अ‍ॅपल आणि टेस्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 14:47 IST2018-05-10T14:47:34+5:302018-05-10T14:47:34+5:30

तिकडे अमेरिकेत सिलिकॉन व्हॅलीत गाड्यांना स्पर्धक म्हणून आता विनाचालक, विनापेट्रोल, विनाचावी गाड्या धावण्याच्या तयारीत आहेत. जगातली स्पर्धा आणि स्पर्धक असे झपाट्यानं बदलत आहेत..

Apple and Tesla | अ‍ॅपल आणि टेस्ला

अ‍ॅपल आणि टेस्ला

- डॉ. भूषण केळकर
काल मी सिलिकॉन व्हॅली कॉलिफोर्नियामध्ये होतो. माझ्या एका विद्यार्थिनीने फेसबुकच्या प्रख्यात एफ-८ कॉन्फरन्समध्ये भाग घेतला होता. मला उत्सुकता होती ती मार्क झुकरबर्ग यांच्या बीजभाषणाची. कारण तुम्ही वाचलं असेल की डाटा सिक्युरिटी ही माहितीच्या गोपनीयतेबद्दल मार्क झुकरबर्गची यूस काँग्रेस समोर टेस्टीमोनी होतीे. ती गाजली होती. या एफ ८ कॉन्फरन्समधील एकूण सूर होता की, गोपनीयतेबद्दल जी दक्षता घेतली ती पुरेशी नसली तरी त्याला इलाज नव्हता ! कॉन्फरन्स संपल्यानंतर फेसबुकची स्टॉक मार्केटवर किंमत वाढलेली होती!
मला वाटतं की, भारतासकट सर्वांना याची जाणीव होते आहे की जिथे लोकं स्वत:हून समाज माध्यमांत भाग घेत आहेत तिथे त्याची त्यांना ‘‘किंमत’’ मोजायला लागणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप फुकट असलं तरीही !!
सिलिकॉन व्हॅलीमधील अजून दोन महत्त्वाची प्रेक्षणीय स्थळे म्हणजे इंडस्ट्री ४.० मधला परिक्षेत्रातील अ‍ॅपल आणि टेस्ला. इंडस्ट्री ४.० मधील गंमत म्हणजे व्यवहारातील पूर्वीची मॉडेल्स बदलत आहेत. हेच बघा ना. मर्सेडिस बेन्स, बीएमडब्ल्यू किंवा अन्य गाड्यांचे स्पर्धक हे फोर्ड किंवा मारुती सुझुकी नाहीत त्यांचे स्पर्धक आहेत गूगल, अ‍ॅपल आणि टेस्ला. चालकविरहित पेट्रोल, डिझेल न वापरता विद्युत शक्तीवर चालणारी, चेहरा-स्पर्श, बोटांचे ठसे- डोळ्यांची बाहुली अशा अत्यंतिक व्यक्तिगत माध्यमातून गाडी चालू करता येणं (गाडीला किल्ली नाही !) अशा ‘जादू’च्या यंत्राची ही कमाल. तुम्ही नुसतं गाडीत बसायचं आणि पत्ता बोलून सांगायचा की गाडी सुरू आणि तुमच्या ईप्सित स्थळी कमीत कमी गर्दीतून कमीत कमी वेळात नेणार.
तुम्ही मागे बसून व्हॉटस्अ‍ॅप वर मित्रमैत्रिणींशी बोलू शकाल, सिनेमा पाहू शकाल इ. पार्किंगचं झंझट नाही, सायकलवाला आडवा आला म्हणून डोक्याला झिगझिग नाही. सारं कसं कुल कुल ! मित्र-मैत्रिणींनो, ही कवी कल्पना नाही ! आज सकाळीच ज्या टेस्टला कंपनीसमोर होतो त्या कंपनीची ही लवकरच येऊ घातलेली स्वयंचलित चालकाविरहित गाडी आहे.
२०१९ मध्ये येऊ घातलेली बिटॉन म्हणून चायनीज गाडी याच प्रकारची आहे. त्याला ती गाडी असली तरीही डिजिटल स्पेस असं म्हटलं जातं ते याच कारणामुळे.
भारतामध्ये या सगळ्याचा प्रभाव जाणवण्याला खूप वेळ आहे हे खरंच; पण आपण पुढे ही दिशा नक्की आहे हे लक्षात ठेवायला हवंय हे पक्कं !
या सगळ्याचा तुम्ही आम्ही जो आता अभ्यास करतोय त्याचा अर्थ काय? तुम्हाला उदाहरण देतो...
परवाच एक माझा विद्यार्थी जो पुण्यातून इंजिनिअरिंग करून अमेरिकेत शिकायला आला होता आणि आता एका मेकॅनिकल कंपनीत काम करतोय. तो भेटला होता. तो सांगत होता की, अजून ४-५ वर्षे त्याला काही प्रश्न दिसत नाहीत; पण त्यानंतर मात्र आॅटोमेशनची झळ लागणार आहे. तर मला विचारत होता की आतापासून मी त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी काय काय करू शकतो. अशीच एक विद्यार्थिनी मुंबईची इकडे कॅलिफोर्नियामध्ये (हार्डवेअर कम्प्युटर चिप वगैरे!) सेमिकंडक्टरमध्ये काम करतोय. त्यात पण बदल होत आहेत.
आरपीए रोबोटिक प्रोसेस आॅटोमेशनमुळे ! तेवढचं नाही तर मी तिला जाणीव करून दिली की पूर्वीचं सिलिकॉनवरच अवलंबून असणारं तंत्रज्ञान कदाचित फोटोनिक्स (प्रकाश किरणांवर आधारित असणारी सर्किट्स) डीएनए म्हणजे जनुकांवर आधारित सर्किट्स किंवा अजून बाल्यावस्थेत असणारी कॉटम कम्युटिंग (पुंज सिद्धातांवर आधारित संगणक) ही पण दिशा विचारात घ्यायला हवी !
तर मित्र-मैत्रिणींनो, इंडस्ट्री ४.० मध्ये तुम्ही आम्ही पूर्णपणे ‘मजधार’मध्ये आलो आहोत. मी तुम्हाला वैद्यकीय, अभियांत्रिकी, विधी-कला-वाणिज्य या सर्वच क्षेत्रातील बदलांबद्दल सांगेन; पण मुख्य मुद्दा म्हणजे ‘‘चरैवेति’’. म्हणजे कण्टिन्युअस लर्निंग. सतत शिक्षण. हे आपण सर्वांनाच आवश्यक आहे. ‘चरैवेति’ म्हणजे ‘चरण्याचा’ संबंध नाही हे मुद्दाम सांगतो. ‘चर’ म्हणजे चालणे- चालत राहणे इंडस्ट्री ४.० मध्ये टिकायचे असेल तर हा मंत्र आपल्याला लागेल.
चरैवेति! चरैवेति!!


( लेखक आयटी तज्ज्ञ आहेत. bhooshankelkar@hotmail.com)

Web Title: Apple and Tesla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.