाचा बदल!
आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे, आपल्याला जे आवडतं ते शिकायचं आणि त्याविषयी ठाम राहायचं ही आलेली समज! अर्थात ही समज मुलांपेक्षा त्यांच्या पालकांना अधिक प्रमाणात येताना दिसतेय. म्हणून तर या ‘अबोव्ह नाइण्टीवाल्यांना’ही घरी लढाया न लढता आर्ट्सला प्रवेश घेता येतोय!
या बदलत्या मानसिकतेचाच एक तपशीलवार शोध या अंकात.
 
या बदलत्या रंगरूपात स्कॉलर मुलींचे चेहरेच अधिक भेटतील,
आजच्या अंकात फोटोही मुलींचेच जास्त दिसतील,
का?
कारण आर्ट्सला जाणा:या ‘स्कॉलर’ मुलांचं प्रमाण आजही कमीच आहे!
असं का?
त्याचंही एक चटका लावणारं ‘त्रस’दायक उत्तर.
 
 
- ऑक्सिजन टीम

Web Title: Artswale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.