शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

विश्व ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धा: दिव्या देशमुख चॅम्पियन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 06:21 IST

World Junior Chess Championship: युवा प्रतिभावान बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने येथे गुरुवारी संपलेल्या मुलींच्या विश्व ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. अखेरच्या फेरीत दिव्याने बल्गेरियाची बेलोस्लावा क्रस्टेवा हिचा पराभव केला.

गांधीनगर - युवा प्रतिभावान बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने येथे गुरुवारी संपलेल्या मुलींच्या विश्व ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. अखेरच्या फेरीत दिव्याने बल्गेरियाची बेलोस्लावा क्रस्टेवा हिचा पराभव केला.

२७ देशांतील १०१ खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते. दिव्याने ११ फेऱ्यांमधून सर्वाधिक दहा गुणांची कमाई केली. फिडे रेटिंगनुसार दिव्या आणि क्रस्टेवा यांचा २० वर्षांखालील ज्युनिअर क्रमवारीत अव्वल तीन खेळाडूंमध्ये समावेश आहे. तिसऱ्या स्थानावर असलेल्या दिव्याला आता अव्वल स्थानावर झेप घेण्याची संधी असेल. १८ वर्षांच्या दिव्याने आपलीच सहकारी साची जैन हिच्यावर मात करत गुणसंख्या नऊ केली. त्यानंतर अर्मेनियाची मरियम मकर्चयन हिच्याविरुद्ध अर्ध्या गुणाची आघाडी घेतली. त्याआधी खुल्या तसेच मुलींच्या गटात साडेपाच गुणांसह प्रबळ दावेदार म्हणून वाटचाल करणाऱ्या नागपूरच्या या खेळाडूने अखेरच्या पाच फेऱ्यांमध्ये एकमेव आघाडी कायम राखली होती. ती संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिली, हे विशेष. या यशासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिव्याचे कौतुक केले आहे.

    ९ डिसेंबर २००५ ला नागपुरात जन्मलेली दिव्या आंतरराष्ट्रीय मास्टर असून २०२२ ला महिला बुद्धिबळ चॅम्पियन तसेच २०२३ला आशियाई महिला चॅम्पियन बनली होती.    क्रस्टेवाने शेवटच्या गेममध्ये स्वतः काही चुका केल्या आणि त्याचा फायदा दिव्याला झाला. दिव्याने अचूक चालीसह जेतेपदावर कब्जा केला.    कोनेरू हम्पी (२००१), हरिका द्रोणवल्ली (२००८) आणि सौम्या स्वामीनाथन (२००९) नंतर २० वर्षांखालील चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावणारी दिव्या आता चौथी भारतीय महिला खेळाडू ठरली. 

अपेक्षांचे ओझे असल्याने दबावाचा सामना कसा करायचा, याचे कसब मी आत्मसात केले होते. मला माझ्या स्वत:कडूनदेखील खूप अपेक्षा होत्या; पण मी चित्त विचलित होऊ दिले नाही. एकावेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचे, हे मी ठरवले होते. - दिव्या देशमुख 

टॅग्स :Chessबुद्धीबळIndiaभारत