शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

"मी राजीनामा द्यायला तयार पण..," ब्रिजभूषण सिंह यांनी आंदोलक पैलवानांसमोर ठेवली मोठी अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 19:20 IST

Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत.

Brij Bhushan Singh Statement on Wrestlers Protest । नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले असून कुस्तीपटूंनी केलेला विरोध हे राजकारण असल्याचे म्हटले आहे. सिंह म्हणाले की, कुस्तीपटू काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या हातातील खेळणी बनले आहेत. राजीनामा हे त्यांचे उद्दिष्ट नाही, त्यांचे उद्दिष्ट राजकारण आहे. तसेच मी राजीनामा द्यायला तयार आहे, जर यामुळे हा विरोध संपुष्टात येणार असेल तर ते करेन, असेही सिंह यांनी म्हटले. 

दरम्यान, एफआयआरची कॉपी मिळाली नाही, ज्याचा बजरंग पुनियाने दावा केला आहे, असे सिंह यांनी स्पष्ट केले. दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सर्व आरोप फेटाळले. माझ्या राजीनाम्यानंतर पैलवान घरी जाऊन निवांत झोपले तर मला काहीच हरकत नाही, असे ते म्हणाले.

ब्रिजभूषण यांनी आरोप फेटाळलेखरं तर उत्तर प्रदेशमधील कैसरगंज येथील भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात राजधानी दिल्लीत कुस्तीपटू निदर्शने करत आहेत. मागील आठवड्याभरापासून आंदोलक पैलवान आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. ब्रिजभूषण यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांना अटक करावी, असे आंदोलकांनी ब्रिजभूषण यांच्यावर एफआयआर दाखल झाल्यानंतर म्हटले आहे. जंतरमंतर येथे कुस्तीपटूंचे आंदोलन आज ​​आठव्या दिवशीही सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी खासदारांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. त्याचबरोबर ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आरोप चुकीचे असल्याचे सांगितले आहे. त्यांनी याला राजकीय षडयंत्र म्हटले आहे.

आंदोलनाचा आज आठवा दिवस लक्षणीय बाब म्हणजे ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील ७ नामांकित पैलवानांनी मागील रविवारी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज आंदोलनाला आठवडा पूर्ण झाला असून भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला पैलवानांनी केले आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :Wrestlingकुस्तीVinesh Phogatविनेश फोगटBJPभाजपाcongressकाँग्रेसNew Delhiनवी दिल्ली