शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

विश्वचषक नेमबाजी ज्युनिअर पुरुष स्कीट पात्रता फेरीत भारतीय अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 12:36 AM

भारताचा ज्युनिअर स्कीट संघ आयएसएसएफ विश्व चॅम्पियनशिपच्या पात्रता फेरीत अव्वल स्थानी राहिला

चांगवोन : भारताचा ज्युनिअर स्कीट संघ आयएसएसएफ विश्व चॅम्पियनशिपच्या पात्रता फेरीत अव्वल स्थानी राहिला, पण त्याचवेळी, भारताला सोमवारी कुठलेही पदक पटकावता आले नाही. यासह भारतीयांना आॅलिम्पिक कोटा स्थानही निश्चित करता आले नाही.ज्युनिअर पुरुष स्कीट पात्रता फेरीत गुरनिहाल सिंग गारचाने ७५ पैकी ७३ गुणांची कमाई करीत दुसरे स्थान पटकावले. अनंतजित सिंग नारुका ७१ गुणांसह ११ व्या आणि आयुष रुद्रराजू ७० गुणांसह १२ व्या स्थानी राहिला. तिघांचा एकूण स्कोअर २१४ होता. त्यामुळे भारताने गटात अव्वल स्थान पटकावले. सायप्रस दुसऱ्या स्थानी राहिला. मंगळवारी आणखी दोन पात्रता फेºया होतील आणि त्यानंतर वैयक्तिक अंतिम फेरी होईल.पुरुषांच्या २५ मीटर पिस्तूल गटात राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता अनिश भानवाना अंतिम फेरीसाठी अपात्र ठरला. त्याची अंतिम फेरी तीन गुणांनी हुकली. भारताला नवव्या दिवशी पदकाची कमाई करता आली नाही. भारताने ७ सुवर्णपदकांसह एकूण २० पदकांची कमाई केली आहे.पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोजिशनमध्ये ऐश्वर्य प्रताप सिंगचे पदक हुकले. तो पात्रता फेरीत ११५५ च्या स्कोअरसह पाचव्या स्थानी होता, पण फायनलमध्ये त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. अनिशने पात्रता फेरीत ५८१ चा स्कोअर नोंदवला, पण रॅपिड फायरमध्ये त्याचा स्कोअर २९२ होता. सहावे व अखेरचे स्थान मिळवण्यासाठी त्याला तीन गुण कमी पडले. चीनच्या लिन जुनमिनने सुवर्णपदकाचा मान मिळवला. याच गटात गुरप्रीत सिंग ५७० च्या स्कोअरसह ४३ व्या आणि शिवम शुक्ला ५६८ च्या स्कोअरसह ४६ व्या स्थानी राहिला. (वृत्तसंस्था)>थ्री पोजिशनमध्ये निराशाज्युनिअर गटात ५० मीटर रायफल थ्री पोजिशन्समध्ये फतेह सिंग ढिल्लो ३८व्या, सॅम जॉर्ज साजन ४७ व्या आणि भारतीय संघ १० व्या स्थानी राहिला. महिलांच्या ३०० मीटर रायफल प्रोनमध्ये लज्जा गोस्वामी १७व्या आणि रंजन गुप्ता ३३ व्या स्थानी राहिली.