शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

अ‍ॅपल आणि टेस्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 14:47 IST

तिकडे अमेरिकेत सिलिकॉन व्हॅलीत गाड्यांना स्पर्धक म्हणून आता विनाचालक, विनापेट्रोल, विनाचावी गाड्या धावण्याच्या तयारीत आहेत. जगातली स्पर्धा आणि स्पर्धक असे झपाट्यानं बदलत आहेत..

- डॉ. भूषण केळकरकाल मी सिलिकॉन व्हॅली कॉलिफोर्नियामध्ये होतो. माझ्या एका विद्यार्थिनीने फेसबुकच्या प्रख्यात एफ-८ कॉन्फरन्समध्ये भाग घेतला होता. मला उत्सुकता होती ती मार्क झुकरबर्ग यांच्या बीजभाषणाची. कारण तुम्ही वाचलं असेल की डाटा सिक्युरिटी ही माहितीच्या गोपनीयतेबद्दल मार्क झुकरबर्गची यूस काँग्रेस समोर टेस्टीमोनी होतीे. ती गाजली होती. या एफ ८ कॉन्फरन्समधील एकूण सूर होता की, गोपनीयतेबद्दल जी दक्षता घेतली ती पुरेशी नसली तरी त्याला इलाज नव्हता ! कॉन्फरन्स संपल्यानंतर फेसबुकची स्टॉक मार्केटवर किंमत वाढलेली होती!मला वाटतं की, भारतासकट सर्वांना याची जाणीव होते आहे की जिथे लोकं स्वत:हून समाज माध्यमांत भाग घेत आहेत तिथे त्याची त्यांना ‘‘किंमत’’ मोजायला लागणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप फुकट असलं तरीही !!सिलिकॉन व्हॅलीमधील अजून दोन महत्त्वाची प्रेक्षणीय स्थळे म्हणजे इंडस्ट्री ४.० मधला परिक्षेत्रातील अ‍ॅपल आणि टेस्ला. इंडस्ट्री ४.० मधील गंमत म्हणजे व्यवहारातील पूर्वीची मॉडेल्स बदलत आहेत. हेच बघा ना. मर्सेडिस बेन्स, बीएमडब्ल्यू किंवा अन्य गाड्यांचे स्पर्धक हे फोर्ड किंवा मारुती सुझुकी नाहीत त्यांचे स्पर्धक आहेत गूगल, अ‍ॅपल आणि टेस्ला. चालकविरहित पेट्रोल, डिझेल न वापरता विद्युत शक्तीवर चालणारी, चेहरा-स्पर्श, बोटांचे ठसे- डोळ्यांची बाहुली अशा अत्यंतिक व्यक्तिगत माध्यमातून गाडी चालू करता येणं (गाडीला किल्ली नाही !) अशा ‘जादू’च्या यंत्राची ही कमाल. तुम्ही नुसतं गाडीत बसायचं आणि पत्ता बोलून सांगायचा की गाडी सुरू आणि तुमच्या ईप्सित स्थळी कमीत कमी गर्दीतून कमीत कमी वेळात नेणार.तुम्ही मागे बसून व्हॉटस्अ‍ॅप वर मित्रमैत्रिणींशी बोलू शकाल, सिनेमा पाहू शकाल इ. पार्किंगचं झंझट नाही, सायकलवाला आडवा आला म्हणून डोक्याला झिगझिग नाही. सारं कसं कुल कुल ! मित्र-मैत्रिणींनो, ही कवी कल्पना नाही ! आज सकाळीच ज्या टेस्टला कंपनीसमोर होतो त्या कंपनीची ही लवकरच येऊ घातलेली स्वयंचलित चालकाविरहित गाडी आहे.२०१९ मध्ये येऊ घातलेली बिटॉन म्हणून चायनीज गाडी याच प्रकारची आहे. त्याला ती गाडी असली तरीही डिजिटल स्पेस असं म्हटलं जातं ते याच कारणामुळे.भारतामध्ये या सगळ्याचा प्रभाव जाणवण्याला खूप वेळ आहे हे खरंच; पण आपण पुढे ही दिशा नक्की आहे हे लक्षात ठेवायला हवंय हे पक्कं !या सगळ्याचा तुम्ही आम्ही जो आता अभ्यास करतोय त्याचा अर्थ काय? तुम्हाला उदाहरण देतो...परवाच एक माझा विद्यार्थी जो पुण्यातून इंजिनिअरिंग करून अमेरिकेत शिकायला आला होता आणि आता एका मेकॅनिकल कंपनीत काम करतोय. तो भेटला होता. तो सांगत होता की, अजून ४-५ वर्षे त्याला काही प्रश्न दिसत नाहीत; पण त्यानंतर मात्र आॅटोमेशनची झळ लागणार आहे. तर मला विचारत होता की आतापासून मी त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी काय काय करू शकतो. अशीच एक विद्यार्थिनी मुंबईची इकडे कॅलिफोर्नियामध्ये (हार्डवेअर कम्प्युटर चिप वगैरे!) सेमिकंडक्टरमध्ये काम करतोय. त्यात पण बदल होत आहेत.आरपीए रोबोटिक प्रोसेस आॅटोमेशनमुळे ! तेवढचं नाही तर मी तिला जाणीव करून दिली की पूर्वीचं सिलिकॉनवरच अवलंबून असणारं तंत्रज्ञान कदाचित फोटोनिक्स (प्रकाश किरणांवर आधारित असणारी सर्किट्स) डीएनए म्हणजे जनुकांवर आधारित सर्किट्स किंवा अजून बाल्यावस्थेत असणारी कॉटम कम्युटिंग (पुंज सिद्धातांवर आधारित संगणक) ही पण दिशा विचारात घ्यायला हवी !तर मित्र-मैत्रिणींनो, इंडस्ट्री ४.० मध्ये तुम्ही आम्ही पूर्णपणे ‘मजधार’मध्ये आलो आहोत. मी तुम्हाला वैद्यकीय, अभियांत्रिकी, विधी-कला-वाणिज्य या सर्वच क्षेत्रातील बदलांबद्दल सांगेन; पण मुख्य मुद्दा म्हणजे ‘‘चरैवेति’’. म्हणजे कण्टिन्युअस लर्निंग. सतत शिक्षण. हे आपण सर्वांनाच आवश्यक आहे. ‘चरैवेति’ म्हणजे ‘चरण्याचा’ संबंध नाही हे मुद्दाम सांगतो. ‘चर’ म्हणजे चालणे- चालत राहणे इंडस्ट्री ४.० मध्ये टिकायचे असेल तर हा मंत्र आपल्याला लागेल.चरैवेति! चरैवेति!!( लेखक आयटी तज्ज्ञ आहेत. bhooshankelkar@hotmail.com)