कलांचा बाप्पा मोरया
By Admin | Updated: September 17, 2015 23:19 IST2015-09-17T23:19:27+5:302015-09-17T23:19:27+5:30
कला हेच ज्यांचं पॅशन आणि तेच त्यांचं जगणं, असं मानणा:या नव्या ‘कला’कारांच्या

कलांचा बाप्पा मोरया
कला हेच ज्यांचं पॅशन
आणि तेच त्यांचं जगणं,
असं मानणा:या
नव्या ‘कला’कारांच्या
दुनियेत एक खास सफर..
बाप्पा.
काल वाजतगाजत आले!
‘त्यांच्या’ येण्यापूर्वीचं जग आणि ते आल्यानंतरचं जग
यात किती फरक असतो.
सारं कसं प्रसन्न, लख्ख, उत्साही
आणि आनंदी होऊन जातं.
त्या आनंदात जरा ‘अतिजोरात’ ढोल वाजले की,
कानांना ताप होऊन डोक्याला शीण होतो हे खरंच!
पण रस्त्यावरची आरास, वाजणारे कडक ढोल
आणि गणपतीत बेहोष नाचणारे लोक,
यापलीकडेही बाप्पा असतो.
14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती तो.
त्याच्या चरणी आपली सेवा रुजू करावी म्हणून
या दिवसांत जो तो आपापली कलासेवा सादर करण्याचा प्रयत्न करतो.
नव्या काळात तर जुन्याच कला काही नवीन रूपं घेऊन
आता तरुण मुलांच्या जगण्याचा भाग होत आहेत.
नवनवीन कला, नवनवीन आविष्कार
आणि त्यातले आनंद, त्यातली क्रिएटिव्हिटी
हे सारं आजही तरुण जगण्याचा भाग आहे.
अशाच काही नव्या कला मनापासून जगणा:या,
त्यांच्यासाठी जिवाचं रान करणा:या,
आपलं पॅशन जगणा:या काही तरुण मित्रमैत्रिणींची एक भेट या अंकात.
हे कलाकार ज्या कलांमधे रमलेत त्या एकतर नवीन आहेत,
किंवा जुन्याच गोष्टी नवा चोला लेवून त्यांच्या जगण्याचा भाग झाल्या आहेत.
जगण्यातल्या या कलेचा आनंद वाटून घ्यायचा
म्हणून ही खास पेशकश यंदाच्या गणोशोत्सवानिमित्त..
बाप्पा, आपल्या सा:यांनाच सद्बुद्धी देवो,
याच प्रार्थनेसह.
‘कलाकारांच्या’ दुनियेतली ही एक विशेष सफर.
- ऑक्सिजन टीम
(अंकातील सर्व मुलाखती आणि लेखन - सारिका पूरकर-गुजराथी, स्नेहा मोरे, पूजा दामले, सायली कडू)