शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

यंदाही तिरंगा नक्की फडकावणार - वीरधवल खाडे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 3:52 AM

भारतात जलतरणाला जरी एवढे महत्त्व दिले जात नसले, तरी माझा व संघातील प्रत्येक जलतरणपटूचा पदक जिंकून स्पर्धेत तिरंगा फडकावून आपले राष्ट्रगीत वाजविण्याचा प्रयत्न असेल.

- अभिजीत देशमुखभारतात जलतरणाला जरी एवढे महत्त्व दिले जात नसले, तरी माझा व संघातील प्रत्येक जलतरणपटूचा पदक जिंकून स्पर्धेत तिरंगा फडकावून आपले राष्ट्रगीत वाजविण्याचा प्रयत्न असेल. २०१० आशियाई स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर २०१४च्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मी उत्सुक होतो. परंतु काही कारणास्तव सहभागी होऊ शकलो नाही,’ असे देशाचा अव्वल जलतरणपटू वीरधवल खाडेने लोकमतला सांगितले.मी या स्पर्धेसाठी सप्टेंबर २०१७पासून तयारी करीत आहे. राष्ट्रकुल आणि काही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये समाधानकारक परिणाम आले. या स्पर्धेसाठी मी खास शारीरिक शक्ती आणि स्टॅमिना वाढविण्यावर भर दिला आहे. मी या स्पर्धेत ५०, १०० मीटर व ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात सहभाग घेत आहे. २१ आॅगस्टला होणाऱ्या ५० मीटर फ्रीस्टाईल स्पर्धेत पदक नक्की जिंकेन, असा आत्मविश्वास आहे. चीन, जापान यांचे आव्हान तर आहेच; तसेच आॅलिम्पिक सुवर्ण विजेता जोसेफ सकुलींगमुळे सिंगापूर संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. भारतीय संघाचा उत्तम सराव झाला आहे. रिले स्पर्धेसाठीसुद्धा आम्ही उत्सुक आहोत. आमचा प्रयत्न २-३ पदके जिंकून भारतीय जलतरणामध्ये क्रांती घडविण्याचा आहे.जकार्ता आशियाई क्रीडा साठी सज्ज१८ आॅगस्टपासून सुरू होणा-या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जकार्ता सज्ज दिसत आहे. सुराबया जंगलातील आग, सुमात्रामध्ये आतंकवादी हमला, लुम्बार्क येथे भूकंप, आर्थिक तंगी अशा सगळ्या संकटांवर मात करून इंडोनेशिया आपली मान उंचावण्यासाठी आयोजन करण्यास सर्वस्व देत आहे. ४५ देशांचे १६,००० पेक्षा जास्त खेळाडू स्पर्धेत सहभाग असल्याने आॅलिम्पिकनंतर सर्वात मोठी बहुक्रीडा स्पर्धा म्हणून बघिलते जात आहे. आशियाई क्रीडाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन शहरे जकार्ता आणि पालेमबंग मिळून या स्पर्धेचे आयोजन करीत आहेत. या दोन्ही शहरांनी २०११ची दक्षिण-पूर्व आशियाई स्पर्धा आयोजित केली होती; त्यामुळे नवीन स्टेडियम करण्याची गरज पडली नाही. नूतनीकरणावर आयोजकांनी भर दिला आहे. केवळ सायकलिंग वेलोड्रोम (ट्रॅक प्रकार)साठी नवीन स्टेडियम बांधण्यात आले आहे.

टॅग्स :Asian Games 2018एशियन गेम्स २०१८Sportsक्रीडा