शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
5
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
6
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
7
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
8
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
9
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
10
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
11
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
12
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
13
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
14
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
17
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
18
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
19
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
20
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
Daily Top 2Weekly Top 5

AI - ‘ढ’ संगणकात अचानक बुद्धी निर्माण झाली तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 06:00 IST

कृत्रिम बुद्धिमत्ता - संगणकाला कामाला लावण्याचं काम

ठळक मुद्दे कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये प्रवीण होणारे लोक भविष्यात अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

अतुल  कहाते 

संगणक अत्यंत आज्ञाधारक साहायक आहे. आपण त्याला नेमून दिलेलं काम तो न थकता, कामचुकारपणा न करता आणि सातत्यानं बिनचूक करत राहातो.  दुसरीकडे एका अर्थानं तो अत्यंत बिनडोकही आहे. याचं कारण म्हणजे आपण त्याला जे सांगू त्यावर तो विश्वास ठेवतो आणि आपल्या हुकमानुसार ते काम पार पाडतो.  मात्र विचार करा, स्वतर्‍चं डोकंच न वापरणार्‍या या ‘ढ’ संगणकात अचानक बुद्धी निर्माण झाली तर? तो स्वतर्‍च विचार करू लागला, त्याही पुढे जाऊन भावना किंवा संवेदना अनुभवू शकला तर? या जर-तरच्या पुढे जाऊन याच संकल्पनांना एकत्र गुंफून कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) या शाखेचा जन्म झाला. खरं म्हणजे ही शाखा तशी नवी नाही. 1960च्या दशकापासूनच यावर काम सुरू आहे. तेव्हा संगणकीय हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर तेवढं प्रगत नसल्यामुळे मनात असलेल्या गोष्टी प्रत्यक्षात साकारणं अवघड होतं. आता ती अडचण बर्‍यापैकी दूर झालेली असल्यामुळे या तंत्रज्ञानाविषयी सगळीकडे मोठय़ा प्रमाणावर बोललं जातं. संगणकानं स्वतर्‍ नव्या गोष्टी शिकणं, आधीच्या अनुभवांमधून नवे अनुभव मिळवून शिकणं, आधीच्या चुका टाळून आपल्या कामात सुधारणा करणं हे सगळं या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घडू शकतं. यंत्रमानव म्हणजेच ‘रोबोट’ ही संकल्पना याच्याशीच जोडलेली आहे. विचार करू शकणार्‍या संगणकाचं माणसासारखं दिसणारं रूप म्हणजे यंत्रमानव. अर्थातच या तंत्रज्ञानामध्ये संगणकाला सातत्यानं विचार करायला शिकवणं आणि त्याची क्षमता माणसासारखी बनवण्याचा प्रयत्न करणं यावर भर दिला जातो. थोडक्यात म्हणजे माणूस जे काम करू शकतो ते काम संगणक करू शकेल यासाठी हे तंत्रज्ञान आहे.

हे भविष्यात महत्त्वाचे का ठरेल?भांडवलशाहीच्या मुळाशी नफेखोरीचं तत्त्वज्ञान आहे. म्हणजेच जास्तीत जास्त नफा कमावणं हेच आधुनिक युगातल्या कंपन्यांचं मुख्य आणि कित्येकदा तर एकमेव उद्दिष्ट असतं. काही अपवाद वगळता बहुतेक सगळ्या उद्योगांचा आणि कंपन्यांचा मुख्य खर्च मनुष्यबळावर होतो. म्हणजेच कर्मचार्‍यांचा पगार करण्यात त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा खर्च होतो. जर हे टाळता आलं तर प्रत्येक उद्योगाला आणि कंपनीला ते हवंच असतं. यासाठी यांत्रिकीकरण करणं गरजेचं ठरतं. म्हणजेच माणसाच्या जागी यंत्र आणली जातात. आता याच्या पुढची गोष्ट म्हणजे ही यंत्रं त्यांना येणार्‍या अडचणींमधून आणि अनुभवांमधून धडे घेऊन आपल्यात सातत्यानं सुधारणा करू शकली तर? अर्थातच ही यंत्रं अधिकाधिक बुद्धिमान होत जातील. त्याचबरोबर या यंत्रांचा वापर आणखी वाढून ती अनेक क्षेत्रांमध्ये माणसांची जागा घेऊ शकतील. ही आता फक्त काल्पनिक किंवा विज्ञानकथांमधली गोष्ट राहिलेली नसून ती वेगानं अस्तित्वात येत आहे. म्हणूनच या क्षेत्राचं भवितव्य अक्षरशर्‍ अमर्याद आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये प्रवीण होणारे लोक भविष्यात अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. तसंच जितका या क्षेत्राचा आवाका वाढेल तितका त्याच्या भविष्याचा आलेख अजूनच उंचावणार आहे. म्हणूनच ज्यांना आपला व्यवसाय किंवा आपली नोकरी हे पुढची अनेक वर्षं सुरक्षित ठेवायचं असेल त्यांच्यासाठी हे अतिशय उत्तम क्षेत्न आहे. या संकल्पनांचा वापर परदेशांमध्ये सुरू झालेला असून, आपल्याकडेही त्याचा झपाटा नजीकच्या काळात जाणवायला लागेल यात शंका नाही. 

