अॅण्ड्राईड लॉलीपॉप

By Admin | Updated: November 13, 2014 20:33 IST2014-11-13T20:33:34+5:302014-11-13T20:33:34+5:30

स्मार्टफोन वापरणा:या जगभरातील सुमारे 83 टक्के लोक अॅण्ड्राईड फोन वापरतात. 2क्क्8 साली पहिला अॅण्ड्राईड स्मार्टफोन बाजारात आला.

Android Lollipop | अॅण्ड्राईड लॉलीपॉप

अॅण्ड्राईड लॉलीपॉप

>अनिल भापकर - 
स्मार्टफोन  वापरणा:या जगभरातील सुमारे 83 टक्के लोक अॅण्ड्राईड फोन वापरतात. 2क्क्8 साली पहिला अॅण्ड्राईड स्मार्टफोन बाजारात आला. अॅण्ड्राईड कप केक 1.5 पासून सुरू झालेला हा अण्ड्राईड मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीमचा प्रवास पुढे फ्रायो, जिंजरब्रेड, हनीकोंब, आइसक्रीम सॅण्डवीच, जेलीबीन, किटकॅटर्पयत येऊन पोहोचला. यात नुकतीच आणखी पुढच्या अॅण्ड्राईड व्हजर्नची भर पडली आहे. त्याचे नाव आहे अॅण्ड्राईड छ 5.क् अर्थात अण्ड्राईड लॉलीपॉप 5.क् आहे काय हा नवीन लॉलीपॉप?
ओके गूगल? 
ओके गूगल हे यातले सगळ्यात महत्त्वाचे फीचर. ते व्हाइस सर्चसाठी वापरले जाते. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला तोंडी आदेश देऊ शकता. एखादी वेबसाइट ओपन करायला सांगू शकता, व्हॉट्स अॅप किंवा फेसबुक ओपन करायला सांगू शकता किंवा एखादं गाणो किंवा व्हिडिओ प्ले करायला सांगू शकता. हे फिचर खरे तर अॅण्ड्राईड किटकॅटमध्येच आलेले होतेच आता मात्र अॅण्ड्राईड लॉलीपॉप 5.क् मध्ये ते थोडे अपडेट करण्यात आले आहे. सध्या गूगलच्या नेक्सस 6 आणि नेक्सस 9 मध्येच हे फिचर उपलब्ध आहे. मात्र लवकरच इतरही स्मार्टफोनमध्ये हे उपलब्ध होऊ शकेल.
डबल टॅप टू वेक
जेव्हा तुमचा स्मार्टफोनचा स्क्रीन ऑफ होतो तेव्हा त्याला परत वेक अप करण्यासाठी पॉवर बटन दाबावे लागते व नंतर स्क्रीन चालू झाल्यावर स्मार्टफोन अनलॉक करावा लागतो. या सर्व भानगडी केल्यापेक्षा  स्क्रीनवर फक्त डबल टॅप करून जर मोबाइल स्क्रीन चालू झाला तर किती सोपं होईल? अॅण्ड्राईड लॉलीपॉपमध्ये हे डबल टॅप टू वेक हे फिचर आहे. 
सिक्युरिटी
मालवेअर आणि व्हलनॅरिबीलिटीसाठी विशेष सुरक्षा प्रणालीची व्यवस्था आहे. त्याचबरोबर स्मार्टलॉक हे फिचरसुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकते. ज्यामुळे तुमचा स्मार्टफोन चोरीला गेला किंवा हरवला तरी तुमच्या डेटाचा दुरुपयोग होणार नाही. 
लॉक स्क्रीन नोटिफिकेशन
एसएमएस किंवा हँगआउट मेसेज आला तर तुम्हाला स्क्रीन अनलॉक करून मग रिप्लाय करावा लागतो. आता अनलॉक न करताही उत्तर पाठवता येऊ शकतं. 
प्रायोरीटी मोड
प्रायोरिटी मोड हा नोटिफिकेशन्सचा एक भाग आहे. हे फिचर अॅपलच्या डू नॉट डिस्टर्ब फिचरप्रमाणो आहे. जर तुम्हाला काही विशिष्ट नंबरवरून कॉल नको असतील किंवा काही नंबरवरचे मेसेजेसचे नोटिफिकेशन नको असेल तर ते तुम्ही ठरवू शकता किंवा काही विशिष्ट वेळेतच हे नोटिफिकेशन घ्यावे हेदेखील तुम्ही ठरवू शकता.
गेस्ट मोड
अनेकवेळा तुमचा मोबाइल हा इतरांच्या हातात जाऊ शकतो. ऑफिसमध्ये एखादा सहकारी कॉल करण्यासाठी मोबाइल मागतो किंवा कधी कधी तुम्ही ऑफिसमध्ये तुमच्या कामाच्या जागेवर मोबाइल  विसरता. अशावेळी तुमच्या मोबाइलमधले फोटो, व्हिडिओ किंवा डेटा पाहण्याचा मोह समोरच्याला होऊ शकतो. त्यात तुमचे पर्सनल फोटो किंवा व्हिडिओ किंवा डेटा असू शकतो. हे टाळण्यासाठी गेस्ट मोड हे एक मस्त फिचर अण्ड्राईड लॉलीपॉपमध्ये आहे. एकदा का गेस्ट मोड अॅक्टीव्हेट केले की त्यामध्ये तुम्ही काय काय अॅक्सेस द्यायचा हे ठरवू शकता. 
या नव्या पद्धतीत फोनचा वापर अधिक सुकर, अधिक कलात्मक अपेक्षित आहे हे नक्की !
 

Web Title: Android Lollipop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.