शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

झिम्बाब्वे

By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST

पावसाच्या व्यत्ययामुळे झिम्बाब्वे-न्यूझिलंड सराव सामना रद्द

पावसाच्या व्यत्ययामुळे झिम्बाब्वे-न्यूझिलंड सराव सामना रद्द
लिंकन : मार्टिन गुप्तीलने आक्रमक शतकी खेळी केली खरी, पण झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी सोमवारी पावसामुळे विश्वकप स्पर्धेचा सराव सामना रद्द होण्यापूर्वी न्यूझिलंडच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवत विश्वकप स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या न्यूझिलंडतर्फे गुप्तीलने शतकी खेळी केली. गुप्तिलचा अपवाद वगळता न्यूझिलंडचे अन्य फलंदाज धावा फटकाविण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसले. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबविण्यात आला त्यावेळी न्यूझिलंड संघाची ३०.१ षटकांत ७ बाद १५७ अशी अवस्था होती. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळाली, पण त्यांच्या फलंदाजांना मात्र स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली नाही. अखेर संततधार पावसामुळे पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
गुप्तिलने ८६ चेंडूंना सामोरे जाताना १०० धावा फटकाविल्या. त्यात १३ चौकार व २ षटकारांचा समावेश आहे. गुप्तिल व्यतिरिक्त रॉस टेलर (११) दुहेरी आकडा गाठण्यात यशस्वी ठरला. झिम्बाब्वेतर्फे वेगवान गोलंदाज एल्टन चिंगुम्बुरा (२-२१) आणि टिनसे पनयांगरा (२-२८) यांनी ढगाळ वातावरणाचा चांगला लाभ घेतला. न्यूझिलंडचा अखेरचा सराव सामना बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे तर झिम्बाब्वेची लढत श्रीलंकेविरुद्ध होईल. (वृत्तसंस्था)