हे शिकण्यासाठी कोणती कौशल्यं लागतात?कृत्रिम बुद्धिमत्ता हा एक प्रचंड मोठा विषय असल्यामुळे त्याविषयी शिकणं म्हणजे अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानांपैकी काही तंत्रज्ञानांपुरतं आपलं प्रशिक्षण मर्यादित ठेवणं असा अर्थ काढणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ माणसाची भाषा ही अत्यंत लवचीक असते पण संगणकाची भाषा ही एकदम नियमबद्ध असते. आपण ‘मी परवा गावाला जाईन’, ‘परवा मी गावाला जाईन’, ‘गावाला मी परवा जाईन’ यापैकी कुठलंही वाक्य जवळपास त्याच अर्थानं आणि कदाचित थोडय़ाफार वेगवेगळ्या परिणामांसाठी वापरू शकतो. संगणकाची मात्र अशा तीन प्रकारे एकच वाक्य वापरताना फार गडबड होईल! याचं कारण म्हणजे संगणकाच्या मेंदूमध्ये आपल्या मेंदूसारखा भाषेच्या संदर्भातला लवचीकपणा नसतो. आता मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेमधल्या ‘नॅचरल लॅँग्वेज जनरेशन‘ आणि ‘स्पीच रेकिग्नशन’ यासारख्या तंत्रज्ञानांमध्ये संगणकाला मानवी भाषेसारखी अत्यंत लवचीक भाषा शिकवली जाते. म्हणजेच संगणक अशी भाषा समजू शकतो आणि स्वतर्‍ही अशाच प्रकारे माणसाशी संवाद साधू शकतो. आता भारतातसुद्धा अमॅझोन कंपनीच्या ‘अ‍ॅलेक्सा’ या यंत्रमानवसदृश यंत्राचा वापर काहीजण करतात. या यंत्राला आपण तोंडी सूचना देऊ शकतो आणि त्या सूचनांनुसार ते काम करतं. अशाच प्रकारे ‘मशीन लर्निग’मध्ये माणूस करत असलेली कृती संगणकाला शिकवली जाते आणि इथून पुढे तर माणसाऐवजी संगणकानंच ते काम करावं अशी व्यवस्था होत जाणार आहे. अशी निरनिराळ्या प्रकारची कौशल्यं मिळून कृत्रिम बुद्धिमत्तेचा विषय तयार होतो. साहजिकच यामधल्या नेमक्या कोणत्या कौशल्यामध्ये आपल्याला रस वाटतो याचा विचार करून मगच या क्षेत्रामध्ये शिरण्याचा विचार केला पाहिजे.

रोजगाराच्या संधी कोणत्या?1. खरं म्हणजे ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रामधल्या रोजगाराच्या संधी’ हाच एक विचारात पाडणारा विषय आहे. याचं कारण म्हणजे या तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश माणसाकडून काम काढून घेऊन ते यंत्रांना देणं हा आहे. असं असताना या क्षेत्रात कामाच्या संधी शोधणं हे उपरोधिक वाटणं स्वाभाविक आहे; पण तंत्रज्ञानाच्या रेटय़ासमोर कुणाचं काही चालणार नसल्यामुळे प्रत्येकानं आपापल्यापरीनं यात रोजगाराच्या संधी शोधणं गरजेचं आहे. 2.  काही गोष्टी संगणकानं आत्मसात करणं आणि त्याद्वारे माणसावर कुरघोडी करणं एकदम सोपं आहे; तर काही गोष्टी संगणकाला जमणं अशक्य नसलं तरी खूप अवघड आहे. उदाहरणार्थ- एखाद्या रुग्णाच्या शारीरिक स्थितीचे घटक मोजून औषधाची मात्रा किती असावी हे संगणक काही काळानंतर सांगू शकेल; पण त्या रुग्णाच्या ेंमानसिक स्थितीमधल्या आंदोलनांचा मात्र संगणकाला अंदाज येणं कठीण आहे. 3. साहजिकच पहिल्या क्षेत्रापेक्षा दुसर्‍या क्षेत्रामधल्या लोकांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा दुष्परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. 4. याची दुसरी बाजू म्हणजे ज्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातच काम करायचं आहे त्यांनी आधी उल्लेख केलेल्या निरनिराळ्या तंत्रज्ञानांपैकी एका तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करून त्यामध्ये सखोल अभ्यास करणं आवश्यक आहे. 5. यासाठी पायथॉन, आर, लिस्प, प्रोलॉग आणि जावा यांच्यापैकी एक संगणकीय भाषा प्रामुख्यानं वापरली जाते. यामध्ये प्रावीण्य मिळवणं आणि त्यातही खासकरून या भाषेमधल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाशी संबंधित असलेल्या गोष्टी आत्मसात करणं आवश्यक आहे.