are you a responsible citizen? take a test | सुजाण, जबाबदार नागरिक म्हणून आपण पास की नापास?
सुजाण, जबाबदार नागरिक म्हणून आपण पास की नापास?

ठळक मुद्देसांगा, किती मार्क द्यायचे आपण आपल्याला?

- अनन्या भारद्वाज

उद्या ऑगस्ट क्रांतिदिन.
चले जाव नारा दिला, तो हा दिवस. 
9 ऑगस्ट. पुढच्याच गुरुवारी 15 ऑगस्ट, स्वातंत्र्यदिन.
हे सारे उल्लेख आले की, आपला अभिमान डोळ्यात पाणी म्हणून तरळतो. आपल्या देशाचा, आपल्या प्रगतीचा सार्थ अभिमान वाटतो. ते वाटणं चूक नाहीच, पण हे सारं करताना स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक म्हणून आपण आपली कर्तव्यं चोख बजावतो का, याचाही जरा ताळमेळ कधीतरी मांडला पाहिजे.
आपण व्यवस्थेला, सरकारला, नेत्यांना प्रश्न विचारतो, त्यांना म्हणतो की, सांगा, देशासाठी तुम्ही काय केलं?
समजा, हा प्रश्न कुणी आपल्यालाच विचारला की, तुम्ही देशासाठी कोणत्या चांगल्या गोष्टी करता. कसे वागता तर आपण काय उत्तर देऊ?
देशभक्ती म्हणजे केवळ घोषणाबाजी नव्हे, तर कर्तव्यपूर्तीही आहे. अधिकारापेक्षा कर्तव्य महत्त्वाचं, ते निरपेक्ष भावनेनंच आधी करायला हवं. ते आपण करतो का?
जरा तपासून पाहू.
1) सिग्नल पाळले जातात की तोडले जातात?
2)ओव्हर स्पीडिंग होतं की नाही?
3) रस्त्यात, टर्नवर गाडी थांबवून फोनवर बोलतो की नाही?
4) गाडी चालवताना फोनवर बोलतो की नाही?
5) रांगांची शिस्त पाळतो का?
6) रस्त्यात पचापचा थुंकतो का?
7) रस्त्यात कचरा टाकतो का?
8) बस, ट्रेन इथं कचरा टाकतो का?
9) गड-किल्यांवर जाऊन काहीबाही खरडतो का?
10) सामाजिक शिस्त पाळतो का?
11) अपघात झाला तर शूट करतो की जखमीला मदत करतो?
12) सर्वत्र नियम पाळतो की मी तमक्याचा ढमका म्हणून ओळखी सांगतो?
13) वेळेवर सगळी बिलं भरतो का?
-अशी यादी कितीही मोठी करता येईल. आपण आपल्या देशावर प्रेम करतो तर या देशातले कायदे पाळणं, ते निभावणं ही आपली जबाबदारी नाही का? ते आपलं राष्ट्रप्रेम नाही का?
आपण आपलं राष्ट्रप्रेम कशात मोजणार? कसं दाखवणार? की निव्वळ घोषणा देणार? निव्वळ नारेबाजी करून पोकळ आवेश दाखवणार?
हे प्रश्न आपणच स्वतर्‍ला विचारले पाहिजे, जय हिंद म्हणताना मी उत्तम नागरिक बनेल म्हणून काय काय केलं हे सांगता आलं पाहिजे.
विचारा स्वतर्‍ला, आपण एक उत्तम नागरिक म्हणून स्वतर्‍ला दहा पैकी किती मार्क द्याल? आणि ते कमी असतील गुण तर कसं बदलणार स्वतर्‍ला.
आजपासूनच!


( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)


Web Title: are you a responsible citizen? take a test
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.