नवी दिल्ली : भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सिंधूने चीनच्या चेन युफेईवर 21-07, 21-14 असा दणदणीत विजय मिळवला. या विजयासह सिंधूचे या स्पर्धेतील रौप्यपदक पक्के झाले आहे, पण सिंधू या स्पर्धेतील ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावते का, याची उत्सुकता भारतीयांना असेल.

Image

Image

या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूने आतापर्यंत तिसऱ्यांदाच प्रवेश केला आहे. यापूर्वी झालेल्या दोन अंतिम फेऱ्यांमध्ये सिंधूला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले होते. या स्पर्धेत सिंधूच्या खात्यामध्ये आता पाच पदके झाली आहेत. सिंधूने यापूर्वी दोन रौप्यपदकसांह दोन कांस्यपदकेही पटकावली होती. आज उपांत्य फेरीत विजय मिळवत सिंधूने रौप्य पदक निश्चित केले आहे.

सायनाच्या पराभवानंतर भडकला तिचा पती पारुपल्ली कश्यप आणि त्यानंतर केलं 'हे' कृत्य

 भारताची महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालला बीडब्यूएफ विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. सायनाचा हा पराभव तिचा पती पारुपल्ली कश्यपच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे पाहायला मिळाले. या पराभवानंतर कश्यप चांगलाच भडकला आणि त्याने एक असे कृत्य केले की, त्याने ते करायला नको होते.

After the defeat of Saina Nehwal, her husband Parupalli Kashyap got angry | सायनाच्या पराभवानंतर भडकला तिचा पती पारुपल्ली कश्यप आणि त्यानंतर केलं

सायनाला डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टकडून पराभव पत्करावा लागला. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलेल्या सायनाला एक तास 12 मिनिटे चाललेल्या सामन्यात 15-21, 27-25, 21-12 असा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर कश्यप चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. पण त्याचे रागावण्याचे कारण नेमके होते तरी काय...

सायनाचा पराभव झाल्यावर कश्यप पंचांवर भडकलेला पाहायला मिळाला. सायनाच्या पराभवाला सदोष पंचगिरी कारणीभूत असल्याचे त्याने ट्विटरवर म्हटले आहे. आपल्या पोस्टमध्ये कश्यप म्हणाला की, " सदोष पंचगिरीचा फटका सायनाला या सामन्यात बसला. पंचांच्या वाईट कामगिरीमुळे सायनाकडून दोन मॅच पॉइंट्स हिरावले गेले. त्याचबरोबर पंचांकडून बरेच वाईट निर्णय पाहायला मिळाले."

Image result for saina angry


Web Title: World Badminton Tournament: PV Sindhu Enters in final; One step away from the gold medal
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.