शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

झटकेपट वजन कमी करणारं यो यो डाएट करताय? मग सावध व्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 3:11 PM

अनेकांची तक्रार, काहीही करा, वजन कमीच होत नाही. कमी झालं तरी झर्रकन वाढतं, असं का?

ठळक मुद्देत्यामुळे डाएट कधीपर्यंत करू, या प्रश्नाचं उत्तर एकच आयुष्यभर!  आणि व्यायाम कधीर्पयत तर तोही आयुष्यभर !!

- डॉ. यशपाल गोगटे

वजन कमी करणं, ही सध्या बहुसंख्य तरुणांची समस्या असते. गेल्या आठवडय़ात आपण पाहिलंच की, नुस्तं व्यायाम करण्याशी नाही तर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींशीही वजनाचा संबंध आहे. नियमित व्यायाम करण्याचे फायदे तर आहेतच. करण्याबद्दलची माहिती आपण मागील काही लेखांमधून जाणून घेतली. तसं अनेकजण उत्साहानं आहाराचे नियम आखतात. व्यायाम जोमानं करतात. वजन कमीही होतं. पण वजन कमी झाल्यावर पुढे काय? ते कमी झालेलं वजन टिकवून कसं ठेवायचं? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जो सगळेच विचारतात की, वजन नेमकं किती कमी करावं?   अनेकजण वजन कमी करायला सुरुवात करतात तेव्हा त्यांच्या मनात 10-15-25 किलो असे काहीसे भन्नाट आकडे असतात. इतकं वजन सहजासहजी कमी होत नसतं. त्यामुळे वजन कमी करायला सुरुवात केल्यावर अपेक्षित यश मिळत नाही. आपण इतकं काही करतोय, इतके दिवस करतोय तरी म्हणावं तसं वजन कमी होत नाही असं म्हणत काहीजण निराशेपोटी व्यायाम करणं, आहारावर नियंत्रण ठेवणं सोडून देतात. आणि म्हणतात काहीही करा, वजन कमीच होत नाही. याचं मुख्य कारण हेच की, आपण किती वजन कमी करायचो, याचा वस्तुनिष्ठ विचारच करत नाही. मग नक्की वजन कमी किती करावं? तर त्याचा एक नियम आहे. तुमच्या वजनाच्या पाचटक्के एवढे वजन कमी केलं तरी वजन कमी करण्याचे, चयापचयाचे आजार नियंत्रित राहण्याचे फायदे आपल्याला मिळतात. म्हणजेच 60 किलो वजन असणार्‍या तरुणीनं तीन किलो वजन कमी केलं तरी तिला त्या वजन कमी करण्याचा फायदा होतो. तेवढं होतंय का कमी, याचा सुरुवातीला विचार करा.वजन कमी केल्यावर ते टिकवून ठेवणंदेखील तेवढंच महत्त्वाचं असतं. झटकन वजन कमी करणं मग ते परत वाढवणं आणि नंतर परत कमी करणं या प्रकाराला ‘यो-यो’ असं म्हटलं ेजातं. ते शरीराला जास्त नुकसान करतं. त्यामुळे थोडंसंच जरी वजन कमी केलं तरीपण ते जास्त काळ तसंच टिकवून ठेवणं महत्त्वाचं. तर ते अधिक फायद्याचं ठरतं.

वजन उतरायला लागल्यावर काही काळानं कितीही प्रयत्न केला तरी वजन उतरत नाही. त्याला वजनाचा ‘प्लॅटो फेज’ असं म्हणतात. प्लॅटो फेजवर मात मिळवण्याकरता खाण्याकडे लक्ष देणं व योग्य व्यायाम करत राहणं हे गरजेचं असतं. आपण हे नियमित केलं तर प्लॅटो फेज आपोआप तुटते. वजन पुन्हा एकदा कमी व्हायला सुरुवात होते. व्यायाम कमी करण्यासाठी जसं आहारावर नियंत्रण ठेवणं गरजेचे असतं. तसंच कमी झालेलं वजन टिकवून ठेवण्याकरता व्यायाम करणं गरजेचं आहे.वजनाबद्दलची एक कायमची असलेली तक्र ार म्हणजे, माझं वजन कमी होतं; पण ते परत जैसे थे वाढून जातं. या वजनवाढीला ‘रिबॉउण्ड वेट गेन’ असं म्हणतात. याची अनेक कारणं  आहेत. मुख्य म्हणजे मेंदूत हायपोथॅलॅमसमधील वजनाचा एक सेट पॉइंट. पूर्वी जेव्हा दुष्काळ येत असे तेव्हा हा सेट पॉइंट वजनाला खूप कमी होऊ देत नसे. पण आता अनेकांची बरीच चांगली स्थिती असतानाच्या आजकालच्या काळात तो वजन कमी करण्यास बाधक ठरतो. वजन कमी व्हायला लागलं की शरीरात काही हार्मोन्स तयार होतात. त्यामुळे वजन पुन्हा वाढायला लागतं. यामुळेच वजन कमी करणं ही तात्पुरती योजना नसून यावर कायमस्वरूपी उपाय करावा लागतो. बरेचवेळा लग्नासाठी किंवा पार्टीसाठी किंवा इतर काही खास फंक्शनसाठी म्हणून वजन कमी केलं जातं. ते कार्य पूर्ण झालं की मग वाट्टेल ते खाणं, हादडणं, व्यायाम न करणं सुरू होऊन जातं. अशावेळेसही वजन परत वाढायला लागतंच.