धोनीनेच केला युवीचा पत्ता कट : योगराज सिंग
By Admin | Updated: February 17, 2015 00:39 IST2015-02-17T00:39:48+5:302015-02-17T00:39:48+5:30
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यालाच वर्ल्डकप संघात युवराज नको होता, असे वादग्रस्त वक्तव्य युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी केले आहे़

धोनीनेच केला युवीचा पत्ता कट : योगराज सिंग
नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यालाच वर्ल्डकप संघात युवराज नको होता, असे वादग्रस्त वक्तव्य युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी केले आहे़ मात्र, यानंतर अनुभवी क्रिकेटपटू युवराज सिंग याने या वृत्ताचे खंडन केले आहे़
इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) आठव्या सत्रासाठी झालेल्या लिलावात युवराजला दिल्ली डेअर डेव्हिल्सने तब्बल १६ कोटी रुपयांत खरेदी केले़ त्यानंतर योगराज म्हणाले, की वन-डे वर्ल्डकप संघात युवराजला स्थान मिळाले नाही,हे बघून मला आश्चर्याचा धक्का बसला़ युवराज सिंगची वर्ल्डकप संघात गरज नाही, असे धोनीनेच निवडकर्त्यांना सांगितले होते़ त्यामुळेच त्याला वर्ल्डकप संघात संधी मिळाली नाही़
दरम्यान, योगराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर युवराज सिंग याने टिष्ट्वट केले की, वर्ल्डकप संघात स्थान न मिळाल्यामुळे प्रत्येक आई-वडिलांप्रमाणे माझे वडील भावुक झाले आणि त्यांनी भावनेच्या भरात धोनीवर टीका केली़ विशेष म्हणजे वर्ल्डकप संघात स्थान मिळाले
नाही, याला मी धोनीला जबाबदार धरणार नाही़ उलट त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याचा मी नेहमी आनंद लुटला आहे़(वृत्तसंस्था)
कर्णधार या नात्याने धोनीने खराब फॉर्ममध्ये असलेल्या आपल्या सिनिअर खेळाडूंचे समर्थन केले पाहिजे़ तसेच त्यांना फॉर्ममध्ये परतण्यासाठी प्रोत्साहन करावे़ धोनीला युवी का संघात नको हे अद्यापही कळाले नाही.
- योगराज सिंग