तुमच्यात इनिशिएटिव्ह आहे? - कसं ओळखाल?

By admin | Published: April 12, 2017 02:46 PM2017-04-12T14:46:53+5:302017-04-12T14:46:53+5:30

काम दिसतं तुम्हाला? कुणी कामच सांगितलं नाही म्हणून तुम्ही काहीच करत नाही? ‘इनिशिएिटव्ह’ हा सध्याचा अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे, एवढं लक्षात ठेवा.

Are you Initiative? - How do you know? | तुमच्यात इनिशिएटिव्ह आहे? - कसं ओळखाल?

तुमच्यात इनिशिएटिव्ह आहे? - कसं ओळखाल?

Next

काम दिसतं तुम्हाला? कुणी कामच सांगितलं नाही म्हणून तुम्ही काहीच करत नाही? ‘इनिशिएिटव्ह’ हा सध्याचा अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे, एवढं लक्षात ठेवा. ‘तू स्वत: काही इनिशिएिटव्ह घेतलेले आहेत का?’ असा प्रश्न हमखास विचारला जातो. हे इनिशिएिटव्ह कॉलेजमध्ये, सोसायटीमध्ये, कुटुंबामध्ये कोठेही असू शकतात. या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळ्या पद्धतीनं उमेदवाराकडून काढलं जातं. मुळात विद्यार्थी उमेदवार हा इनिशिएिटव्ह घेणारा असला की, संस्थेची बरीचशी कामं सोपी होतात. मराठीमध्ये या शब्दाला फार तर आपण ‘पुढाकार’ म्हणू शकू. परंतु या शब्दाचा अर्थ निव्वळ पुढाकार नव्हे. एखादी घटना योग्य पद्धतीनं विश्लेषित करून, दुसऱ्यांची वाट न बघता, स्वतंत्रपणे योग्य ती कार्यवाही करण्याच्या प्रवृत्तीला/गुणाला आपण ‘इनिशिएिटव्ह’ म्हणू शकतो. कर्मचाऱ्यांचा हाच गुण महत्त्वाचा ठरतो. आताच्या आधुनिक कार्यपद्धतीमध्ये ‘सांगकाम्या’ कर्मचारी कोणालाच नको असतो. कामाच्या जागी बऱ्यापैकी गुंतागुंत असते. बऱ्याचदा स्वत:ला काही निर्णय घ्यावे लागतात. अशावेळेस इनिशिएिटव्ह घेऊन एखादी सिस्टिम डेव्हलप करणारा, सुधारणा करणारा उमेदवार केव्हाही सरस ठरतो. एखादी कृती करण्याची गरज असताना, ती कृती दुसऱ्यांकडून अपेक्षित करणं केव्हाही चुकीचं आहे. उदाहरणार्थ आपण आताच्या राजकीय परिस्थितीबद्दल खूपदा चर्चा करतो, परंतु ही राजकीय परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करत नाही. साधं मतदार यादीत नाव नसेल तर मतदार यादीत नाव घालण्यासाठी प्रयत्नही करत नाही. एका कॉलेजमधील एका विद्यार्थ्याला जेव्हा वाटलं की, आपण काहीतरी करायला पाहिजे, तेव्हा त्यानं समविचारी मित्रांना एकत्र आणून आपल्या भागामध्ये मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी पुढाकार घेतला. हे त्याला कोणी सांगितलं नाही, पण त्याच्या मनातून काहीतरी करण्याची भावना होती. बऱ्याचदा आपण एखाद्याला फॉलो करतो, परंतु गरज असेल तेव्हा बदलासाठी इनिशिएिटव्ह घेणं आवश्यक ठरतं. असे तुमचे इनिशिएिटव्ह तुम्ही सांगू शकला, तर तुमच्यात काहीतरी खास दम आहे. पण आपल्या स्वभावात इनिशिएिटव्ह घेणं आहे हे कसं ओळखाल? हा तुमच्यातला गुण मुलाखतकर्ते कसं ओळखतात? तर अगदी साध्या साध्या उदाहरणातून आणि अनुभवातून. तुम्ही विद्यार्थी असाल तर कॉलेजमध्ये काय इनिशिएिटव्ह घेताहात? कर्मचारी असाल तर संस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी काय करताहात हे सर्व योग्य पद्धतीनं सांगता यायला हवं. जेव्हा मी फ्रेशर्सच्या इंटरव्ह्यूज घेतो, तेव्हा फक्त २० टक्के विद्यार्थीच असं काहीतरी वेगळं सांगू शकतात. बाकीचे ८० टक्के गप्प बसतात, नाहीतर ओढूनताणून काहीतरी सांगतात. इनिशिएट करायचं म्हणजे काय करायचं हे ठरवायचं कसं, असा प्रश्न जर तुम्हाला पडलाच असेल तर त्याचं उत्तर सोपं. सोसायटीच्या गणपती उत्सवात तुम्ही किती भाग घेतलाय? सुरु वात तिथूनही करता येतेच.- विनोद बिडवाईक Vinod.Bidwaik@dsm.com

(शिक्षणापासून ते नोकरीपर्यंत सॉफ्ट स्किल्स हा आपल्या जगण्यातला अविभाज्य भाग. त्याविषयीचीच ही चर्चा..)

Web Title: Are you Initiative? - How do you know?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.