शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

युवराज, गौतमला करारातून वगळले

By admin | Updated: December 23, 2014 02:06 IST

आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी करणारा भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ‘अ’ श्रेणीत समावेश केला आहे;

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी करणारा भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ‘अ’ श्रेणीत समावेश केला आहे; मात्र सध्या टीम इंडियातून बाहेर असलेले अनुभवी खेळाडू युवराज सिंह, गौतम गंभीर यांना नव्या करारातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे़बीसीसीआयने फिरकी गोलंदाज हरभजनसिंहसह वीरेंद्र सेहवाग आणि झहीर खान यांना ताज्या करारात स्थान दिलेले नाही़ बीसीसीआयने कर्णधार महेंद्रसिंह धोनी, उपकर्णधार विराट कोहली, सुरेश रैना आणि आॅफ स्पिनर आऱ अश्विन यांचा ‘अ’ श्रेणीतील करार कायम राखला आहे़ गत वर्षीच्या ‘अ’ श्रेणीत पाचवा खेळाडू सचिन तेंडुलकर याचा समावेश होता; मात्र आता तो निवृत्त झाल्यामुळे त्याची जागा आता भुवनेश्वरने घेतली आहे़ गतवर्षी युवराज आणि गंभीरचा ‘ब’ श्रेणीत समावेश होता; मात्र सलग फ्लॉप ठरल्यामुळे त्यांना बीसीसीआय करारात स्थान मिळू शकले नाही़ इंग्लंड दौऱ्यात उत्कृष्ट कामगिरी करणारा आणि बीसीसीआयचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराचा मानकरी ठरलेला भुवनेश्वर ‘अ’ श्रेणीचा दावेदार होता़ बीसीसीआयच्या ‘ब’ श्रेणीत मुरली विजय, रवींद्र जडेजा, शिखर धवन, रोहित शर्मा यांच्यासह अम्बाती रायडू यांचा समावेश आहे, तसेच वेगवान गोलंदाज मोहंमद शमी आणि अजिंक्य रहाणे यांनाही ‘ब’ श्रेणीत जागा मिळाली आहे़जम्मू-काश्मीरचा अष्टपैलू क्रिकेटपटू परवेज रसूल याचा ‘क’ श्रेणीत समावेश करण्यात आला आहे़ बंगालचा फलंदाज मनोज तिवारी, पंकज सिंह, मोहित शर्मा, वरुण अ‍ॅरोन यांचाही ‘क’ श्रेणीत समावेश आहे़ (वृत्तसंस्था)