Alert- Hackers attack-qualcomm processor | क्वालकॉम प्रोसेसरवर हॅकर्सचा हल्ला- संशोधकांचा इशारा

क्वालकॉम प्रोसेसरवर हॅकर्सचा हल्ला- संशोधकांचा इशारा

ठळक मुद्देप्रोसेसरवर हॅकर्सचा हल्ला

सध्या हॅकिंगच्या घटना देशभर वाढत आहेत. त्यातून कायदा आणि सुरक्षा यंत्रणाही चिंतेत पडलेल्या आहेत. 
हॅकर्स सतत वेगवेगळ्या युक्त्या लढवून लोकांना लुबाडण्याचे नवेनवे मार्ग शोधत आहेत. 
या हॅकर्सबरोबर लढाईसाठी आपल्या विविध सरकारी यंत्रणा सतत सज्ज असतातच; पण जगभरातील सायबर तज्ज्ञदेखील सतत या हॅकर्सच्या युक्त्या शोधणो, त्या उघड सांगणं, लोकांच्या विविध उपकरणातील त्रुटी शोधणं आणि त्यावरचे उपाय सुचवणं यासाठी प्रयत्नशील असतात.
अशीच एक सायबर सुरक्षा संस्था असलेल्या ‘चेक पॉइंट’ या संस्थेतील संशोधकांनी नुकतेच क्वालकॉम प्रोसेसरवरती संशोधन केले आहे. 
जगातील 40 टक्क्यापेक्षा जास्त अॅण्ड्रॉइड उपकरणं या प्रोसेसरवरती चालतात. इतक्या महत्त्वाच्या आणि लोकप्रिय असलेल्या या क्वालकॉम प्रोसेसरमध्ये संशोधकांना 400 क्षा जास्त उणीवा आणि त्रुटी सापडलेल्या आहेत. या प्रोसेसरमध्ये असलेल्या सुरक्षाव्यवस्थेला आरामात गंडा घालून हॅकर्स कुणाचाही फोन सहज हॅक करू शकतात, असा इशारा संशोधकांनी दिला आहे.
क्वालकॉम प्रोसेसरमध्ये असलेल्या त्रुटींचा फायदा उचलण्यासाठी विशेष प्रकारची अॅप्लिकेशन बनवून हे हॅकर्स लोकांच्या मोबाइलवर सहजपणो ताबा मिळवू शकत असल्याची भीतीदेखील शास्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
हा क्वालकॉम प्रोसेसर म्हणजे हॅकर्सला त्या फोनमध्ये शिरण्याचे प्रवेशद्वारच आहे अशी चिंता हे संशोधक व्यक्त करत आहेत.
डिजिटल सिग्नल प्रोसेसर याप्रकारात मोडणारे हे क्वालकॉम प्रोसेसर म्हणजे जणू एका चिपमध्ये संपूर्ण संगणकच सामावलेला आहे, असे म्हणायला हरकत नाही. 
याच प्रोसेसरच्या मदतीने फोन उत्पादक कंपन्या ग्राहकांना त्यांच्या फोनमध्ये क्विक चार्जिग आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी सारखी फीचर्स उपलब्ध करून देतात. 


मात्र इतक्या महत्त्वाचा असलेला हा प्रोसेसरच आता संशयाच्या घे:यात सापडला आहे. याप्रोसेसर मधल्या सुरक्षा त्रुटींचा फायदा घेत, एकदा का हॅकरने कुणाच्याही फोनचा पूर्ण ताबा मिळवला, की मग तो त्या फोनचे कॉल रेकॉर्ड करणं, महत्त्वाची गोपनीय माहिती चोरणं, फोटो आणि व्हिडिओ कॉपी करून घेणं, लोकेशनशी संबंधित माहिती चोरणं असे अनेक उद्योग करू शकतात. या सगळ्या सुरक्षा त्रुटी समोर आल्यानंतर, आता या प्रोसेसरचे उत्पादन करणा:या क्वालकॉम कंपनीनेदेखील यासंदर्भात वापरकत्र्याना इशारा दिला असून, लवकरच फोनच्या उत्पादक कंपन्यांतर्फे ग्राहकांना या प्रोसेसरचे अपडेट उपलब्ध करून देऊन,  सुरक्षा त्रुटी दूर केल्या जाणार असल्याची चर्चा आहे.

ट्विटरचा यूजर्सना इशारा 

2020 क्मध्ये ट्विटरने ग्राहकांना अनेक नवे फीचर्स उपलब्ध करून दिले. मात्र ट्विटरच्या अॅॅण्ड्राइड अॅपमध्ये एक मोठी सुरक्षा त्रुटी असल्याचे नुकतेच समोर आले आहे.
ट्विटरच्या बग बाउण्टी पार्टनर असलेल्या हॅकरवनच्या मदतीने ही सुरक्षा त्रुटी समोर आली आहे. या सुरक्षा त्रुटीमुळे ट्विटरच्या काही वापरकत्र्याचे प्रायव्हेट मेसेजेस एक्सपोज होण्यास सुरु वात झाली होती. अर्थात ट्विटरच्या फक्त 4 टक्के वापरकत्र्यानाच या अडचणीला सामोरे जावे लागत असल्याचे ट्विटरने म्हटले आहे. ट्विटरने ताबडतोब आपल्या वापरकत्र्याना एक मेसेज पाठवून आपले ट्विटर अॅप अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. या अपडेटनंतर सुरक्षा त्नुटी दूर होणार आहे. ज्या वापरकत्र्याना अडचणीचा सामना करावा लागत आहे, त्यांना ट्विटरने अॅप उघडताच नोटिफिकेशनद्वारे अपडेशन करण्याचा मेसेज मिळण्याची व्यवस्था केलेली आहे. खरेतर हीच अडचण किंवा सुरक्षा त्रुटी ट्विटरमध्ये 2018 साली देखील उद्भवली होती. त्याचवेळी या बगचे ’फिक्स’ उपलब्ध करून दिले असल्याचे ट्विटरने नमूद केले आहे. ही अडचण ज्या वापरकत्र्याना आली, त्यापैकी अनेकांनी आपले अॅप वेळच्यावेळी अपडेट केलेले नाही असा दावा ट्विटरतर्फे करण्यात आला आहे. या सुरक्षा त्रुटीचा कोणी गैरफायदा घेतल्याचे किंवा याच्या मदतीने वापरकत्र्याची खासगी माहिती चोरल्याचे अजून तरी समोर आलेले नाही. 

Web Title: Alert- Hackers attack-qualcomm processor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.