शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

योगेश्वरने आॅलिम्पिक कोटा मिळवला

By admin | Updated: March 20, 2016 04:06 IST

देशाचा दिग्गज मल्लांमध्ये गणल्या जाणारा आणि रियोत भारताच्या पदकाचे आशास्थान असणाऱ्या योगेश्वर दत्तने कजाकिस्तानच्या अस्ताना येथे सुरू असलेल्या आशियाई आॅलिम्पिक

नवी दिल्ली : देशाचा दिग्गज मल्लांमध्ये गणल्या जाणारा आणि रियोत भारताच्या पदकाचे आशास्थान असणाऱ्या योगेश्वर दत्तने कजाकिस्तानच्या अस्ताना येथे सुरू असलेल्या आशियाई आॅलिम्पिक क्वॉलीफाइंग स्पर्धेच्या फ्री स्टाईलच्या ६५ किलो वजन गटाच्या फायनलमध्ये धडक मारली आणि त्याचबरोबर त्याने शनिवारी रिओ आॅलिम्पिकचा कोटाही मिळवला.योगेश्वर आता सुवर्णपदकासाठी चीनच्या कताई यिरानबिएक याच्याशी दोन हात करेल. कताईने उपांत्य फेरीत अ‍ॅडम बातिरोव याचा ६-१ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली.२0१२ च्या लंडन आॅलिम्पिकच्या कास्यपदक विजेत्या योगेश्वरने क्वालिफिकेशन राऊंडमध्ये जू सोंग किम याचा ८-१ असा पराभव केला आणि उपांत्यपूर्व फेरीत व्हिएतनामच्या युआन दिन्ह एनगुएन याचा १२-२ असा धुव्वा उडवला. लयीत दिसणाऱ्या योगेश्वरने कोरियाच्या सियुंगचुल ली याचे ७-२ असे आव्हान मोडीत काढताना दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. रिओ आॅलिम्पिकचे तिकीट पक्के करणारा योगेश्वर हा भारताचा दुसरा मल्ल ठरला. याआधी नरसिंह यादव याने आॅलिम्पिक कोटा मिळवला होता. रिओ आॅलिम्पिकसाठी योगेश्वर दत्त (६५ किलो) याच्या आधी नरसिंह यादवने ७४ किलो फ्री स्टाईल प्रकारात कोटा प्राप्त केला होता. २0१२ च्या लंडन आॅलिम्पिकसाठी भारताचे चार पुरुष आणि एक महिला पहिलवान पात्र ठरले होते. स्पर्धेत अन्य भारतीय पहिलवानात महिलांच्या ५८ किलो फ्री स्टाईल प्रकारात साक्षी मलिक आणि पुरुषांच्या फ्री स्टाईलच्या ९७ किलो वजन गटात सत्यव्रत कादियान यांच्या उपांत्य फेरीतील पराभवामुळे ते आॅलिम्पिक कोटा मिळवण्यापासून वंचित ठरले. (वृत्तसंस्था)