शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

विश्व कुस्ती चॅम्पियनशिप : कडव्या लढतीत गुरप्रीत पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 23:54 IST

गुरप्रीतने ७७ किलो वजनगटातील लढतीत २०१७ च्या विश्व चॅम्पियनविरुद्ध १-० अशी आघाडी घेतली होती.

नवी दिल्ली : भारताच्या गुरप्रीत सिंगने कडवी लढत दिल्यानंतरही सोमवारी येथे विश्व कुस्ती चॅम्पियनशिपच्या चुरशीच्या लढतीत जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या क्रमांकाचा मल्ल व्हिक्टर नेमेसविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.गुरप्रीतने ७७ किलो वजनगटातील लढतीत २०१७ च्या विश्व चॅम्पियनविरुद्ध १-० अशी आघाडी घेतली होती. सर्बियाच्या मल्लाला अधिक बचावात्मक पवित्रा स्वीकारल्यामुळे एका गुणाची पेनल्टी देण्यात आली होती. पहिल्या पिरियडनंतर गुरप्रीत १-० ने आघाडीवर होता.दुसºया सत्रामध्ये गुरप्रीतने अधिक बचावात्मक पवित्रा स्वीकारल्यामुळे गुण गमावला. दरम्यान, व्हिक्टरने गुरप्रीतला मॅटबाहेर करण्याचा प्रयत्न केला, पण सर्कलच्या काठावर संतुलन गमावल्यामुळे भारतीय मल्लासोबत बाहेर पडला. तरी रेफरीने सर्बियाच्या मल्लाला दोन गुण बहाल केले. भारतीय प्रशिक्षक हरगोविंद यांनी या निर्णयाला आव्हान दिले, पण निर्णय त्यांच्याविरुद्ध गेला. त्यामुळे गुरप्रीतने आणखी एक गुण गमावला. सर्बियाच्या मल्लाने त्यानंतर आपली आघाडी कायम राखत पुढील फेरी गाठली.व्हिक्टरला त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत कजाखस्तानच्या अशखत दिलमुखामेदोव्हविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे गुरप्रीतची रेपेचेजच्या माध्यमातून पदक पटकावण्याची आशा संपुष्टात आली. व्हिक्टरविरुद्धच्या पराभवापूर्वी गुरप्रीतने शानदार सुरुवात करताना आॅस्ट्रियाच्या मायकल वॅगनरला चित केले.मनीषने ६० किलो वजन गटतील १/१६ च्या लढतीत फिनलँडच्या लारी योहानेस मेखोनेनचा पराभव केला. भारतीय मल्ल एकवेळ ०-३ ने पिछाडीवर होता, पण त्यानंतर सलग ११ गुण वसूल करीत त्याने तांत्रिक सरसतेच्या आधारावर विजय नोंदवला. मनीषला त्यानंतर पुढच्या फेरीत मालदोवाच्या जागतिक क्रमवारीतील तिसºया क्रमांकाचा मल्ल व्हिक्टर सियोबानूविरुद्ध तांत्रिक सरसतेच्या आधारावर पराभव स्वीकारावा लागला. मालदोवाच्या मल्लाला त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या केनिचिरो फुमिताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे मनीष पदकाच्या शर्यतीतून बाहेर झाला. नवीनला १३० किलो वजन गटात पात्रता फेरीत २०१८ पॅन अमेरिका चॅम्पियन क्युबाच्या आॅस्कर पिनो हिंडाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.

टॅग्स :Wrestlingकुस्तीIndiaभारत