शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

यशस्विनी देसवालचा सुवर्णवेध!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2019 3:06 AM

आयएसएसएफ विश्वचषक : भारताने मिळवला आॅलिम्पिक नेमबाजीतील नववा कोटा

रिओ-डी-जानेरिओ : यशस्विनी देसवालने जागतिक क्रमवारीतील अव्वल नेमबाज ओलेना कोस्तेविचला पिछाडीवर सोडत येथे आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेमध्ये शनिवारी महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. यासह तिने भारताला नववा ऑलिम्पिक कोटा मिळवून दिला.

माजी ज्युनिअर विश्व चॅम्पियन २२ वर्षीय यशस्विनीने ८ महिलांच्या अंतिम फेरीमध्ये २३६.७ चा स्कोअर नोंदवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या युक्रेनच्या ओलेना कोस्तेविचला २३४.८ अंकांसह रौप्य व सर्बियाच्या जेसमिना मिलावोनोविचला २१५.७ अंकांसह कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. अर्थशास्त्राची विद्यार्थिनी असलेल्या यशस्विनीच्या वर्चस्वाची कल्पना तिने अंतिम फेरीत ओलेनाच्या तुलनेत १.९ गुणांच्या घेतलेल्या आघाडीवरुन येते. पात्रता फेरीत ती ५८२ गुणांसह अव्वल स्थानी होती. या चमकदार कामगिरीच्या जोरावर यशस्विनीने २०२० टोकिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी भारतातर्फे कोटा स्थान मिळवणारे नेमबाज संजीव राजपूत, अंजुम मोदगिल, अपूर्वी चंदेला, सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा, दिव्यांशसिंग पवार, राही सरनोबत आणि मनू भाकर यांच्या पंक्तीत स्थान मिळवले. रिओमध्ये भारतातर्फे हे तिसरे सुवर्ण ठरले. अभिषेक वर्मा व इलावेनिल वलारिवान यांनी अनुक्रमे पुरुष १० मीटर एअर पिस्तुल व महिलांच्या १० मीटर रायफल स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आहे. काजल सैनी महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये ११६७ च्या स्कोअरसह पात्रता फेरीत २२ व्या तर तेजस्विनी सावंत ११५६ गुणांसह ४७ व्या स्थानी राहिली. अनुराज सिंग व श्वेता सिंग यांना अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही तर मनू भाकरने किमान पात्रता स्कोअरमध्ये ५८० अंक मिळवले. 

टॅग्स :Gold medalसुवर्ण पदकGoldसोनंShootingगोळीबार