जागतिक अजिंक्यपद कुस्ती : विनेश फोगट कांस्य पदकासाठी खेळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 23:32 IST2019-09-17T23:32:36+5:302019-09-17T23:32:56+5:30
विनेश फोगाट मंगळवारी येथे जापानची विद्यमान विश्वविजेती मायु मुकैदा हिच्याकडून पराभूत झाली.

जागतिक अजिंक्यपद कुस्ती : विनेश फोगट कांस्य पदकासाठी खेळणार
नूर सुल्तान (कजाकिस्तान) : भारताची आघाडीची महिला कुस्तीगीर विनेश फोगाट मंगळवारी येथे जापानची विद्यमान विश्वविजेती मायु मुकैदा हिच्याकडून पराभूत झाली. त्यामुळे ती जागतिक अजिंक्यपदच्या शर्यतीतून बाहेर झाली आहे. मात्र रेपेचेसद्वारे विनेश कांस्य पदकासाठी खेळेल.
मुकैदा हिने ५३ किलोच्या अंतिम फेरीत जागा मिळवली. ज्यात विनेशच्या पदक आणि टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवण्याच्या आशा आहेत. ती फक्त दोन विजय मिळवून ऑलिम्पिकमध्ये आपली जागा बनवु शकते. या सत्रात विनेशचा हा जापानी मल्लाकडून झालेला सलग दुसरा पराभव आहे. या आधी विनेशला चीनमध्ये आशियाई चॅम्पियनशीपमध्ये मुकैदा हिच्याकडून दोन वेळा पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यानंतर विनेश म्हणाली की,‘ जापान कुस्तीमध्ये सर्वात शक्तीशाली देश आहे. या खेळाडूंविरोधात आक्रमण करताना थोडा वेळ लागतो. एक तंत्र आणि एक चाल पूर्ण सामन्याचा परिणाम बदलून टाकतो. मी प्रयत्न केले, मात्र यश मिळाले नाही.’
अन्य एका आॅलिम्पिक गटात सीमा बिस्ला उप-उपांत्यपूर्व फेरीमध्ये तीन वेळची आॅलिम्पिकपदक विजेती खेळाडू अझरबेजानची मारिया स्टॅडनिककडून २ -९ ने पराभूत झाली होती. विनेश प्रमाणेच ती देखील कांस्य पदक व आॅलिम्पिक पात्रतेच्या शर्यतीत आहे. कारण स्टॅडनिक अंतिम फेरीत पोहचली.